अब्दुल्ला तिसरा अल-सलीम अल-साबाह

अब्दुल्ला तिसरा अल-सलीम अल-साबाह (अरबी:عبد الله الثالث السالم الصباح‎‎; इ.स. १८९५ - २४ नोव्हेंबर, इ.स. १९६५) हा कुवैतचा अमीर होता. १९५० पासून मृत्यूपर्यंत सत्तेवर असलेल्या अब्दुल्लाने पूर्वीचे ब्रिटिशधार्जिणे धोरण सोडून अरबी राष्ट्रांशी मेळ साधला.