Jagdish Chandra Bose (es); Jagadish Chandra Bose (ms); Jagadish Chandra Bose (en-gb); Jagadish Chandra Bose (ro); جگدیش چندر بوس (ur); Jagdish Chandra Bose (sv); Джагдіш Чандра Бос (uk); 賈格迪什·錢德拉·博斯 (zh-hant); 贾格迪什·钱德拉·博斯 (zh-cn); Bos Jagdish Chandra (uz); জগদীশ চন্দ্ৰ বসু (as); Jagadish Chandra Bose (eo); Džagadíščandra Bose (cs); জগদীশচন্দ্র বসু (bn); Jagadish Chandra Bose (fr); डा (सर) जगदीश चन्द्र बोस (anp); जगदीशचंद्र बोस (mr); Jagadish Chandra Bose (vi); डा. जगदीश चन्द्र बोस (awa); Jagadish Chandra Bose (pt-br); 贾格迪什·钱德拉·博斯 (zh-sg); Jagadish Chandra Bose (nn); Jagadish Chandra Bose (nb); ಜಗದೀಶ್ಚಂದ್ರ ಬೋಸ್ (kn); Jagadish Chandra Bose (en); جاجاديش تشاندرا بوس (ar); Sri Jagadish Chandra Bose (gom); જગદીશચંદ્ર બોઝ (gu); Jagadish Chandra Bose (eu); جاقادیش چاندرا بوس (azb); Jagadish Chandra Bose (de-ch); डा. जगदीश चन्द्र बोस (mai); Jagadish Chandra Bose (sq); Ջագադիշ Բոս (hy); 贾格迪什·钱德拉·博斯 (zh); Jagadish Chandra Bose (da); डा. जगदीश चन्द्र बोस (ne); ジャガディッシュ・チャンドラ・ボース (ja); جاجاديش تشاندرا بوس (arz); ג'אגדיש צ'נדרה בוס (he); जगदीशचन्द्रबोसः (sa); जगदीश चन्द्र बसु (hi); జగదీశ్ చంద్ర బోస్ (te); ਜਗਦੀਸ਼ ਚੰਦਰ ਬੋਸ (pa); Jagadish Chandra Bose (en-ca); ஜகதீஷ் சந்திர போஸ் (ta); Jagadish Chandra Bose (it); Jagadish Chandra Bose (ht); Jagadish Chandra Bose (et); Jagadish Chandra Bose (pt); Jagadish Chandra Bose (nl); Jagadish Chandra Bose (oc); Jagadish Chandra Bose (tr); 자가디시 찬드라 보스 (ko); Jagadish Chandra Bose (sl); ჯაგდიშ ჩანდრა ბოსი (ka); جگدیش چندر بوس (pnb); डा. जगदीश चन्द्र बोस (dty); Jagadish Chandra Bose (id); Jagadis Chandra Bose (pl); ജഗദീഷ് ചന്ദ്ര ബോസ് (ml); 賈格迪什·錢德拉·博斯 (zh-tw); Jagadish Chandra Bose (de); Джагдиш Чандра Бос (ru); جاگادیش چاندرا بوز (fa); 賈格迪什·錢德拉·博斯 (zh-hk); Jagadish Chandra Bose (ca); Jagadish Chandra Bose (fi); 贾格迪什·钱德拉·博斯 (zh-hans); Jagadish Chandra Bose (ga) fisico e botanico indiano (it); বাঙালি পদার্থবিদ, উদ্ভিদবিদ, জীববিজ্ঞানী ও কল্পবিজ্ঞান রচয়িতা (bn); physicien et botaniste indien, pionnier de la radio (fr); જગદીશ ચંદ્ર બોઝ (gu); भारत के वैज्ञानिक (anp); ލިޔުންތެރިއެއް (dv); бенгальский