हिंदू मंदिरांचा विध्वंस

इतिहासकाळात मुसलमान व ख्रिस्ती लोकांनी अनेक हिंदू व बौद्ध मंदिरांचा विध्वंस केला आहे.[१] यामध्ये हिंदू मूर्ती भंजन हा फार मोठा भाग होता असे दिसून येते. हिंदू धर्मातील प्रमुख तीर्थस्थाने असलेल्या मंदिरांची तोडफोड झाल्याचे दिसून येते. गझनीच्या महमूदाने सोमनाथाचे मंदिर फोडले अशी ऐतिहासिक नोंद आहे. यावेळी येथील जबरदस्तीने केलेले हिंदूंचे धर्मांतर केले होते. तसेच हा विध्वंस करतांना दस्तऐवजीकरण केलेले हिंदू हत्याकांड करण्यात आले. चौदाव्या शतकापर्यंत भारतात अनेक हिंदू मंदिरांचा विध्वंस झाला.[२] बाबर या क्रूर इस्लामी शासकाने इ.स. १५२७ मध्ये प्रभू श्रीरामांचे अयोध्या येथे असलेले भव्य मंदिर उद्ध्वस्त केले. आणि यथे बाबरी मशीद उभारली. या प्रसंगीही जबरदस्तीने केलेले हिंदूंचे धर्मांतर केले होते असे दिसून येते.

गझनीच्या महनमूद् ने पाडलेल्या सोमनाथ मंदिराची स्थिती दाखवणारे जुने चित्र
गझनीच्या महनमूद् ने पाडलेल्या सोमनाथ मंदिराची स्थिती दाखवणारे जुने चित्र

दिल्लीतील मंदिरांचा विनाश

संपादन

मूळ विश्वनाथ मंदिर, सुरुवातीला आदि विश्वेश्वर मंदिर म्हणून ओळखले जाणारे ११९४ मध्ये मध्ये घुरीडांनी नष्ट केले त्याच्या जागी रझिया मशीद बांधण्यात आली. मुइज्ज अल-दिन मुहम्मद इब्न ने भारतावर हल्ला केलाकाशी शहर उद्ध्वस्त केले. दिल्लीतील कुतुब मिनारजवळील कुव्वत-उल-इस्लाम मशीद ही २७ मंदिरांना पाडून बांधण्यात आली होती. कुतुब मिनारजवळ अनेक मंदिरांचे अवशेष सापडले आहेत, ज्यात गणेश मंदिर आहे. यावरून सिद्ध होते की, तिथे गणेशाची मंदिरे होती. मंदिरे पाडल्यानंतर निघालेल्या दगडांपासून कुव्वत-उल-इस्लाम मशीद बांधण्यात आली होती. एवढेच नाही तर, त्या ठिकाणी अरबी भाषेत लिहिलेल्या शिलालेखांमध्येही याचा उल्लेख आढळतो. यात २७ मंदिरांना पाडून मशीद बांधल्याचे लिहिले आहे.[३] मशिदीच्या पूर्वेकडील दारावर एक शिलालेख चिथावणीखोर भाषेत लिहिला आहे. त्यात स्पष्टपणे नमूद आहे की, २७ मंदिर पाडल्यानंतर मिळालेल्या साहित्यात मशिदीची उभारणी झाली आहे. अशा रीतीने हिंदूच्या छळासाठीदेवालयांचा विध्वंस केल्याचे दिसून येते.

औरंगजेबाने केलेला विनाश

संपादन

धर्मांध औरंगजेबाने उत्तर भारतातील अनेक मंदिरे उध्वस्त केली आणि त्याची त्याच्या बखरकारांनी व्यवस्थित नोंद ठेवलेली दिसते. ९ एप्रिल १६६९ रोजी त्याने ‘काफरांच्या सर्व शाळा व देवालये’ पाडून टाकण्यात यावी असा एक इस्लामी धर्मांध फतवा काढला. त्यानुसार अनेक मंदिरे पाडली गेली. औरंगजेबाने उदयपूर आणि आक्रमण करून संपूर्ण मेवाड जाळून उद्ध्वस्त केले. त्याने उदयपुरातील तीन प्रमुख मंदिरांचा विध्वंस केला तर मेवाडमधील १७३ मंदिरे उद्ध्वस्त केली अशी नोंद आहे. मेवाड उर्फ उदयपूर हे राजस्थानातील एकमेव स्वतंत्र हिंदू राज्य होते. त्यांचे हे अस्तित्व औरंगजेबाला असह्य होत होते. १६४४म ध्ये गुजरातच्या सुभादारीवर असताना औरंगजेबाने कर्णावतीनगरी (अहमदाबाद) येथील चिंतामणी गणेशाचे नवीन बांधलेले देवालय एका गायीची कत्तल करून बाटवले आणि पुढे त्याचे मशिदीत रूपांतर केले. त्यावेळी त्यानी गुजरातमधली अनेक देवालये पाडली.

वाराणसी

संपादन
 
आधी ज्ञानवापी मंदिर पाडून मशीद बनवलेले हे विश्वेश्वर, बनारसचे मंदिराचे युरोपिय चित्रकाराने काढलेले जुने चित्र.

“मोहम्मद घौरी” या धर्मांध आक्रमकाने नेमलेल्या आणि भारतात “इस्लामी” राजवट स्थापित करणारा कुतुमुद्दिन एबक याने काशीचे भव्य मंदिर पाडले अशी ऐतिहासिक नोंद आहे. हे मंदिर पाडले. राजा तोरडमल याने हे मंदिर पुन्हा बांधले. १७व्या शतकात क्रूर आणि धर्मांध इस्लामी शासक औरंगजेबाने ज्ञानवापी हे भव्य मंदिर पाडून येथे मशिद बांधली होती.[४]

बौद्धांवर आक्रमण

संपादन

बौद्ध धर्माच्या इतिहासाप्रमाणे बौद्ध धर्माच्या स्वरूपात अनेक स्थित्यंतरे होत गेली व या काळात इस्लामची आक्रमणे भारतात झाली, त्याची परिणती हळूहळू त्याचा लय होण्यात झाली.[५] इस्लामने बौद्ध धर्माचा नाश केवळ भारतातच नव्हे तर जगात जिथे इस्लाम पोचला तिथे त्याने या धर्माचा नाश केला. बॅक्ट्रिया-पाíथया, अफगाणिस्तान, गांधार, चायनिज, तुर्कस्थान एवढेच नव्हे तर नालंदा येथील विद्यापीठे मुस्लिम आक्रमकांनी ध्वस्त केली. हजारोंच्या संख्येत बुद्ध भिक्खू परागंदा झाले. मुस्लिम आक्रमकांनी मोठय़ा संख्येत बौद्ध साधूंना ठार मारले व बुद्धविहार जमीनदोस्त केले.[६]

विजयनगर या बलाढ्य हिंदू साम्राज्याची राजधानी असलेल्या हंपीचा मुस्लिम आक्रमकांनी विध्वंस केला होता.[७]

भारताची फाळणी

संपादन

दंगली

संपादन

१९२४ मध्ये झालेल्या गुलबऱ्याच्या दंगलीत मुसलमानांनी हिंदूंच्या अनेक मंदिरांचा विध्वंस केला.[८]

पाकिस्तान

संपादन

पाकिस्तान येथे आजही हिंदू मंदिराची विटंबना आणि विध्वंस चालू आहे.[९]

बांग्लादेश

संपादन

येथे आजही हिंदू मंदिराची विटंबना आणि विध्वंस चालू आहे आणि अल्पसंख्याकांचे संरक्षण करण्यात बांगलादेश सरकार अपयशी ठरते. इ.स. २०२१ मध्ये खुलना या गावात हिंदूंच्या मंदिरांवर हल्ला करून देवीदेवतांच्या १० मूर्त्या फोडण्यात आल्या आहेत. या वेळी शियाली महास्मशान मंदिरावर हल्ला केला हरी मंदिर, दुर्गा मंदिर, गोविंदा मंदिरात तोडफोड केली.[१०]

