नोव्हेंबर २४
दिनांक
नोव्हेंबर २४ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३२८ वा किंवा लीप वर्षात ३२९ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
संपादन- १९२२ - आयरिश मुक्त राष्ट्राने लेखक आणि आयरिश रिपब्लिकन आर्मीचा सदस्य अर्स्किन चाइल्डर्स आणि इतर आठांना बेकायदेशीर रीत्या रिव्हॉल्वर बाळगल्याबद्दल गोळ्या घालून मृत्युदंड दिला.
- १९४० - दुसरे महायुद्ध-स्लोव्हेकियाने अक्ष राष्ट्रांशी हातमिळवणी केली.
- १९४३ - दुसरे महायुद्ध-यु.एस.एस. लिस्कोम बे या युद्धनौकेला टोरपेडो लागून बुडाली. ६५० ठार.
- १९४३ - दुसरे महायुद्ध-टोक्योवर ८८ अमेरिकन लढाऊ विमानांनी हल्ला चढवला. जपानी राजधानीवर झालेला हा पहिलाच थेट हल्ला होता.
- १९६३ - जॉन एफ. केनेडीचा खून करणाऱ्या ली हार्वे ऑसवाल्डचा डॅलस पोलीस स्थानकात जॅक रुबीने खून केला. योगायोगाने या प्रसंगाचे दूरचित्रवाणीवर देशभर प्रक्षेपण झाले.
- १९६५ - जोसेफ डेझरे मोबुटुने कॉंगोमध्ये उठाव करून सत्ता बळकावली.
- १९६६ - टॅब्सो फ्लाइट १०१ हे बल्गेरियाचे विमान चेकोस्लोव्हेकियाच्या ब्रातिस्लावा शहराजवळ कोसळले. ८२ ठार.
- १९७१ - डी.बी. कूपरने नॉर्थवेस्ट ओरियेंट एरलाइन्सच्या विमानातून लुटीच्या दोन लाख अमेरिकन डॉलर सह पॅराशूटच्या साहाय्याने उडी मारली. कूपरचा मागमूस आजतगायत लागलेला नाही.
- १९७६ - तुर्कस्तानच्या पूर्व भागात झालेल्या भूकंपात ४,०००-५,००० मृत्युमुखी.
जन्म
संपादन- १६५५ - चार्ल्स अकरावा, स्वीडनचा राजा.
- १६९० - हुनिपेरो सेरा, स्पेनचा ख्रिश्चन धर्मप्रसारक.
- १७८४ - झकॅरी टेलर, अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष.
- १८५३ - बॅट मास्टरसन, अमेरिकन गुंड.
- १८६९ - ॲंतोनियो ऑस्कार कार्मोना, पोर्तुगालचा ९७वा पंतप्रधान आणि ११वा राष्ट्राध्यक्ष.
- १८७७ - आल्बेन बार्कली, अमेरिकेचा उपराष्ट्राध्यक्ष.
- १८७७ - कावसजी जमशेदजी पेटीगरा, भारतातील गुन्हे अन्वेषण शाखेचा (सी.आय.डी.) कमिशनर.
- १८८४ - इत्झाक बेन-झ्वी, इस्रायेलचा राष्ट्राध्यक्ष.
- १८८७ - एरिक फॉन मॅनस्टाईन, दुसऱ्या महायुद्धातील जर्मन सेनानी
- १८८८ - डेल कार्नेगी, अमेरिकन लेखक.
- १८९४ - हर्बर्ट सटक्लिफ, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १८९९ - वन यिदुओ, चिनी भाषेमधील कवी, लेखक.
- १९४६ - टेड बंडी, अमेरिकन मारेकरी.
- १९५५ - इयान बॉथम, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९६१ - अरुंधती रॉय, भारतीय लेखक.
- १९७८ - कॅथरिन हाइगल, अमेरिकन अभिनेत्री.
मृत्यू
संपादन- ६५४ - सम्राट कोतोकू, जपानी सम्राट
- १८४८ - विल्यम लॅम्ब, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान
- १९२९ - जॉर्जेस क्लेमेन्सू, फ्रांसचा पंतप्रधान
- १९६३ - मारोतराव कन्नमवार, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री
- १९६५ - अब्दुल्ला तिसरा अल-सलीम अल-साबाह, कुवैतचा अमीर
- १९९१ - फ्रेडी मर्क्युरी, ब्रिटिश संगीतकार
- २००९ - समाक सुंदरावेज, थायलंडचा पंतप्रधान
प्रतिवार्षिक पालन
संपादननोव्हेंबर २२ - नोव्हेंबर २३ - नोव्हेंबर २४ - नोव्हेंबर २५ - नोव्हेंबर २६ - नोव्हेंबर महिना
बाह्य दुवे
संपादन- बीबीसी न्यूजवर नोव्हेंबर २४ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)