एकनाथ खडसे

महाराष्ट्रातील राजकारणी

एकनाथ खडसे हे महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राजकारणी आहेत[१९][२०]. ते मुक्ताईनगरतूून आमदार व महाराष्ट्राचे महासुल-मंत्री होते[२१][२२] २००९ पासून ते २०१४ पर्यंत ते महाराष्ट्र विधानसभेत भारतीय जनता पक्षातर्फे विरोधीपक्ष नेता होते[२३]. १९९५-१९९९ या काळात खडसे पाटबंधारे खात्याचे मंत्री होते. २०१४ मध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष विजयी झाल्यानंतर खडसे महसूलमंत्रीकृषीमंत्री बनले. आणि पशुसंवर्धन ,दुग्धविकास, मत्स्यपालन, राज्य उत्पादनशुल्क मंत्री,अल्पसंख्याक मंत्री बनलेे[२४][२५] २१ ऑक्टोंबर २०२० रोजी एकनाथ खडसे यांनी भारतीय जनता पार्टी सोडली[२६][२७][२८] २३ ऑक्टोंबर २०२० रोजी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला[२९]

एकनाथ खडसे[१]

महसूल मंत्री, कृषी मंत्री महाराष्ट्र राज्य[२][३]
कार्यकाळ
३१ ऑक्टोबर २०१४ – ३ ऑक्टोंबर २०१६
राज्यपाल सी. विद्यासागर राव[४]
नेता देवेंद्र फडणवीस (महाराष्ट्राचे मुख्यमंत्री २०१४ - २०१९)
मागील राष्ट्रपती राजवट[४]

कार्यकाळ
१९९० – २०१९[१][५][५]
पुढील चंद्रकांत पाटील[६]

विरोधी पक्षनेता, महाराष्ट्र विधानसभा [१][७]
कार्यकाळ
२००९ – २०१४[७]
राज्यपाल के. शंकरनारायणन[८]
पुढील एकनाथ शिंदे [९]

पाटबंधारे मंत्री , अर्थमंत्री महाराष्ट्र राज्य [१०][११][१२]
कार्यकाळ
१९९५ – १९९९[११]
Governor–General पी.सी. अलेक्झांडर.[१३]
Leader मनोहर जोशी (मुख्यमंत्री महाराष्ट्र - १९९५ -१९९९).[१४]

राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष( ऑक्टोंबर २०२० - )[१५]
मागील इतर राजकीय पक्ष
आई गोदावरीबाई खडसे
वडील गणपत खडसे
पत्नी मंदा खडसे
नाते * मंदा खडसे (पत्नी)
अपत्ये * रोहिणी खडसे - खेवलकर(मुलगी)
 • शारदा चौधरी. (मुलगी)
निवास १. मुक्ताई (फार्म हाऊस), तालुका - मुक्ताईनगर,जी. जळगाव

२.कोथळी, तालुका - मुक्ताईनगर, जि. जळगाव[१८].

व्यवसाय नेता,पुढारी,राजनितिज्ञ.
धंदा शेती , साखर कारखाना.
धर्म लेवा, हिंदू.
सही एकनाथ खडसेयांची सही
संकेतस्थळ http://www.nathabhau.com/about-natha-bhau

जीवनचरित्र संपादन

एकनाथ खडसे हे महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री होते.[३०]. ते मुक्ताईनगरला राहातात.[१८] त्यांच्या वडिलांचे नाव गणपत खडसे व आईचे नाव गोदावरीबाई गणपत खडसे आहे. त्यांना दोन मुली आहेत शारदा आणि रोहिणी खडसे. त्यांची सून रक्षा निखिल खडसे रावेर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेत खासदार आहेत.खडसे मुक्ताईनगरच्या आदीशक्ति मुक्ताईचे उपासक आहेत. खडसेंच एक घर चर्चगेट,मुंबई येथे आहे.[३१][३२] एकनाथ खडसे यांचा मुलगा निखिल खडसे याने १ मे २०१३ रोजी आत्महत्या केली.[३३]

