शिवाजीराव पटवर्धन (इ.स. १८९२ - इ.स. १९८६) हे मराठी समाजसेवक व भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील कार्यकर्ते होते. यांनी महाराष्ट्रातील अमरावती येथे इ.स. १९५० साली कृष्ठरोग्यांसाठी 'विदर्भ महारोगी सेवा मंडल तपोवन' निवासी सेवा आश्रम स्थापला. त्यांना त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल भारताच्या केंद्रशासनाने पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवले.

पटवर्धन पेशाने होमिओपॅथी वैद्यकशास्त्रातील वैद्य होते. इ.स. १९२०पासून ते सक्रिय राजकारणात सहभागी झाले. ते काही काळ विदर्भ प्रांतिक काँग्रेस समितीचे सचिव होते.