वूड्रो विल्सन

अमेरिकन राजकारणी

थॉमस वूड्रो विल्सन shist utkranti

थॉमस वूड्रो विल्सन

सही वूड्रो विल्सनयांची सही

इंग्लिश: Thomas Woodrow Wilson) (डिसेंबर २८, इ.स. १८५६; स्टाँटन, व्हर्जिनिया, अमेरिका - फेब्रुवारी ३, इ.स. १९२४, वॉशिंग्टन डी.सी., अमेरिका) हा अमेरिकेचा २८वा अध्यक्ष होता. ४ मार्च, इ.स. १९१३ ते ४ मार्च, इ.स. १९२१ या कालखंडात याने राष्ट्राध्यक्षपदाची सूर्त्रे सांभाळली. इ.स. १९१२ सालातल्या निवडणुकींत प्रोग्रेसिव्ह पक्षाचा उमेदवार थियोडोर रूझवेल्टरिपब्लिकन पक्षाचा उमेदवार विल्यम हॉवार्ड टाफ्ट यांच्यात पारंपरिक रिपब्लिकन मतदार विभागले गेल्यामुळे डेमोक्रॅट उमेदवारीवर उभा राहिलेला विल्सन अध्यक्षपदी निवडून आला. अध्यक्ष होण्यापूर्वी हा इ.स. ११ ते इ.स. १९१३ या काळात न्यूजर्सी संस्थानाचा ४५वा राज्यपाल होता.

याच्या अध्यक्षपदाच्या कालादरम्यान पहिले महायुद्ध झाले. विल्सन प्रशासनाने फेडरल फार्म लोन ऍक्ट, अंडरवूड टॅरिफ, शेरमान अँटीट्रस्ट ऍक्ट सारखे महत्त्वाचे कायदे केले, तसेच फेडरल ट्रेड कमिशनफेडरल रिझर्व सिस्टिम या निमसरकारी संस्था उभारल्या.

बाह्य दुवे संपादन

  • "व्हाइट हाउस संकेतस्थळावरील अधिकृत परिचय" (इंग्लिश भाषेत). Archived from the original on 2006-05-04. 2011-09-28 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  • वरील दुव्याची वेबॅक मशिनवरील आवृत्ती मार्च ६, २००८ (वरील दुव्यात त्रुटी जाणवल्याने वेबॅक मशिन वापरुन ही आवृत्ती मिळवलेली आहे.)
  • "वूड्रो विल्सन: अ रिसोर्स गाइड (वूड्रो विल्सन: संसाधनांची मार्गदर्शिका)" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)