राजकीय कारकीर्द संपादन

एकनाथ खडसे यांच्या राजनैतिक जीवनाची सुरुवात कोथळी गावमध्ये सरपंच बनण्यापासून झाली. जेव्हा पहिल्यांदा ते कोथळी ग्रामपंचायतीमध्ये सभासद पदासाठी उभे राहिले तेव्हा त्यांचा पराभव झाला होता. नंतर दुसऱ्या वेळी १९८७ला ते निवडून आले.[११] १९८९ मध्ये ते मुक्ताईनगर तालुक्यातून विधानसभेसाठी निवडणुकीसाठी उभे राहिले व ते निवडून आले[५] १९८९-१९९० विधानसभा निवडणुकीत एदलाबाद  विधानसभा मतदारसंघातून एकनाथ खडसे २,६७२ मतांनी निवडून आले होते[५] तेव्हापासून ते मुक्ताईनगर तालुक्यातून विधानसभेसाठी अपराजित राहिले आहेत.१९९५ ते १९९९ च्या काळात भाजपा-शिवसेना सरकार मध्ये खडसे पाटबंधारे व अर्थमंत्री राहिले.[७]

२००९ मध्ये एकनाथ खडसेंची महाराष्ट्र विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली. २०१४ मध्ये नरेंद्र मोदींच्या लाटेवर भा.ज.प. निवडून आली तेव्हा खडसे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार होते परंतु देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रिपदी निवड झाली. खडसे हे महाराष्ट्राचे महसूल मंत्री, कृषी मंत्री, राज्य उत्पादनशुल्क मंत्री बनले.२०१४ ते २०१६ या काळात एकनाथ खडसे १२ खात्यांचे मंत्री होते.[३४]

२०१६ मद्धे खडसेंवर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला.[३५] २०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली. २०१९ मध्ये आमदारकीसाठी त्यांची कन्या रोहिणी खडसे-खेवलकर हिला भाजपने तिकीट दिले. शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजप, रोहिणी खडसे विरुद्ध अपक्ष फॉर्म भरला. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ने पाठिंबा दिला व 'चंद्रकांत पाटील' यांनी रोहिणी एकनाथ खडसे (बिजेपी) यांचा १९८९ मतांनी पराभव केला आणि ते प्रथम वेळेस आमदार बनून निवळून आले.[३६]

एकनाथ खडसे यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जामनेरचे आमदार व माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या वर आरोप केले. गिरीश महाजन व देवेंद्र फडणवीस यांच्या मुळेच आपले तिकीट कापले गेल्याचा खळबळ जनक आरोप त्यांनी एका वृत्त-वाहिनिशी बोलतांना केला[३७]. आपली राजकीय कारकीर्द संपवण्याचा कट रचला गेला असाही आरोप त्यांनी केला. जनाधार असलेल्या नेत्यांना तिकीट नाकारले व दुसऱ्या पक्षातून आलेल्यांना तिकीट दिले गेले त्यामुळेच २०१९ विधानसभेत अपयश आले असे ते म्हणाले. खडसे यांनी आरोप केला की कोर कमिटीच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांना आपल्या बद्दल नाराजी व्यक्त केली. त्यामुळे आपल्याला (खडसेंना) उम्मिद्वारी दिली गेली नाही.[३८]

८ मे २०२० एकनाथ खडसे विधानपरिषदेच्या उम्मेदवारीसाठी उत्सुक होते, त्यांना उमेदवारी देण्यात यावी म्हणून त्यांनी भाजपा कडे उम्मेडवरीची मागणी केली होती परंतु त्यांना उमेदवारी दिली गेली नाही. महणून त्यांनी वृत्तपत्र वाहिन्यांवर नाराजी व्यक्त केली.[३९][४०]

२१ ऑक्टोंबर २०२० रोजी एकनाथ खडसेंनी भाजप सोडला.[४१] भारतीय जनता पक्ष सोडल्या नंतर माध्यमांशी बोलताना खडसे म्हणाले ' देवेंद्र फडणवीसांमुळे आपण पक्ष सोडत आहोत '.[४२][४३]

२३ ऑक्टोंबर २०२० रोजी त्यांनी शरद पवारांच्या उपस्थितीत मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला.[४४]

 • इसवी सन २००० पूर्वीचा काळ -

भारतीय जनता पक्ष - शिवसेना (१९९७-१९९९) सरकारमध्ये खडसे पाटबंधारे खात्याचे मंत्री राहिले होते. खडसे मनोहर जोशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांच्या मंत्री मंडळात मंत्री होतें.मनोहर जोशींनी १९९९ला मुख्यमंत्री पदाचा त्याग केला परीनामी एकनाथ खडसेंची टर्म सुद्धा संपुष्टात आली.[४५]

राजकीय जीवनातील महत्त्वाचे टप्पे संपादन

 • १९८८ - कोथळी गावचे सरपंच झाले.
 • १९८९ - मुक्ताईनगरचे आमदार बनले[४६].
 • १९९७ - भारतीय जनता पक्ष-शिवसेना सरकारमध्ये पाटबंधारे मंत्री बनले.
 • २००९ - विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली.
 • २०१४ - भा.ज.प. सरकारमध्ये महासूल मंत्री, कृषी मंत्री, अल्पसंख्याक मंत्री, उत्पादन शुल्क मंत्री बनले.
 • २०१६ - महसूल मंत्रिपदावरून राजीनामा दिला.[४७]
 • २०२० - भारतीय जनता पार्टी सोडली[४८]
 • २०२० - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश घेतला[४९]2022 - विधान परिषद सदस्य

संदर्भ संपादन

 1. ^ a b c d https://www.bbc.com/marathi/india-49891845
 2. ^ https://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-bjp-rajya-sabha-candidate-name-declare-today-eknath-khadse-statement
 3. ^ https://www.loksatta.com/maharashtra-vidhansabha-election2019-news/bjp-internal-politics-end-eknath-khadse-career-zws-70-1989363/
 4. ^ a b https://m.timesofindia.com/india/Presidents-rule-imposed-in-Maharashtra/articleshow/43713750.cms
 5. ^ a b c d https://books.google.co.in/books?id=XVuNAAAAMAAJ&q=%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A5+%E0%A4%96%E0%A4%A1%E0%A4%B8%E0%A5%87&dq=%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A5+%E0%A4%96%E0%A4%A1%E0%A4%B8%E0%A5%87&hl=mr&sa=X&ved=0ahUKEwj2yoOjjLTpAhWH8HMBHVJlD3kQ6AEIXzAJ
 6. ^ "संग्रहित प्रत". Archived from the original on 2022-12-01. 2021-02-23 रोजी पाहिले.
 7. ^ a b c https://www.loksatta.com/maharashtra-vidhansabha-election2019-news/bjp-internal-politics-end-eknath-khadse-career-zws-70-1989363/lite/
 8. ^ https://www.thehindu.com/news/national/other-states/Bal-Thackeray-hits-out-at-Maharashtra-Governor/article16514648.ece/amp/
 9. ^ https://www.business-standard.com/article-amp/news-ians/maharashtra-finally-gets-full-time-opposition-leaders-114122300496_1.html
 10. ^ https://maharashtratimes.com/maharashtra/jalgaon-news/ministers-revenu-khadse-mahajan/amp_articleshow/45393421.cms
 11. ^ a b c https://www.sarkarnama.in/maharashtra-bjp-eknath-khadse-bday-15126
 12. ^ https://m.lokmat.com/maharashtra/decision-resign-eknath-khadsec-devendra-fadnavis/
 13. ^ https://rajbhavan-maharashtra.gov.in/en/previous-governors/dr-p-c-alexander/
 14. ^ https://www.thehindu.com/other/article30256539.ece/amp/
 15. ^ https://www.abplive.com/news/maharashtra/leader-eknath-khadse-joins-ncp-veteran-maharashtra-leader-eknath-kadse-resigned-from-bjp-join-ncp-today-820619/amp
 16. ^ https://www.maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/eknath-khadse-resign-from-all-post-in-bjp-will-join-ncp-tomorrow/amp_articleshow/78784921.cms
 17. ^ https://www.lokmat.com/politics/eknath-khadse-was-our-leader-i-wish-him-all-best-future-bjp-a629/amp/
 18. ^ a b "संग्रहित प्रत". Archived from the original on 2020-06-01. 2020-05-22 रोजी पाहिले.
 19. ^ https://www.loksatta.com/mumbai-news/eknath-khadse-joins-ncp-in-presence-of-party-chief-sharad-pawar-in-mumbai-scj-81-2309376/
 20. ^ लोकमत, ऑनलाईन (०६ नोव्हेंबर २०१९). "मला त्रास देणाऱ्यांची नाव उघड करणार : एकनाथ खडसे नी खडसावले". लोकमत. Archived from the original on ०६ नोव्हेंबर २०१९. १० नोव्हेंबर २०१९ रोजी पाहिले. |date=, |archive-date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
 21. ^ वृत्तसेवा, सकाळ (२०२०). "उमेदवारीचा अपेक्षा नव्हतीच आणि तसेच झाले : एकनाथ खडसे". उत्तर महाराष्ट्र: सकाळ वृत्तपत्र. pp. १.
 22. ^ दरादे, अभिजित (२०१६). "अशा मंत्रिपदावर मी लाथ मारतो ; एकनाथ खडसे". पुणे: महाराष्ट्रदेशा. pp. १. Archived from the original on 2020-10-26. 2020-05-06 रोजी पाहिले.
 23. ^ आकुडे, हर्षल (२०१९). "विधानसभा निवडणूक : [[देवेंद्र फडणवीस]] आणि एकनाथ खडसे यांच्या मधील दुरावा नेमका कशा मुळे". मुंबई, महाराष्ट्र,भारत .: बीबीसी न्यूझ मराठी. pp. १. URL–wikilink conflict (सहाय्य)
 24. ^ htto://www.sarkarnama.in/maharashtra-bjp-eknath-khadse-bday-15126%3famp
 25. ^ लोकसत्ता टीम, जितेंद्र पाटील (२०१९). "भाजप अंतर्गत राजकारणात खडसे पर्व अस्ताकडे". जळगाव: लोकसत्ता.
 26. ^ प्रवीण, मरगळे (२१ ऑक्टोंबर २०२०). "Eknath Khadse: ४० वर्षांनंतर 'नाथाभाऊं'ची भाजपाला सोडचिठ्ठी; जाणून घ्या त्यांचा संपूर्ण राजकीय प्रवास". लोकमत. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
 27. ^ Kadam, Ganesh (२०२०). "खडसेंचा भाजपला रामराम; उद्या राष्ट्रवादीत प्रवेश". जळगाव जिल्हा : महाराष्ट्र टाइम्स. pp. १.
 28. ^ वार्ताहर, झी २४ तास (२०२०). "जळगाव | भाजप सोडल्यानंतर एकनाथ खडसेंची पहिली पत्रकार परिषद Wed, 21 Oct 2020-3:05 pm,". मुक्ताईनगर , मुक्ताईनगर तालुका , जी. जळगाव , महाराष्ट्र.: झी २४ तास. pp. १. line feed character in |title= at position 59 (सहाय्य)
 29. ^ वेब टीम, ABP माझा (२३ ऑक्टोंबर २०२०). "एकनाथ ख डसे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश!". ABP माझा. २३ ऑक्टोंबर २०२० रोजी पाहिले. |access-date=, |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
 30. ^ गोरे, रवी (२०२०). "MLC Polls : 'मोदी गो बॅक' म्हणणाऱ्यांना उमेदवारी, एकनाथ खडसे खवळले". जळगाव,महाराष्ट्र,भारत.: टीव्ही ९ मराठी चॅनल. pp. १.
 31. ^ विचारे, पुजा (२०२०). "काल मुंबईत दाखल झालेले एकनाथ खडसे शरद पवारांना भेटणार". मुंबई , महाराष्ट्र: Esakal.com. pp. १.
 32. ^ वेब टीम, एबीपी माझा (७ ऑक्टोबर २०२०). "एकनाथ खडसे आणि शरद पवार यांची मुंबईत भेट होण्याची शक्यता". एबीपी माझा.
 33. ^ http://www.loksatta.com/maharashtra-news/bjp-leader-eknath-khadses-son-attempts-suicide-in-jalgaon-107033/
 34. ^ कुळकर्णी, मिलींद (२०२०). "एकनाथ खडसे 'वेगळा निर्णय' घेतील ?...भाजप सोडून कोणत्या पक्षात जातील". महाराष्ट्र , भारत: लोकमत बातमीपत्र. pp. १.
 35. ^ अग्रलेख, प्रहार संपादकीय (२०१६). "सरकार कोण चालवत?". प्रहार वृत्तपत्र. pp. १. Archived from the original on 2022-12-06. 2020-05-06 रोजी पाहिले.
 36. ^ पेपर, लोकमत. "पाटील जिंकले... खडसे हरल्या..." लोकमत (पेपर). pp. १३. Archived from [www.epaperlokamat.in the original] Check |दुवा= value (सहाय्य) on २५ ऑक्टोबर २०१९. २५ ऑक्टोबरबर २०१९ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
 37. ^ न्यूझ चॅनल, Zee २४ तास. "माझं तिकीट कपण्यामागे 'फडणवीस आणि महाजन' - एकनाथ खडसे". Zee २४ तास. ०३ जानेवारी २०२०. रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
 38. ^ Web team., ABP माझा. "देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन मुळे आपले तिकीट कापले गेले असा आरोप एकनाथ खडसे ने केला" [Eknath Khadse : Due to Fmr Chief Minister Devendra Fadnavis and Girish Mahajan I didn't got ticket for Maharashtra assembly election 2019.]. ABP माझा. ०३ - जानेवारी - २०२० रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
 39. ^ नेवे, चंद्रशेखर (२०२०). "भाजपने तिकीट नाकारल्यानंतर सहाव्या जागेसाठी काँग्रेसची ऑफर होती, एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट". मुक्ताईनगर - मुंबई , महाराष्ट्र , भारत.: एबीपी माझा. pp. १.
 40. ^ गोरे, रवी (२०२०). "MLC Polls : 'मोदी गो बॅक' म्हणणाऱ्यांना उमेदवारी, एकनाथ खडसे खवळले". जळगाव-मुंबई,महाराष्ट्र,भारत.: टीव्ही ९ मराठी . pp. १.
 41. ^ गवांकर, कुनाल (२१ ऑक्टोंबर २०२०). "त्या क्षणापासून माझा भारतीय जनता पार्टीत छड सुरू झाला , खडसेंच्या डोळ्यात अश्रू". Lokmat news website. २०२० ऑक्टोंबर २०२० रोजी पाहिले. |access-date=, |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
 42. ^ गलांडे, महेश (२०२०). "मध्यमाशी बोलताना एकनाथ खडसे म्हनाले पक्ष श्रेष्ठींशी आपली नाराजी नाही , फक्त देवेंद्र फडणविसमुळे आपण पक्ष सोडत आहोत". मुक्ताईनगर तालुका , जी. जळगाव , महाराष्ट्र: Lokmat news website. pp. १.
 43. ^ मरगळे, प्रविण (२२ ऑक्टोंबर २०२०). "कारस्थान कुठवर सहन करणार? फडणवीसांनी मला पक्ष सोडण्यास भाग पाडलं.माझा रोष देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहे. त्यांनी पक्ष सोडण्यास भाग पाडले". लोकमत. लोकमत. २३ ऑक्टोंबर २०२० रोजी पाहिले. |access-date=, |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
 44. ^ Web Team, एबीपी माझा (२३ ऑक्टोंबर २०२०). "एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश!". ABP माझा. २३ ऑक्टोंबर २०२० रोजी पाहिले. |access-date=, |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
 45. ^ "संग्रहित प्रत". Archived from the original on 2021-03-07. 2021-02-16 रोजी पाहिले.
 46. ^ शिंदे, या. ग. (१९९४). महाराष्ट्र विधानसभा निवडणुका. मुंबई: कँडणा प्रकाशन. pp. ५१.
 47. ^ गवानकर, कुनाल (२१ ऑक्टोंबर २०२०). "त्या क्षणापासून माझा भारतीय जनता पार्टीत छड सुरू झाला , एकनाथ खडसेंच्या डोळ्यात दाटुन आले अश्रु". Lokmat. २१ ऑक्टोंबर २०२० रोजी पाहिले. |access-date=, |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
 48. ^ गवंकर, कूनाल (२१ ऑक्टोंबर २०२०). "एकनाथ खडसे : त्यावेळ पासून माझा छळ सुरू झाला , खडसेनच्या डोळ्यात अश्रू". Lokmat. २१ ऑक्टोंबर २०२० रोजी पाहिले. |access-date=, |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
 49. ^ Online, लोकसत्ता (२३ ऑक्टोंबर २०२०). "शरद पवारांच्या उपस्थितीत एकनाथ खडसेंचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश". लोकसत्ता. २३ ऑक्टोंबर २०२० रोजी पाहिले. |access-date=, |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)

बाह्य दुवे संपादन

१. पक्षाने माझ तिकीट का कापलं? याची कारणं अजूनही शोधतोयः एकनाथ खडसे Archived 2019-10-28 at the Wayback Machine.

२. झी २४ तास - (बुधवार,२९ मार्च २०१७) एकनाथ खडसे विरोधकांच्या भूमिकेत, प्रश्नांच्या सरबत्तीने सरकार घायाळ Archived 2019-10-22 at the Wayback Machine.

३. [१]

४. झी २४ तास - (बुधवार २९ मार्च २०१७) एकनाथ खडसे विरोधकांच्या भूमिकेत प्रश्नांच्या सरबत्ती ने सरकार घायाळ. Archived 2019-10-22 at the Wayback Machine.

५. [२]