नोव्हेंबर ३०
दिनांक
(३० नोव्हेंबर या पानावरून पुनर्निर्देशित)
नोव्हेंबर ३० हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३३४ वा किंवा लीप वर्षात ३३५ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडीसंपादन करा
अठरावे शतकसंपादन करा
- १७८२ - अमेरिकन क्रांती - पॅरिसमध्ये अमेरिका व ग्रेट ब्रिटनच्या प्रतिनिधींनी प्राथमिक संधी करार मान्य केला. या करारावर १७८३ मध्ये पॅरिसचा तह म्हणून शिक्का-मोर्तब झाले.
एकोणविसावे शतकसंपादन करा
- १८०३ - न्यू ऑर्लिअन्स येथे स्पेनच्या प्रतिनिधीने लुईझियाना प्रांत फ्रांसच्या प्रतिनिधीकडे हस्तांतरित केला. २० दिवसांनी फ्रांसने हा प्रांत यू.एस.ला लुईझियाना परचेसचा हिस्सा महणून विकला.
- १८५३ - क्रिमीअन युद्ध - सिनोपच्या लढाईत रशियाच्या नौदलाने ऑट्टोमन जहाजांचा तांडा बुडविला.
- १८७२ - पहिला आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामना स्कॉटलंड वि. इंग्लंड हा हॅमिल्टन क्रेसेंट, ग्लासगो येथे खेळला गेला.
विसावे शतकसंपादन करा
- १९३९ - रशियाच्या सैन्याने फिनलंडवर चढाई करून मॅनरहाइम रेषेपर्यंत धडक मारली.
- १९४३ - दुसरे महायुद्ध - अमेरिकन अध्यक्ष फ्रॅंकलिन डी. रूझवेल्ट, ब्रिटीश पंतप्रधान विन्स्टन चर्चिल व सोव्हिएत अध्यक्ष जोसेफ स्टालिन यांचे ऑपरेशन ओव्हरलॉर्ड बद्दल एकमत झाले. ऑपरेशन ओव्हरलॉर्ड हे जून १९४४ मध्ये दोस्त राष्ट्रांच्या यूरोपवरील हल्ल्याच्या आराखड्याला दिलेले गुप्त नाव होते.
- १९६६ - बार्बाडोसला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
- १९६६ - दक्षिण यमनच्या प्रजासत्ताकला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
एकविसावे शतकसंपादन करा
- २००४ - लायन एर फ्लाइट ५३८ हे विमान इंडोनेशियाच्या जावा बेटावरील सुरकर्ता गावाजवळ कोसळले. २६ ठार.
जन्मसंपादन करा
- ५३९ - तूर्सचा ग्रेगोरी, फ्रांसचा इतिहासकार.
- १७५६ - अर्न्स्ट क्लाड्नी, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ.
- १७६८ - जेड्रेज स्नियाडेकी, पोलिश भौतिकशास्त्रज्ञ, रसायनशास्त्रज्ञ, जीवशास्त्रज्ञ, लेखक.
- १८१० - ऑलिव्हर विन्चेस्टर, अमेरिकन संशोधक.
- १८१७ - थियोडोर मोम्सेन, नोबेल पारितोषिक विजेता जर्मन लेखक.
- १८३५ - सॅम्युएल क्लेमेन्स तथा मार्क ट्वेन, अमेरिकन लेखक.
- १८४७ - अफोन्सो ऑगुस्तो मोरेरा पेना , ब्राझिलचा सहावा राष्ट्राध्यक्ष.
- १८५७ - बॉबी एबेल , इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १८५८ - जगदीशचंद्र बोस, भारतीय भौतिकशास्त्रज्ञ.
- १८६९ - गुस्ताफ डालेन, नोबेल पारितोषिक विजेता स्वीडिश भौतिकशास्त्रज्ञ.
- १८७४ - सर विन्स्टन चर्चिल, नोबेल पारितोषिक विजेता युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.
- १९१५ - हेन्री टॉब, नोबेल पारितोषिक विजेता कॅनडाचा रसायनशास्त्रज्ञ.
- १९३५ - आनंद यादव, मराठी लेखक.
- १९३६ - दिमित्री व्हिक्टोरोविच अनोसोव्ह, रशियन गणितज्ञ.
मृत्यूसंपादन करा
- १०१६ - एडमंड दुसरा, इंग्लंडचा राजा.
- १७१८ - चार्ल्स बारावा, स्वीडनचा राजा.
- १९०० - ऑस्कार वाइल्ड, आयरिश लेखक.
- १९०१ - एडवर्ड जॉन आयर, इंग्लिश शोधक.
- २००७ - एव्हेल कनीव्हेल, अमेरिकन साहसिक.
- २०१२ - विजय देवधर, मराठी लेखक.
प्रतिवार्षिक पालनसंपादन करा
- बार्बाडोस - स्वातंत्र्य दिन.
बाह्य दुवेसंपादन करा
- बीबीसी न्यूजवर नोव्हेंबर ३० च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
नोव्हेंबर २८ -नोव्हेंबर २९ -नोव्हेंबर ३० - डिसेंबर १ - डिसेंबर २ - (नोव्हेंबर महिना)