इंग्लंड

संपादन

इंग्लंडमध्ये पद्धतशीर पणे हिंदू मंदिरांचा विध्वंस आणि हिंदू विरोधी हिंसाचार धार्मिक छळ आणि होत असल्याचे दिसून येते. यात हिंदू विरोधी भावना सोशल मिडियाद्वारे पसरवली जात आहे असे दिसून येते. तसेच या हल्ल्यांना हिंदूच जबाबदार आहेत असा अपप्रचारही केला गेलेला दिसून येतो. हिंदूंवर इ.स.२०२२ मध्ये ही हिंदू मंदिरांवर हल्ले होत असल्याचे दिसून येते. ब्रिटनच्या बर्मिंगहॅममध्ये मुस्लिम जमावाने एका हिंदू मंदिराची तोडफोड केली.[११] हिंदूंच्या मंदिरांवर हल्ले झाले आहेत आणि हिंदूंच्या विरोधात निंदनीय भाषणे दिली गेली आहेत. हे हल्ले इस्लामी जमावाने केले होते आणि संपूर्ण ब्रिटनमधील हिंदू समुदायाला मोठ्या प्रमाणात भीती निर्माण झाली आहे. तसे हिंदू व्यवसायांची अपरीमीत हानी झाली आहे, असे ब्रिटीशांच्या संसदीय गटाचे (एपीपीजी) कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे खासदार अध्यक्ष बॉब ब्लॅकमन यांनी संससदेत म्हंटले आहे.[१२]

संदर्भ

संपादन
 1. ^ "देवालय". मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती. 2019-07-04. 2022-09-16 रोजी पाहिले.
 2. ^ टीम, एबीपी माझा वेब (2018-11-24). "श्रीरामाची अयोध्या... प्रवास निर्मिती ते विध्वंसाचा". marathi.abplive.com. 2022-09-16 रोजी पाहिले.
 3. ^ "Tarun Bharat : २७ मंदिरांचा विध्वंस करून बांधली होती कुव्वत-उल-इस्लाम मशीद". Tarun Bharat. 2022-09-16 रोजी पाहिले.[permanent dead link]
 4. ^ "ज्ञानवापी : कोर्टाचा 86 वर्षे जुना निर्णय का आलाय चर्चेत? निकालावर होणार परिणाम?". News18 Lokmat. 2022-06-03. 2022-09-16 रोजी पाहिले.
 5. ^ "इस्लामच्या आक्रमणामुळेच बौद्ध धर्माचा लोप – RMP" (इंग्रजी भाषेत). 2022-09-16 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-09-16 रोजी पाहिले.
 6. ^ "इस्लामच्या आक्रमणामुळेच बौद्ध धर्माचा लोप – RMP" (इंग्रजी भाषेत). 2022-09-16 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-09-16 रोजी पाहिले.
 7. ^ "हंपीमध्ये दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय संमेलन, मुस्लिम आक्रमकांनी विध्वंस केलेल्या हिंदू राजधानीची आठवण|A two-day international conference in Hampi, commemorating the Hindu capital destroyed by Muslim invaders". The Focus India (इंग्रजी भाषेत). 2022-02-26. 2022-09-16 रोजी पाहिले.
 8. ^ शेलार, डॉ संजय तुळशिराम (2020-09-11). महाराष्ट्रातील ब्राह्मणेतर चळवळ ( इ.स. १८७३ ते इ.स. १९३८). Ashok Yakkaldevi. ISBN 978-1-716-59058-0.
 9. ^ "जिनांच्या स्वप्नांच्या 'धर्मनिरपेक्ष' पाकिस्तानात, मंदिराच्या विध्वंसक गोष्टींच्या किंकाळ्या". महाराष्ट्र माझा News (इंग्रजी भाषेत). 2021-08-09. 2022-09-16 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-09-16 रोजी पाहिले.
 10. ^ "बांगलादेशात मंदिरे आणि मूर्त्यांचा विध्वंस; तस्लिमांकडून तीव्र निषेध". Newsdanka Post Marathi. 2021-08-09. 2022-09-16 रोजी पाहिले.
 11. ^ "Hindus Under Attack In UK: After Leicester, Birmingham now Islamist jihadists target Wembley temple". Firstpost (इंग्रजी भाषेत). 2022-09-25. 2022-09-26 रोजी पाहिले.
 12. ^ "England: Government To Use Full Force Of Law Against 'Thuggery' In Leicester, Says Home Secretary Suella Braverman". https://www.outlookindia.com/ (इंग्रजी भाषेत). 2022-09-23. 2022-09-26 रोजी पाहिले. External link in |website= (सहाय्य)