ऑगस्ट १०
दिनांक
<< | ऑगस्ट २०२४ | >> | ||||
सो | मं | बु | गु | शु | श | र |
१ | २ | ३ | ४ | |||
५ | ६ | ७ | ८ | ९ | १० | ११ |
१२ | १३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ | २५ |
२६ | २७ | २८ | २९ | ३० | ३१ |
ऑगस्ट १० हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २२१ वा किंवा लीप वर्षात २२२ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
संपादनसोळावे शतक
संपादन- १५१९ - फर्डिनांड मॅगेलन पाच जहाजे घेऊन पृथ्वी-प्रदक्षिणेसाठी निघाला.
सतरावे शतक
संपादन- १६८० - न्यू मेक्सिकोत पेब्लो क्रांती सुरू.
अठरावे शतक
संपादन- १७९२ - फ्रेंच क्रांती - राजा लुई सोळाव्याला अटक.
एकोणिसावे शतक
संपादन- १८०९ - इक्वेडोरची राजधानी क्विटोने स्पेनपासून स्वातंत्र्य जाहीर केले.
- १८२१ - मिसुरी अमेरिकेचे २४वे राज्य झाले.
- १८४६ - जेम्स स्मिथसनच्या ५,००,००० डॉलरच्या देणगीने स्मिथसॉनियन इंस्टीट्युटची स्थापना.
विसावे शतक
संपादन- १९१३ - दुसरे बाल्कन युद्ध-बुखारेस्टचा तह - युद्धाचा अंत.
- १९२० - पहिले महायुद्ध-सेव्ह्रेसचा तह - दोस्त राष्ट्रांनी ऑट्टोमन साम्राज्य आपसांत वाटून घेतले.
- १९८८ - दुसऱ्या महायुद्धात बेकायदेशीरपणे बंदिवासात टाकलेल्या जपानी वंशाच्या अमेरिकन नागरिकांना अमेरिकेने प्रत्येकी २०,००० डॉलर देण्याचे कबूल केले.
- १९९० - मॅगेलन अंतराळयान शुक्र ग्रहावर पोचले.
एकविसावे शतक
संपादन- २००६ - युनायटेड किंग्डमची गुप्त पोलीस संस्था स्कॉटलंड यार्डने इंग्लंडहून अमेरिकेला जाणारी विमाने नष्ट करण्याचा दहशतवाद्यांचा कट उधळून लावला.
जन्म
संपादन- १२६७ - जेम्स दुसरा, अरागॉनचा राजा.
- १३९७ - आल्बर्ट दुसरा, पवित्र रोमन सम्राट.
- १८६० - पंडित विष्णू नारायण भातखंडे, भारतीय संगीतकार, संगीततज्ञ.
- १८७४ - हर्बर्ट हूवर, अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष.
- १८९५ - हॅमी लव्ह, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९२३ - फ्रेड रिजवे, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९४३ - शफाकत राणा, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
- १९५८ - जॅक रिचर्ड्स, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९७० - ब्रेंडन ज्युलियन, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९७८ - क्रिस रीड, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९७९ - दिनुशा फर्नान्डो, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
संपादन- १७५९ - फर्डिनांड सहावा, स्पेनचा राजा.
- १९४५ - रॉबर्ट गॉडार्ड, अमेरिकन रॉकेटतज्ञ.
- १९७६ - बर्ट ओल्डफील्ड, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९८० - याह्या खान, पाकिस्तानचा राष्ट्राध्यक्ष.
- २००० - गिल्बर्ट पार्कहाउस, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
प्रतिवार्षिक पालन
संपादन- स्वातंत्र्य दिन - इक्वेडोर.
बाह्य दुवे
संपादन- बीबीसी न्यूजवर ऑगस्ट १० च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
ऑगस्ट ८ - ऑगस्ट ९ - ऑगस्ट १० - ऑगस्ट ११ - ऑगस्ट १२ - ऑगस्ट महिना