учёный-энциклопедист (ru); Bengali polymath, physicist, and biologist (1858-1937) (en); indischer Physiker und Botaniker (de); físico, biólogo, botânico, arqueólogo (pt); فیزیک‌دان هندی (fa); indisk fysiker (da); científic indi (ca); indisk fysikar (nn); Polímota indio (es); indisk fysiker (sv); indyjski uczony, profesor w Kalkucie (pl); indisk fysiker (nb); Indische homo universalis, fysicus, bioloog, plantkundige en archeoloog (nl); intialainen fyysikko ja kasvitieteilijä (fi); भौतिक विज्ञानी, जीवविज्ञानी और वनस्पतिशास्त्री (hi); భారతీయ భౌతిక, జీవ, వృక్ష, మరియు పురాతత్వ శాస్త్రవేత్త (te); ਭੌਤਿਕ ਵਿਗਿਆਨੀ (pa); Bengali polymath, physicist, and biologist (1858-1937) (en); פיזיקאי, ביולוג ובוטנאי (he); bengálský vědec a spisovatel (cs); இயற்பியலாளர், உயிரியலாளர் மற்றும் பல்துறை வித்தகர் (ta) J. Chandra Bose, Jadadish Chandra Bose, J Chandra Bose, Jagadish Chandra Bose (es); স্যার জগদীশ চন্দ্র বসু, আচার্য জগদীশচন্দ্র বসু (bn); Jagadish (fr); Sir Jagadish Chandra Bose (et); Джагдиш Чандра Боше, Боше, Джагдиш Чандра, Бос, Джагдиш Чандра (ru); जगदीश चंद्र बोस (mr); 賈加迪什·錢德拉·玻色 (zh); Acharya Sir Jagadish Chandra Bose (tr); جگدیش چند بوس (ur); Bose, Jagdish Chandra (sv); जगदीश चन्द्र बसु (anp); Sir Jagadish Chandra Bose (id); J.C. Bose (it); ജെ. സി. ബോസ്, സർ ജഗദീഷ് ചന്ദ്ര ബോസ്, Jagdish Chandra Bose, Jagadish Chandra Bose (ml); Acharya Jagadishchandra Bosu, Jagadishchandra Bosu, Response in the Living and Non-living, Bose, Sir Jagadis Chandra, Sir Jagadis Chandra Bose, Jagdishchandra basu, J. C. Bose, Jagadis Bose, Jagadish Bose, J.C. Bose, Jagadish Chandra Bosu, Jagdish Chandra Bose, Jagadis Chandra Bose, Jagdish Bose, JC Bose, Jagadish Chandra Bose (as); जगदीश चन्द्र बोस (sa); जगदीशचंद्र बसु, जगदीश चन्द्र वसु, डा (सर)जगदीश चन्द्र बोस, डा जगदीश चन्द्र बोस, डा (सर) जगदीश चन्द्र बोस (hi); జగదీశ్‌చంద్ర బోస్, జగదీశ్ చంద్రబోస్, జగదీష్ చంద్రబోస్ (te); ಜಗದೀಶ್ ಚಂದ್ರ ಬೋಸ್, ಜಗದೀಶ್‌ಚಂದ್ರ ಬೋಸ್ (kn); Jagadis Chunder, Sir Jagadish Chandra Bose (en); Sir Jagadish Chandra Bose (ro); Sir Jagadis Chandra Bose, Jagadisacandra Bojha (cs); சகதீசு சந்திர போசு (ta)

