चोपडा तालुका
(चोपडा या पानावरून पुनर्निर्देशित)
चोपडा (आडनाव) याच्याशी गल्लत करू नका.
चोपडा तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील जळगाव जिल्ह्याचा एक तालुका आहे. हा तालुका मुख्यत्वे केळीउत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. चोपडा शहर अंकलेश्वर - बुरहानपूर राष्ट्रीय महामार्गा वर वसलेले आहे. चोपडा तालुक्यात अडावद हे प्रमुख गाव आहे. चोपडा तालुक्यात खरद, नारोद, अंबाडे, वडगाव बु., पंचक, वर्डी, मंगरुळ, वडगाव सिम, धुपे, चहार्डि, वटार, सुटकार, चांदसणी-कमळगाव, गोरगावले, धानोरा वैगेरे गावे आहेत. तसेच अडावद जवळ तीर्थक्षेत्र उनपदेव देखील आहे. उनपदेव हे सातपुडा पर्वता जवळ असुन येथे गरम पाण्याचा झरा आहे.
?चोपडा महाराष्ट्र • भारत | |
— तालुका — | |
| |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जिल्हा | जळगाव |
चतुःसीमा
संपादनचोपडा हा सातपुड्याच्या पायथ्याशी आणि रत्नावती नदीच्या काठावर वसलेला तालुका आहे. मुंबईपासून साधारण ४०० कि.मी. उत्तरेला मध्य प्रदेश राज्य, दक्षिणेला अमळनेर तालुका, पूर्वेला यावल आणि पश्चिमेला शिरपूर तालुका आहे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |