पांझरा नदी
![]() |
पांझरा नदी हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता.
हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या.
|
पांझरा ही महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील एक नदी आहे. धुळे जिल्ह्यातील ही नदी तापीची उपनदी आहे. तिची लांबी सुमारे १६० कि.मी. आहे.
पांझरा नदी | |
---|---|
उगम | नाशिक जिल्ह्यातील गाळणा डोंगर |
पाणलोट क्षेत्रामधील देश | नाशिक महाराष्ट्र |
लांबी | रुपांतरण त्रूटी: मूल्य "सुमारे 160 किमी" अंकातच आवश्यक आहे |
उपनद्या | कान, बुराई, |
धरणे | साक्री (धुळे) सिंदखेड, अक्कलपाडा |

उगम
संपादनहिचा उगम जिल्ह्यातील नैऋत्य कोपऱ्यात, सह्याद्रीतील गाळ्ण्याच्या डोंगरात व उजवीकडील गाळण्याच्या डोंगरात झाला असून, ती पिंपळनेरवरून डावीकडील धानोऱ्याचे डोंगर व उजवीकडील गाळण्याचा डोंगर यांमधून वाहते. ही पूर्ववाहिनी नदी धुळे शहरापासून पुढे ८ कि.मी. अंतर पूर्वेकडेच वाहत जाते. त्यानंतर तिच्या मार्गात आलेल्या भित्तिप्रस्तराला फोडून ती एका अरूंद दरीतून एकदम उत्तरेकडे वळसा घेते.
प्रवाह
संपादननंतर थाळनरेपासून सुमारे ८ कि.मी. अंतरावर असलेल्या मुडावद येथे ती तापी नदीस मिळते. नदीच्या पूर्वप्रवाहाच्या भागात तिच्या डाव्या तीराला समांतर पसरलेल्या लांबट आकाराच्या अनेक डोंगररांगा आढळतात.
अधिक माहिती
संपादनपांझरा नदीपासून वर्षभर पाणीपुरवठा होत असून, अनेक ठिकाणी प्रवाहाचे पाणी अडवून सिंचनाच्या सोयी केल्या आहेत. मुख्यतः साक्री धुळे आणि सिंदखेड या तालुक्यातील जमिनीस जलसिंचनाचा फायदा झाला आहे. तापी-पांझरा संगमाजवळ महाशिवरात्रीस यात्रा भरते. पांझरा नदी काठावर झुलता पुल पर्यटनासाठी आणि १०५ फुट उंचीचा भगवान महादेवांचा पंचधातूचा पुतळा उभारण्यात आला आहे. पांझरा नदीकाठी धुळे शहरात, एकविरा मातेचे मंदिर आहे. या ठिकाणी भाविकांची नेहमी गर्दी असते, नवरात्रला यात्रा भरते, आणि गणपती मंदिरसुद्धा पांझरेचा तिरावरच वसले आहे, त्या ठिकाणी झुलता पूल आणि पूर्वीचा लहान पूल, इंग्रजाच्या काळातला पूल याच नदीवर आहे असे छोटे मोठे एकूण 7 पूल धुळे शहरातच आहेत.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. विस्तार कसा करावा? |