अमेरिकेचे संविधान

अमेरिकेतील पायाभूत कायदा

अमेरिकेचे संविधान हा अमेरिकेतील पायाभूत कायदा (legal basis) आहे. यात अमेरिकेतील केन्द्रीय सरकारची रचना, कामकाज व अधिकारांची व्याख्या करण्यात आलेली आहे. याशिवाय केन्द्रीय सरकार, घटक राज्ये आणि अमेरिकेचे नागरिक आणि अनागरिक रहिवासी यांच्यातील नाते व जबाबदाऱ्यांचीही व्याख्या करण्यात आलेली आहे.

हे संविधान सप्टेंबर १७, इ.स. १७८७ रोजी फिलाडेल्फिया येथे भरलेल्या संवैधानिक अधिवेशनात स्वीकृत केले गेले आणि त्यानंतर अमेरिकेच्या त्यावेळच्या तेरा राज्यांनी एकानंतर एक आपल्या नागरिकांच्या वतीने स्वीकारले. संविधान अमलात आल्यानंतर त्यात २७ वेळा बदल करण्यात आलेले आहेत. पैकी पहिले दहा बदलांना अमेरिकेच्या नागरिकांचा हक्कनामा म्हणतात.[१][२]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

संदर्भ आणि नोंदीसंपादन करा

  1. ^ विकिसोर्स. "विकिसोर्स:अमेरिकेचे संविधान (इंग्लिश मजकूर)". २००७-१२-१६ रोजी पाहिले.
  2. ^ लायब्ररी ऑफ काँग्रेस. "अमेरिकेच्या इतिहासातील मूलभूत दस्तावेज: अमेरिकेचे संविधान". २००७-१२-१६ रोजी पाहिले.