गोवा इन्क्विझिशन
नास्तिक लोकांना, चेटुक करणाऱ्या स्त्री-पुरुषांना शिक्षा देण्यासाठी पोर्तुगिज गोवा इन्क्विझिशन (ख्रिस्ती धार्मिक चौकशीमंडळ) स्थापन केले गेले. या शिक्षांमध्ये माणसांना जिवंत जाळण्यापर्यंत काहीही केले जात असे. हिंदूंचा छळ करण्यासाठी गोवा इन्क्विझिशन ची स्थापना झाली. ख्रिस्ती मिशनरी फ्रान्सिस झेवियर यांच्या आग्रहास्तव, गोव्यात गोवा इन्क्विझिशनची स्थापना झाली. याद्वारे कथित संत क्रूरकर्मा फ्रान्सिस झेव्हिअर याने गोव्यात सक्तीच्या धर्मप्रसारास सुरुवात केली. १५६० साली ख्रिस्ती धर्मन्यायपीठाची (इन्क्विझिशन) स्थापना होऊन स्थानिक लोकांचा छळ सुरू झाला. इ.स. १५६० ते इ.स. १८१२ पर्यंत या इन्क्विजिशनचा अनियंत्रित आणि क्रूर कारभार गोव्यात बेछूटपणे चालू राहिला. या काळात एकूण ५ इन्क्विझिशन्स म्हणजे ख्रिस्ती धर्मसभा बसल्या. प्रत्येक ख्रिस्ती सभेत आधीचे नियम अधिक जाचक करून हिंदूंना छळण्यासाठी नवनवे जाचक नियम बनवले जात असत. ख्रिश्चन धर्म न स्वीकारणाऱ्या हिंदूंचे कान कापण्यासाठी, त्यांचे पाय, नडगी, जबडे फोडण्यासाठी, स्त्रियांचे स्तन कापण्यासाठी विशिष्ट रचना तयार करण्यात आली.[१]
इन्क्विझिशन
संपादनभारतात आणि भारताबाहेर ख्रिस्ती नसलेल्या हजारो लोकांना ख्रिस्ती धर्मगुरूंनी जिवंत जाळले आहे. पोप नववा ग्रेगरी ह्यांनी इ. स. १२३१ मध्ये ख्रिस्ती नसलेल्या पाखंडी लोकांना शोधून त्यांच्यावर खटले भरण्यासाठी पेपल इन्क्विझिशनची (म्हणजे पोपप्रणीत धार्मिक न्यायसभेची) स्थापना केली.[२] यामुळे हिंदूंनी ऐतिहासिक आणि चालू असलेला धार्मिक छळ आणि पद्धतशीर हिंदू विरोधी हिंसाचार, जबरदस्तीने केलेले हिंदूंचे धर्मांतर , दस्तऐवजीकरण केलेले हिंदू हत्याकांड , हिंदू मूर्ती भंजन, हिंदू मंदिरांचा विध्वंस आणि हिंदू मुद्रा विटंबना, तसेच हिंदू शैक्षणिक केंद्रांचा विनाश सहन केला असे दिसून येते. यात हिंदू विरोधी भावना तयार करून ही समावेश होतो. ख्रिस्ती धर्म प्रसारकरांनी हिंदू संस्कृती विरुद्ध हिंसाचाराचा माग चोखाळला आहे असे दिसते. प्रदीर्घ काळ हिंदूंचा धार्मिक छळ केलेला आढळतो. काळात गोव्यात जबरदस्तीने हिंदूंचे धर्मांतर करून ख्रिस्तीलोकसंख्या वाढवली गेली.[३]
स्थापना
संपादनगोव्यात इन्क्विझिशन लागू करण्याची मागणी क्रूरकर्मा फ्रान्सिस झेवियर याने केली. त्यामुळे गोव्यातील हिंदू जनतेचा अतोनात छळ झाला. सुमारे २ हजार हिंदू लोक क्रूरकर्मा फ्रान्सिस झेवियरने जिवंत जाळले असे विविध पुराव्यांवरून दिसून् येते.