गणेश गोविंद बोडस
(गणपतराव बोडस या पानावरून पुनर्निर्देशित)
गणेश गोविंद बोडस ऊर्फ गणपतराव बोडस (जुलै २, इ.स. १८८०; शेवगांव, (जि.अहमदनगर), महाराष्ट्र - डिसेंबर २३, इ.स. १९६५) हे मराठी संगीत नाटकांतील गायक-अभिनेते होते.
कारकीर्द
संपादनगणपतराव बोडसांनी इ.स. १८९५ साली किर्लोस्कर नाटक मंडळीच्या नाटकांतून नाट्यक्षेत्रात पदार्पण केले. इ.स. १९१३ साली गंधर्व नाटक मंडळी स्थापण्यात गोविंदराव टेंब्यांसह त्यांनी बालगंधर्वांना साह्य केले. जे करायचे ते चांगलेच, उठावदार, समरसून करायचे अशा भूमिकेतून बोडसांनी संगीत रंगभूमीवरची व्यक्तिचित्रे अजरामर केली. गाता गळा नसतानाही कृष्णाच्या पदांना ’वन्समोअर’ मिळवले.
माझी भूमिका हे त्यांचे आत्मचरित्र इ.स. १९४० साली प्रकाशित झाले. मराठी कलावंताने लिहिलेले हे पहिलेच आत्मचरित्र आहे..
गणपतराव बोडस यांचा अभिनय असलेली नाटके आणि त्यांतील त्यांच्या भूमिका
संपादन- एकच प्याला (सुधाकर)
- गुप्तमंजूष (मेघनाद, शृंगी)
- चंद्रहास (थोरला, दुष्टबुद्धी, भटजी, मदन, मांग)
- प्रेमशोधन (कंदन)
- मतिविकार (विहार)
- मानापमान (लक्ष्मीधर)
- मूकनायक (प्रतोद, विक्रांत)
- मृच्छकटिक (धूता, शकार)
- रामराज्यवियोग (कुमुदवती, दशरथ, मालिनी)
- विक्रमशशिकला (सुमतीराणी)
- विक्रमोर्वशीय (चित्रलेखा, चित्रसेन गंधर्व, नारद, राणी)
- विद्याहरण (शिष्यवर्य, शुक्राचार्य)
- वीरतनय (प्रकोप, मालिनी, शंभूसेन)
- शाकुंतल (दुष्यंत, शकुंतला) (ओटी भरणारी बाई, दासी, यवन स्त्री, विदूषक व सर्वदमन यांखेरीज सर्व भूमिका)
- शापसंभ्रम (कादंबरी, चंद्रापीड, तरलिका)
- शारदा (कांचनभट, गोरख, वल्लरी, शंकराचार्य)
- संशयकल्लोळ (फाल्गुनराव)
- सौभद्र (कुसुमावती, कृष्ण, नयना, नारद, राक्षस, रुक्मिणी, सात्यकी, सारंग)
- स्वयंवर (कृष्ण)
पुरस्कार व सन्मान
संपादन- बोडसांच्या रंगभूमीवरील योगदानाची दखल घेत संगीत नाटक अकादमीने इ.स. १९५६ साली त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार देऊन गौरवले.
- इ.स. १९४० साली नाशिक येथे झालेल्या ३१व्या मराठी नाट्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
- १९५६ मध्ये नांदेड येथे भरलेल्या मराठवाडा नाट्यसंमेलनाचेही ते अध्यक्ष होते.