नगरवधू
नगरवधू ही प्राचीन भारताच्या काही भागांमध्ये पाळली जाणारी परंपरा होती. हे पद मिळविण्यासाठी स्त्रिया स्पर्धा करीत आणि ते निषिद्ध मानले जात नसे.[१] सर्वात सुंदर स्त्रीची निवड नगरवधू म्हणून केली जाई.
नगरवधूला एखाद्या देवतेप्रमाणे मान दिला जाई, पण वस्तुतः ती कलावंतीण असे. लोक तिचा नाच व गीत पाहू शकत.[२] एका रात्रीच्या नाचासाठी नगरवधूची किंमत खूप जास्त असे आणि तत्कालीन अतिसधन वर्गालाच ती परवडत असे.