इयोन इलेस्कु
इयोन इलेस्कू (रोमेनियन: Ion Iliescu; ३ मार्च १९३० - ) हा पूर्व युरोपामधील रोमेनिया देशाचा माजी राष्ट्राध्यक्ष आहे. इलेस्कू १९८९ ते १९९६ व २००० ते २००४ सालांदरम्यान रोमेनियाच्या राष्ट्राध्यक्षपदी होता. १९८९ सालच्या क्रांतीदरम्यान निकोलाइ चाउसेस्कुची जुलुमी कम्युनिस्ट राजवट उलथवुन टाकली गेली व रोमेनियामध्ये निवडणुका घेण्यात आल्या. ह्या निवडणुकांमध्ये इलेस्कू निवडुन आला. रोमेनियाच्या नव्या लोकशाही पर्वामधील सुरुवातीच्या १५ वर्षांमध्ये राजकीय व आर्थिक स्थैर्य मिळवण्याबद्दल इलेस्कुला रोमेनियाच्या इतिहासात मानाचे स्थान आहे.
इयोन इलेस्कू | |
रोमेनियाचा राष्ट्राध्यक्ष
| |
कार्यकाळ २० डिसेंबर २००० – २० डिसेंबर २००४ | |
मागील | एमिल कोन्स्तांतिनेस्कू |
---|---|
पुढील | त्रायन बसेस्कू |
कार्यकाळ २६ डिसेंबर १८८९ – २९ नोव्हेंबर १९९६ | |
मागील | निकोलाइ चाउसेस्कु |
पुढील | एमिल कोन्स्तांतिनेस्कू |
जन्म | ३ मार्च, १९३० ओल्तेनित्सा, रोमेनिया |
धर्म | नास्तिक |
सही |
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत