सर विन्स्टन लिओनार्ड स्पेन्सर-चर्चिल (इंग्लिश: Winston Leonard Spencer-Churchill) (नोव्हेंबर ३०, इ.स. १८७४ - जानेवारी २४, इ.स. १९६५) हा दुसऱ्या महायुद्धाच्या काळात युनायटेड किंग्डमाचे नेतृत्व करण्यासाठी नावाजलेला ब्रिटिश पंतप्रधान होता. तो इ.स. १९४० ते इ.स. १९४५ व नंतर इ.स. १९५१ ते इ.स. १९५५ या कालखंडांत दोनदा पंतप्रधानपदी अधिकारारूढ होता. प्रभावी वक्ता व नेता अशी प्रतिमा असलेला चर्चिल ब्रिटिश सैन्यातील माजी अधिकारी, इतिहासकार, लेखक व चित्रकारही होता. साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळवलेला हा एकमेव ब्रिटिश पंतप्रधान आहे. इ.स. १९५३ साली त्याला हे पारितोषिक मिळाले.[]

सर विन्स्टन चर्चिल

कार्यकाळ
२६ ऑक्टोबर १९५१ – ७ एप्रिल १९५५
राणी एलिझाबेथ दुसरी
मागील क्लेमेंट ॲटली
पुढील अँथनी ईडन
कार्यकाळ
१० मे १९४० – २६ जुलै १९४५
राजा सहावा जॉर्ज
मागील नेव्हिल चेम्बरलेन
पुढील क्लेमेंट ॲटली

जन्म ३० नोव्हेंबर, १८७४ (1874-11-30)
वूडस्टॉक, ऑक्सफर्डशायर, इंग्लंड
मृत्यू २४ जुलै, १९६५ (वय ९०)
लंडन

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ "The Nobel Prize in Literature 1953" (इंग्रजी भाषेत). १९ ऑक्टोबर २०१३ रोजी पाहिले. Unknown parameter |अनुवादीत title= ignored (सहाय्य)

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: