व्लादिमिर व्लादिमीरोविच पुतिन (रशियन: Владимир Владимирович Путин) (७ ऑक्टोबर, इ.स. १९५२ - हयात) हे संयुक्त रशियाचे दुसरे राष्ट्राध्यक्ष व सध्या रशियाचे पंतप्रधान, तसेच संयुक्त रशिया व रशिया आणि बेलारुस संघाच्या मंत्रिपरिषदेचे अध्यक्ष आहेत. ३१ डिसेंबर, इ.स. १९९९ रोजी रशियाचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बोरिस येल्त्सिन याच्या तडकाफडकी राजीनाम्यानंतर पुतिन राष्ट्राध्यक्ष बनले. इ.स. २००० सालातील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकींत पुतिन विजयी झाले. दुसऱ्यांदा अध्यक्षपदावर निवडून आल्यानंतर ते ७ मे, इ.स. २००८ पर्यंत पदारूढ होते.

व्लादिमिर व्लादिमीरोविच पुतिन
Vladimir Putin official portrait.jpg
जन्म व्लादिमिर व्लादिमीरोविच पुतिन
७ ऑक्टोबर, इ.स. १९५२
लेनिनग्राद, रशिया
निवासस्थान राजभवन रशिया
राष्ट्रीयत्व रशियन
नागरिकत्व रशियन
पेशा वकिल
कारकिर्दीचा काळ १९७५ पासून
पगार १२०००० अमेरिका डॉलर वार्षिक
पदवी हुद्दा रशियाचे राष्ट्रपती
कार्यकाळ ३१ डिसेंबर १९९९ ते ७ मे २००८
राजकीय पक्ष युनायटेड रशिया
धर्म ख्रिश्चन
जोडीदार ल्युडमिला
वडील व्लादिमीरोविच
आई मारिया
स्वाक्षरी

रशियन राज्यघटनेच्या अनिवार्य अटींमुळे पुतिन सलग तिसऱ्यांदा अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेऊ शकले नाहीत. इ.स. २००८ च्या निवडणुकीमध्ये जिंकलेला त्याचा उत्तराधिकारी दिमित्री मेदवेदेव, याने पुतिन यांचे नाव पंतप्रधानपदासाठी सुचवले. पुतिन यांनी ८ मे, इ.स. २००८ रोजी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली. सप्टेंबर, इ.स. २०११ मध्ये त्यांनी इ.स. २०१२ सालातील अध्यक्षीय निवडणूक लढवणार असल्याची घोषणा करून तिसर्‍यांदा अध्यक्ष बनण्याचा इरादा स्पष्ट केला.

देशात राजनैतिक स्थैर्य आणणे आणि कायदा सुव्यवस्था पुनःप्रस्थापित करण्याचे श्रेय पुतिन यांना दिले जाते.[१] दुसर्‍या चेचेन युद्धानंतर पुतिन यांनी राष्ट्रीय एकात्मता पुनःस्थापित केली. पुतिन यांच्या अध्यक्षीय कारकिर्दीत रशियन अर्थव्यवस्था आर्थिक संकटातून वर आली. सलग ९ वर्षे रशियन अर्थव्यवस्थेत वृद्धी होत आहे. देशाचे सकल आर्थिक उत्पन्न ७२% वाढले आहे [२] आणि गरिबी ५०%नी घटली.[३][४][५] देशातील जनतेचे सरासरी मासिक उत्पन्न ८० अमेरिकी डॉलरांहून वाढून ६४० अमेरिकी डॉलर झाले आहे[ संदर्भ हवा ]....

संदर्भसंपादन करा


या लेखाचा/विभागाचा सध्याचा मजकूर पुढील परभाषेत आहे : [[अनोळखी भाषा संकेत]] भाषेतून मराठी भाषेत अनुवाद करण्यास आपला सहयोग हवा आहे. ऑनलाइन शब्दकोश आणि इतर साहाय्यासाठी भाषांतर प्रकल्पास भेट द्या.
  1. ^ Krone-Schmalz, Gabriele. Was passiert in Russland? (German भाषेत). ०५/११/२०११ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ GDP of Russia from 1992 to 2007 International Monetary Fund Retrieved on 12 May 2008
  3. ^ Putin’s Eight Years Kommersant Retrieved on 4 May 2008
  4. ^ Russia’s economy under Vladimir Putin: achievements and failures RIA Novosti Retrieved on 1 May 2008
  5. ^ Putin’s Economy – Eight Years On. Russia Profile, 15 August 2007. Retrieved on 23 April 2008कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.