डॉ. (सर)जगदीशचंद्र बसु (बंगाली:জগদীশচন্দ্র বসু) (१८५८-१९३७) हे एक भारतीय जीवशास्त्रज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ, वनस्पतीशास्त्रज्ञ तसेच पुरातत्त्वज्ञ होते. भारतीय महान शास्त्रज्ञ जगदीशचंद्र बोस यांचे वनस्पती विषयावरील कार्य महान आहे

जगदीशचंद्र बोस 
Bengali polymath, physicist, and biologist (1858-1937)
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
स्थानिक भाषेतील नावজগদীশ চন্দ্র বসু
जन्म तारीखनोव्हेंबर ३०, इ.स. १८५८
Bikrampur (बंगाल प्रांत, ब्रिटिश राज)
मृत्यू तारीखनोव्हेंबर २३, इ.स. १९३७
गिरिडीह (बंगाल प्रांत, ब्रिटिश राज)
नागरिकत्व
शिक्षण घेतलेली संस्था
Doctoral advisor
व्यवसाय
नियोक्ता
सदस्यता
कार्यक्षेत्र
मातृभाषा
उत्कृष्ट पदवी
  • Knight Bachelor (इ.स. १९१६ – )
भावंडे
  • Labanyaprabha Bose
वैवाहिक जोडीदार
  • Abala Bose (इ.स. १८८७ – Unknown)
उल्लेखनीय कार्य
  • Abyakta
पुरस्कार
  • Fellow of the Royal Society
  • ऑर्डर ऑफ दी इंडीयन एम्पायरचे सहकर्मी (इ.स. १९०३)
  • Companion of the Order of the Star of India (इ.स. १९१२)
  • honorary doctor of the University of Calcutta
  • Knight Bachelor
स्वाक्षरी
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr
जगदीशचंद्र बोस
जगदीशचंद्र बोस

जन्म व बालपण

संपादन

पूर्व बंगालमधील डाक्का जिल्ह्यातील राणीखल या खेडेगावात ३० नोव्हेंबर १८५८ रोजी जगदीशचंद्र बोस यांच्या जन्म झाला. त्यांचे वडील भगवानचंद्र बसू हे सरकारी नोकरीत सब डिव्हिजनला ऑफिसर होते. त्या काळी इंग्रजीत जसे ठाकूरचे टागोर झाले, तसेच बसू आडनावाचे इंग्रजी स्पेलिंग बोस झाले.

 

जगदीशचंद्रांचे घराणे हे बंगाल प्रांतातील एक खानदानी घराणे होते. त्यांची आई साध्वी व सुशील होती. लहानपणापासूनच जगदीशचंद्र आजूबाजूचा निसर्ग पहायचे, त्याचे निरीक्षण करायचे. निसर्गातील अनेक गोष्टी पाहून त्या अशाच का, असा प्रश्न त्यांना पडे. भगवानचंद्र सुद्धा न कंटाळता छोट्या जगदीशने विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देत असे. सर्व झाडे एकाच वेळी का फुले देत नाहीत? एखाद्या झाडाची पालवी पोपटी हिरवी पण दुसऱ्याची तांबूस असा फरक का पडतो? असे त्यांना वाटे. झाडे, फुले, फुलपाखरे, भोवतीचा निसर्ग यांचे निरीक्षण करणे हा त्यांचा आवडता छंद होता.

शिक्षण

संपादन

डॉ. जगदीशचंद्र बोस कोलकाता येथील सेंट झेवियर शाळा आणि त्याच नावाच्या महाविद्यालयात शिकले. त्यानंतर इंग्लंडच्या ख्राईस्ट चर्च महाविद्यालयातून भौतिकी, रसायन वनस्पतिशास्त्र आणि निसर्गविज्ञानाचा अभ्यास पूर्ण करून ते भारतात परत आले. या काळात त्यांना भौतिकशास्त्रज्ञ लॉर्ड रॅली यांचे मार्गदर्शन लाभले.

 
बोस यांनी १८९७ मध्ये बनविलेले मायक्रोवेव्ह निर्मितीचे उपकरण

विद्युतशक्तीवरील संशोधन

संपादन

इंग्लंडकोलकाता येथील प्रेसिडेन्सी महाविद्यालयात १८८५ ते १९१५ अशी ३० वर्षे भौतिकशास्त्र शिकवत असतानाच जगदीशचंद्रांनी विद्युतशक्तीवर संशोधन केले. विद्युत चुंबकीय तरंगांचा शोध घेऊन त्यांनी बॅटरी बनवली. या शोधाची कीर्ती सर्वदूर पसरली. प्रसिद्ध शास्त्रज्ञ पोइंकर आणि जे. जे. थॉम्पसन यांच्या लिखाणात या शोधाचा उल्लेख आला आहे. नेमेलाइटच्या मदतीने संदेश पाठवण्यात त्यांना यश मिळाले होते.

