जामनेर येथे पाचोरा ते जामनेर मिनी रेल्वे सेवा चालू आहे जामनेर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील जळगाव जिल्ह्याचा एक तालुका आहे.

  ?जामनेर
महाराष्ट्र • भारत
—  तालुका  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची

• २५८.८९५ मी
जिल्हा जळगाव

जामनेर शहर कापूस, केळी, आणि संत्री, करता प्रसिद्ध आहे. जामनेर शहर हे जळगाव शहरापासुन ३७ कि.मी. अंतरावर आहे.आणि जगप्रसिद्ध अजिंठा लेणी पासुन फक्त ३७ कि.मी . अंतरावर आहे. जामनेर तालूक्याचे आमदार श्री. गिरिश महाजन आहेत.जामनेर शहर हे शिक्षणासाठी प्रसिद्ध आहे.हे शहर औरंगाबाद बुरहानपुर महामार्गावर आहे.

जवळचे विमानतळ : जळगाव जवळचे रेल्वे स्थानक : जामनेर, पाचोरा, जळगाव, भुसावळ

दि. २८ मे १४९० रोजी जामनेर शहर स्थापन करण्यात आले*

मुघलकाळापासून येथे अस्तित्व आहे.

'जामेहनुर' या वरून जामनेर असं नाव पडल्याची मुघलकालीन पत्रव्यवहारात नोंद आढळते.

जामाची मेर ( मळा ) म्हणून जामनेर काहींच्या मते कांगनेर ( कांग नदी काठावरील महाल ) यावरून जामनेर महाल म्हणजे आताच्या भाषेत महसुली केंद्र अर्थात मंडल वा सर्कल . पूर्वी तर्फ , महाल , कसबा , पेठ , परगणा , खुर्द , बुद्रुक अशा वस्त्या होत्या . उदा . जामनेर तालुक्यातील वाकडी तर्फ यात हिवरखेडे त . वा ., चिंचखेडे त . वा . ही गावे २ ) जामनेर महालात हिवरखेडे बु०॥ , चिंचखेडे बु ०॥ . ३ ) चिंचोली कसब्यात पिंप्री (कसबा ) , चिंचोली ( कसबा ) ४ ) नाशिराबाद परगण्यात , कुऱ्हे ( प्र . न . ) , गाडेगाव ( प्र . न . ) ५ ) नदीच्या अल्याड व नदीच्या पल्याड एकाच नावाची दोन गावे असल्यास , त्यांच्या लोकसंख्येवरून जास्त लोकसंख्येच्या गावाला बुद्रुक तर कमी लोकसंख्येच्या गावाला खुर्द म्हणत असत . जसे_ ओझर बु०॥ , ओझर खु ०॥ . ६ ) कसबी कारागीरांच्या व शेतकऱ्यांच्या वस्तीला कसबा म्हणत जसे - पहूर कसबे या गावात रंगारी , सुतार , सोनार , कुंभार , माळी या कारागीर व कास्तकारांची वस्ती अधिक . त्यांनी आपले कौशल्य पणाला लावून आकर्षक व सुंदर वस्तु बनवाव्यात व जीथे बाजारपेठ अस्तीत्वात असेल तीथे नेऊन विकायचे . यावरून पेठ अस्तीत्वात आल्या. पेठ वसवण्याचं काम सरकारने नेमलेले वतनदार म्हणजे शेट्ये व महाजन करत असत . म्हणून पहूर पेठ अस्तीत्वात आले . ७ ) काही गावांना तिथल्या भौगोलिक वैशिष्टयांवरून नावं मिळाली . जसे -भरपूर पिंपळाची झाडे - पिंपळगाव , वडाची झाडे -वडगाव, बोरीची झाडे -बोरगाव यातील एकाच नावाची अनेक गावे आहेत , त्यांना ग्रामदैवतांवरुन किंवा त्या गावच्या कर्तबगार व्यक्तीच्या किंवा एखाद्या वैशिष्टयपूर्ण देवतांच्या नावावरून ओळखले जाऊ लागले . जसे -पळासखेड ( मिराचे ) , पळासखेड ( काकर ) , पळासखेड ( मोगलाई ) आता त्याला महानोरांचे म्हणतात , पिंपळगाव ( हरेश्वर ) , पिंपळगाव ( गोलाईत ) , पिंपळगाव ( रेणूका ई ) असा गावांचा एकंदरीत इतिहास आहे कर्तबगार व्यक्ती किंवा कुळ यावरुन काही गावे ओळखली जातात . जसे मांडवे ( धोब्याचे ) , मांडवे ( कोळ्याचे ) , पळसखेड ( सपकाळ ) .पळसखेड ( गुजराचे )

जामनेर तालुक्यातील पोस्ट कार्यालये (पिन कोड सहित)संपादन करा

  • शेन्दुर्णी : ४२४२०४
  • पहूर : ४२४२०५
  • जामनेर : ४२४२०६
  • वाकडीः ४२४२०७
  • फत्तेपुर : ४२४२०९
  • नेरी : ४२५११४


कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
जळगाव जिल्ह्यातील तालुके
चाळीसगाव | भडगांव | पाचोरा | जामनेर | पारोळा | एरंडोल | धरणगाव | जळगाव तालुका | भुसावळ | मुक्ताईनगर | अमळनेर | चोपडा | यावल | रावेर | बोदवड