[४] याकाळात हिंदूंची देवळे पाडून तेथे चर्चेस बनवली गेली. त्या देवळांच्या जमिनी चरितार्थासाठी त्या चर्चेसला दिल्या. हिंदूचे धर्मग्रंथ जाहीरपणे जाळले जात. यामुले मोठी ग्रंथ संपदा आणि प्राचीन माहितीचा विनाश ख्रिस्ती लोकांनी भारतात घडवून आणला. रायतूर येथील क्रूर शासक दियोगु रुद्रीगिश याने एका रात्रीत सासष्टी तालुक्यातली २८० देवळे पाडली. यासाठी त्याचा जाहीर सन्मान चर्चने केला होता. शेंडी वर गोव्यात कर लावला होता. शेंडी राखणा-याला वर्षाला ८ रु. शेंडीचा कर त्याकाळात द्यावा लागे. यास झेंडी कर असेही म्हंटल्याचे दिसून येते. फा फार मोठा कर होता. त्याच काळात अकबराच्या सैन्यातल्या शिपायाला ८ आणे म्हणजे अर्धा रुपया पगार असे. त्यावरून याची कल्पना केली जाऊ शकते. या काळात हिंदूंच्या कत्तली, जबरदस्तीने धर्मांतर, हिंदू स्त्रिया आणि मुलांचे गुलाम करणे व त्यांची विक्री करणे आणि हिंदू मंदिरे नष्ट करणे या गोष्टी मोठ्या आनंदाने आणि अभिमानाने नोंदवल्या आहेत असे दिसून येते.[५]
इन्क्विझिशन चे हुकूम
संपादन- इ.स. १५६० हिंदूंनी आपल्या इस्टेटी ख्रिस्त्यांना विकून गोवे सोडून जावे
- इ.स. १५६३ हिंदूंनी आपले हिंदू धर्मग्रंथ नष्ट करावे
- इ.स. १५६७ नव्याने बाटलेले हिंदू प्रार्थनेस हजर न राहिल्यास त्यांना शारीरिक शिक्षा करावी
- इ.स. १५६७ ख्रिस्त्यांनी ख्रिस्ती नसलेल्या हिंदूंशी संबंध ठेवू नयेत, व हिंदूंना हाकलून द्यावे
- इ.स. १५७३ हिंदूनी कोणतेही वाहन वापरू नये
- इ.स. १५७४ गोवा सोडून गेलेले हिंदू गोव्यात परत आल्यास त्यांना ठार मारावे
- इ.स. १५७४ शेंडी राखल्यास आठ रुपये कर चर्चला द्यावा[६]
गोव्यातील ख्रिस्ती राजवटीत, हिंदू विधी किंवा सण पाळणारे उल्लंघन करणाऱ्यांवर आणि गैर-ख्रिश्चनांना कॅथलिक धर्मात रूपांतरित करण्याच्या ख्रिस्ती प्रयत्नांमध्ये हस्तक्षेप करणाऱ्या व्यक्तींवरही इन्क्विझिशनने कारवाई केली. देशी कोकणी भाषा आणि संस्कृतचा वापर हा फौजदारी गुन्हा ठरवला. हजारो हिंदूंना कायदे करून ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यास भाग पाडले गेले. गोवा इन्क्विझिशन द्वारे धर्मांतर केले आणि हिंदू मंदिरे उद्ध्वस्त केली.[७]
संदर्भ
संपादन- ^ "माफीच माफी मागावी लागेल!". www.tarunbharatjalgaon.com. 2022-09-28 रोजी पाहिले.
- ^ "पोपप्रणीत धर्मविस्तार". आजचा सुधारक. 1999-12-01. 2022-09-28 रोजी पाहिले.
- ^ nindi punj. Goa Inquisition Anant Kakba Priolkar (English भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
- ^ "पोपप्रणीत धर्मविस्तार". आजचा सुधारक. 1999-12-01. 2022-09-28 रोजी पाहिले.
- ^ nindi punj. Goa Inquisition Anant Kakba Priolkar (English भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
- ^ nindi punj. Goa Inquisition Anant Kakba Priolkar (English भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
- ^ nindi punj. Goa Inquisition Anant Kakba Priolkar (English भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)