मॅरॅथॉन

४२.१९५ कि.मी. इतक्या लांब पल्ल्याची धावण्याची शर्यत
(मॅरेथॉन शर्यत या पानावरून पुनर्निर्देशित)

मॅरॅथॉन म्हणजे लांब पल्ल्याची, धावण्याची शर्यत किंवा धावणे. ह्या पूर्ण लांबीच्या शर्यतीचे अंतर असते ४२.१९५ किमी किंवा २६ मैल ३८५ यार्ड. ह्या शर्यतीमध्ये, सर्वसाधारणपणे, रस्त्यांवरूनच धावतात. मॅरॅथॉन शर्यत ही प्रमुख रस्त्यांवरून घेतली जाते. रहदारीच्या मार्गाचा अडथळा होत असल्यास अथवा अन्य कारणांमुळे हे शक्य होत नसेल तर रस्त्याच्या बाजूस असलेल्या सायकल मार्गावरून (फूटपाथ) घ्यावी लागते. मात्र गवताळ मार्गावरून ही शर्यत घेतली जात नाही. शर्यतीची सुरुवात व शेवट क्रीडांगणावर घेतली जाते. सर्व स्पर्धकांना दिसेल अशा रितीने किलोमीटर व मैल अंतराचे फलक शर्यतीच्या रस्त्यावर लावलेले असतात. शर्यतीच्या सुरुवातीपासून पाच किलोमीटर अंतरावर खेळाडूंना खाद्य पदार्थ व पेय मिळण्याचे ठिकाण असते. त्या पुढे तशीच व्यवस्था पाच किलोमीटर वर []केलेली असते.

बर्लिन मॅरॅथॉन मधील एक चित्र

इतिहास

संपादन

प्राचीन काळी ग्रीस देशामधे मॅरॅथॉन नावाचे एक गाव होते; तिथे एक लढाई झाली असता, ती लढाई जिंकल्यावर, ती बातमी सांगण्यासाठी एक सैनिक तिथपासून ते अथेन्सपर्यंत धावत गेला होता. ते अंतर ४२.१९५किमी होते. ज्या गावी लढाई ही झाली, त्या गावाचे नाव 'मॅरॅथॉन' हे स्पर्धेचे नाव झाले आणि जे अंतर तो सैनिक पळला ते अंतर स्पर्धेसाठी अधिकृतरित्या स्विकारले गेले. दुर्दैवाने हा स्पर्धक पूर्ण सैनिकी वेषात होता. अवजड चिलखत आणि भलीमोठी तलवार इत्यादी गोष्टी घेऊन धावला होता. यात अतिश्रम होऊन तो पोहोचताच विजयाचा निरोप देऊन मरण पावला.

स्पर्धा

संपादन

आधुनिक काळातील ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये या खेळाचा अंतर्भाव १८९६ पासून केला गेला. परंतु सुरुवातीच्या काळात स्पर्धेचे अंतर स्पर्धेनुसार बदलत राही. सध्याचे अंतर पूर्ण मेरेथोंचे ४२.१९५ किमी हे अंतर १९२१ सालापासून प्रमाणित गेले गेले. जगात, ही स्पर्धा ऑलिम्पिक व्यतिरिक्तही, जवळ जवळ ५००हून अधिक ठिकाणी घेतली जाते. नागपूर,मुंबई, ठाणेपुणे जळगाव येथेही ही स्पर्धा आयोजित केली जाते.

क्षमता

संपादन
 
मुंबई येथे २००८ मध्ये झालेल्या स्पर्धेत धावणारे लोक

या स्पर्धे साठी दीर्घकाळ धावण्याचे परिश्रम करीत राहण्याची क्षमता बणवणे आवश्यक असते.दररोज सराव करणं आवश्यक असतं.तसेच त्यात वेग नेमका ठेवून शेवट पर्यंत थकवा न येणे आवशयक असते. शंभरवर्षीय खेळाडू फौजासिंग यांनी हॉंगकॉंग मध्ये १० किलोमीटर मॅरॅथॉन धावण्याची स्पर्धा एक तास बत्तीस मिनिटे व अट्ठावीस सेकंदात पूर्ण केली होती.

हे सुद्धा पहा

संपादन
  1. ^ तावडे रमेश आणि भागवत, राम (१९८४). मैदानी स्पर्धा नियम व आयोजन. पुणे: ट्रॅक ॲण्ड फील्ड पब्लिकेशन. pp. १०३.