मे ७ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १२७ वा किंवा लीप वर्षात १२८ वा दिवस असतो.


ठळक घटना आणि घडामोडी

संपादन

एकोणिसावे शतक

संपादन
  • १८४९: स्त्री शिक्षणाच्या इतिहासातील महत्त्वाचा टप्पा: जॉन इलियट ड्रिंकवॉटर बेथुन यांनी ’कलकत्ता फिमेल स्कूल’ सुरू केले. या शाळेचे आता ’बेथुन कॉलेज’ मध्ये रूपांतर झाले आहे.
  • १८७८ : पुण्यात पहिले मराठी ग्रंथकारांचे संमेलन (आताचे साहित्य संमेलन) भरविण्यात आले
  • १८९५ : अलेक्झांडर पोपॉफने प्राथमिक रेडिओ रिसीव्हर वापरून रेडिओ संदेशवहनाचा प्रयोग यशस्वी केला
  • १८९९ : रॅंड वधाच्या प्रकरणी फितुरी करणाऱ्या द्रविड बंधूंना ठार मारणाऱ्या वासुदेव चाफेकर यांना फाशी

विसावे शतक

संपादन
  • १९०७: मुंबईत विजेवर चालणारी ट्रॅम सुरू झाली.
  • १९४५ : जर्मनीची दोस्त राष्ट्रांसमोर बिनशर्त शरणागती. युरोपमधील युद्ध समाप्त - युरोप विजय दिन
  • १९४६: सोनी ह्या कंपनीची स्थापना झाली.
  • १९५२ : जेफ्री डमर याने आधुनिक संगणनाचा आधार असलेल्या 'इंटिग्रेटेड सर्किट्स'ची संकल्पना प्रकाशित केली
  • १९५४ - १९५५पासून सर्व विषयांसाठी मराठी माध्यम आणण्याचा ठराव पुणे विद्यापीठाच्या विधिसभेत एकमताने मंजूर करण्यात आला
  • १९५५: एर इंडियाची मुंबई – तोक्यो विमानसेवा सुरू झाली.
  • १९७३ : अरुणाचल प्रदेशची राजधानी इटानगरचा पायाभरणी समारंभ
  • १९७६: होंडा एकॉर्डा या गाडी प्रकाशित करण्यात आली.
  • १९७८ : एव्हरेस्टची पहिली ऑक्सिजनरहित मोहीम यशस्वी
  • १९८० : जागतिक आरोग्य संघटनेने देवी रोगाचे उच्चाटन झाल्याचे जाहीर केले
  • १९९०: लता मंगेशकर यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान.
  • १९९२: एन्डेव्हर हे अंतराळयान आपल्या पहिल्या मोहिमेवर निघाले.
  • १९९४ : नेल्सन मंडेला दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी
  • १९९८: मर्सिडीज-बेंज कंपनी ने क्रिस्लर ही कंपनी ४० अब्ज अमेरिकन डॉलर्स मध्ये विकत घेतली ही इतिहासातील सर्वात मोठी औद्योगिक विलीनीकरण आहे.

एकविसावे शतक

संपादन

मृत्यू

संपादन

प्रतिवार्षिक पालन

संपादन
  • रेडियो दिन - रशिया.
  • जागतिक अस्थमा दिन
  • एड्समुळे अनाथ झालेल्यांचा जागतिक दिवस

बाह्य दुवे

संपादन




मे ५ - मे ६ - मे ७ - मे ८ - मे ९ - (मे महिना)