.इ.स. 1896 मध्ये रेडिओ संदेश वहनाचे प्रयोग  मार्कोनीने केले.व त्या आधी 1895 मध्ये जगदीशचंद्रांनी ते केेले. हे आता अमेरिकेत मान्य.{१}

वनस्पती शास्त्रातील संशोधन

संपादन

विद्युतशक्तीवरील संशोधनानंतर बोस हे वनस्पतिशास्त्राकडे वळले. सचेतन आणि अचेतन वस्तूतील साम्य आणि भेद याचा त्यांनी अभ्यास केला. स्नायू, मज्जातंतू, सुखदुःख आदी विकार यांचा वनस्पतीबाबत त्यांनी धांडोळा घेतला. डायामेट्रिकल कोन्ट्रॅक्शन अ‍ॅपरेटस, रेझोनंट रेकॉर्डर्स ही दोन उपकरणे तयार करून त्यांनी त्यांच्या साहाय्याने थंडी, प्रकाश, विद्युत, उष्णता या घटकांचा वनस्पती व प्राणी यांच्यावरील परिणामांचा अभ्यास केला. वनस्पतींचे श्वसन, रुधिराभिसरण पद्धतीने होणारे त्यांच्यातील कार्य, अन्नाची ने-आण निरुपयोगी वस्तूंचा निचरा हे त्यांच्या संशोधनाचे विषय होते. वनस्पतीमध्ये होणाऱ्या सूक्ष्म बदलांची माहिती ठेवून त्याच्या नियमित नोंदी त्यांनी ठेवल्या. त्यावर संशोधन केले. त्यांच्या याच संशोधनातून ‘वनस्पतींना संवेदना असतात’ हे त्यांनी सिद्ध केले. भारतीय वैज्ञानिक सोहिनी चक्रबोर्ती यांनी २०१६ मध्ये प्रसिद्ध केलेल्या संशोधनातून ही प्रक्रिया उलगडून दाखविली आहे.[][] वनस्पतिशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी रेझोनंट रेकॉर्डर, ऑसिलेटिंग रेकॉर्डर, कंपाऊंड लेव्हलर, क्रेसकोग्राफ, बॅलिन्सिंग अ‍ॅपरेट्स आदी उपकरणे तयार केली

संस्थास्थापना आणि लेखन

संपादन

जगदीशचंद्र बोस यांनी सन १९१७मध्ये कोलकाता येथे बोस रिसर्च इन्स्टिट्यूट Archived 2006-06-15 at the Wayback Machine. नावाची संस्था स्थापन करून एक मुखपत्रही सुरू केले.

लिहिलेली पुस्तके

संपादन
  • इरिटेबिलिटी ऑफ प्लॅंट्स
  • इलेक्ट्रो-फिजिओलॉजी ऑफ प्लॅंट्स
  • ट्रॉपिक मुव्हमेंट अँड ग्रोथ ऑफ प्लॅंट्स
  • दि नव्‍‌र्हस मेकॅनिझम ऑफ प्लॅंट्स
  • प्लॅंट रिस्पॉन्स (१९०६)
  • दि फिजिऑलॉजी ऑफ फोटोसिंथेसिस
  • दि मोटार मेकॅनिझम ऑफ प्लॅंट्स
  • रिस्पॉन्सेस इन द लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग (१९०६)
  • लाइफ मुव्हमेंट्स ऑफ प्लॅंट्स (भाग १ ते ४)

मृत्यू

संपादन

डॉ. जगदीशचंद्र बोस यांचे वयाच्या ७९व्या वर्षी २३ नोव्हेंबर, १९३७ रोजी निधन झाले.

संदर्भ व नोंदी

संपादन

१. लेले य.शं. , इतिहासातील सुवर्णकण