माधव गोविंद काटकर हे बालसाहित्याकरता प्रसिद्ध असलेले मराठीतील कवी, कथाकार होते.

माधव गोविंद काटकर
जन्म नाव माधव गोविंद काटकर
जन्म डिसेंबर २५, १९१४
मोडनिंब, सोलापूर जिल्हा, महाराष्ट्र, भारत
मृत्यू मे १६, २०००
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र साहित्य
भाषा मराठी
साहित्य प्रकार कविता, कथा, बालसाहित्य

काटकरांचा जन्म डिसेंबर २५, १९१४ रोजी महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील मोडनिंब गावी झाला. १९३८ साली मुंबई विद्यापीठातून त्यांनी बी.ए. पदवी मिळवली. पुढे १९५४ साली त्यांनी पुणे विद्यापीठातून बी.टी. पदवीही प्राप्त केली. शिक्षकी पेशा स्वीकारलेल्या काटकरांनी ’विद्या विकास हायस्कूल’ शाळेत १९४७-१९७३ या काळात अध्यापन केले. या शाळेचे मुख्याध्यपकपदही त्यांनी सांभाळले. शिक्षकी पेशात असतानादेखील काटकरांचे मुक्त लेखन चालूच होते.
मे १६, २००० रोजी काटकरांचे निधन झाले.

प्रकाशित साहित्य

संपादन

काटकरांचे प्रकाशित झालेले साहित्य खालीलप्रमाणे आहे:

कवितासंग्रह

संपादन
  • जयजयवंती (१९५१)
  • मधुधारा (१९६२)
  • मनमाधवी (१९८७)

बालकवितासंग्रह

संपादन
  • मुलांची गाणी
  • आटपाट नगरात (१९६३)
  • पिंपळ पाने
  • गंमत गाणी
  • गाजराची पुंगी (१९७९)
  • चांदण्यांचे घर
  • जमाडी जंमत

बालकथासंग्रह

संपादन
  • बोलक्या कथा (१९६८)
  • मंगल कथा (१९६९)
  • सुनीती कथा (१९८३)

कादंबरी

संपादन
  • पडक्या गढीचे गूढ (१९७७)

चरित्र

संपादन
  • झुंजार लोकमान्य (१९७७)