बोरी नदी
बोरी नदी ही महाराष्ट्राच्या उस्मानाबाद जिल्ह्यामधून वाहणारी एक नदी आहे. याच नावाची एक नदी नाशिक जिल्ह्यातून आणि खानदेशातील जळगांव व धुळे जिल्ह्यातून वाहते.
ही बोरी नदी तापी नदीची उपनदी आहे. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील मोहद गावाजवळ तिचा उगम आहे. जळगाव जिल्ह्यातील बोहोरे गावाजवळ ती तापीला मिळते. भोकरीबारी नदी, चिखली नाला व कानोली नदी या बोरीच्या उपनद्या आहेत. खांदेशातील मुख्य नद्यांपैकी बोरी नदी एक आहे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |