अपर्णा रामतीर्थकर
ॲडव्होकेट अपर्णा अरुण रामतीर्थकर (१९५५ - २८ एप्रिल, २०२०) या हौशी नाट्य कलावंत, स्त्रियांसाठी काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या, वकील आणि वक्त्या होत्या. मूळच्या पुण्याच्या असलेल्या रामतीर्थकर लग्नानंतर पत्रकार पती अरुण रामतीर्थकर यांच्याबरोबर सोलापूरला आल्या.
अपर्णा रामतीर्थकर यांनी सामाजिक व कौटुंबिक स्वास्थ्य टिकविण्यासाठी नात्यांवर तीन हजारांहून अधिक व्याख्याने दिली होती. त्यांनी ‘‘पाखर संकुल’‘, ‘‘उद्योगवर्धिनी’‘, इ. संस्थांबरोबर काम केले.
पुरस्कार
संपादन- प्रतापगड उत्सव समितीचा वीर जीवा महाले पुरस्कार