साउथ ऑस्ट्रेलिया
गुणक: 30°0′S 135°0′E / 30.000°S 135.000°E
साउथ ऑस्ट्रेलिया (इंग्लिश: South Australia) हे ऑस्ट्रेलिया देशातील एक राज्य आहे. साउथ ऑस्ट्रेलियाच्या पूर्वेला न्यू साउथ वेल्स व व्हिक्टोरिया, ईशान्येला क्वीन्सलंड, उत्तरेला नॉर्दर्न टेरिटोरी, पश्चिमेला वेस्टर्न ऑस्ट्रेलिया ही राज्ये तर दक्षिणेला हिंदी महासागर आहेत. ऑस्ट्रेलियामधील सर्वात रूक्ष व वाळवंटी भूभाग ह्या राज्यामध्ये स्थित आहे. साउथ ऑस्ट्रेलियाच्या सुमारे १६.५ लाख लोकसंख्येपैकी बव्हंशी वस्ती राज्याच्या आग्नेय भागात मरे नदीच्या काठांवर व समुद्रकिनाऱ्याजवळ वसली आहे. ॲडलेड ही साउथ ऑस्ट्रेलियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
साउथ ऑस्ट्रेलिया South Australia | |||
ऑस्ट्रेलियाचे राज्य | |||
| |||
साउथ ऑस्ट्रेलियाचे ऑस्ट्रेलिया देशामधील स्थान | |||
देश | ऑस्ट्रेलिया | ||
राजधानी | ॲडलेड | ||
क्षेत्रफळ | १०,४३,५१४ चौ. किमी (४,०२,९०३ चौ. मैल) | ||
लोकसंख्या | १६,५०,६०० | ||
घनता | १.६७ /चौ. किमी (४.३ /चौ. मैल) | ||
आय.एस.ओ. ३१६६-२ | AU-SA | ||
प्रमाणवेळ | यूटीसी+०९:३० | ||
संकेतस्थळ | sa.gov.au |
साउथ ऑस्ट्रेलिया राज्य पूर्णपणे ब्रिटिश साम्राज्याने वसवले होते. येथील पहिली वसाहत २८ डिसेंबर १८३६ रोजी निर्माण करण्यात आली. १ जानेवारी १९०१ रोजी व्हिक्टोरिया राणीने दक्षिण ऑस्ट्रेलियाला राज्याचा दर्जा दिला. १३ जानेवारी १९०४ रोजी सद्य ध्वजाचा स्वीकार करण्यात आला.
गॅलरी
संपादन-
साउथ ऑस्ट्रेलियामधील प्रमुख शहरे व रस्ते.
-
राज्य संसद भवन.
-
ॲडलेड ओव्हल क्रिकेट मैदान.
-
व्हिक्टर हार्बर.
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |