इल-दा-फ्रान्स (फ्रेंच: Île-de-France; शब्दशः अर्थ: फ्रान्सचे बेट) हा फ्रान्स देशाच्या २२ प्रदेशांपैकी सर्वाधिक लोकसंख्येचा प्रदेश आहे. ह्या प्रदेशात मुख्यतः राजधानी पॅरिस महानगर क्षेत्राचा समावेश होतो. सुमारे १.१७ कोटी लोकसंख्या असलेला इल-दा-फ्रान्स हा युरोपातील चौथ्या क्रमांकाचा मोठा प्रशासकीय विभाग आहे (इंग्लंड, नोर्डऱ्हाईन-वेस्टफालनबायर्न) खालोखाल. आर्थिक दृष्ट्या इल-दा-फ्रान्स जगातील चौथ्या तर युरोपातील अव्वल क्रमांकाचा धनाढ्य प्रदेश आहे. २००९ साली इल-दा-फ्रान्सचा जीडीपी ५५२ अब्ज युरो इतका होता.

इल-दा-फ्रान्स
Île-de-France
फ्रान्सचा प्रदेश
ध्वज
चिन्ह

इल-दा-फ्रान्सचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
इल-दा-फ्रान्सचे फ्रान्स देशामधील स्थान
देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
राजधानी पॅरिस
क्षेत्रफळ १२,०१२ चौ. किमी (४,६३८ चौ. मैल)
लोकसंख्या १,१६,९४,०००
घनता ९७३.५ /चौ. किमी (२,५२१ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ FR-IDF
संकेतस्थळ http://www.iledefrance.fr
२००५ पासुन वापरात असलेला इल-दा-फ्रान्सचा लोगो


विभाग

संपादन

खालील आठ फ्रेंच विभाग इल-दा-फ्रान्स प्रदेशाच्या अखत्यारीत येतात.

इल-दा-फ्रान्समधील ८८ टक्के जनता पॅरिस महानगर क्षेत्रात राहते. व्हर्साय हे ऐतिहासिक शहर देखिल इल-दा-फ्रान्समध्येच मोडते.

वाहतूक

संपादन

फ्रान्सचे आर्थिक व राजकीय इंजिन असलेला इल-दा-फ्रान्स रस्ते, रेल्वे व हवाई मार्गाने जोडला गेला आहे. चार्ल्स दि गॉल हा फ्रान्समधील सर्वात मोठा विमानतळ इल-दा-फ्रान्सच्या तीन विभागांमध्ये पसरला आहे. युरोपातील सर्वात वर्दळीचे रेल्वे स्थानक पॅरिस गार द्यु नॉर हे फ्रेंच टीजीव्ही सेवेमधील प्रमुख स्थानक आहे.

वास्तूशास्त्र

संपादन

इल-दा-फ्रान्समध्ये गॉथिक रचनेच्या वास्तू मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. नोत्र देम दे पॅरिस हे पॅरिसमधील चर्च तसेच सेंत-देनिसची बासिलिका इत्यादी गॉथिक शास्त्रातील सर्वोत्तम इमारती येथे आढळून येतात.

इल-दा-फ्रान्स हे फ्रेंच क्रीडाविश्वाचे माहेरघर आहे. फ्रेंच ओपन ही मानाची ग्रॅंड स्लॅम टेनिस स्पर्धा दरवर्षी मे महिन्यात पॅरिसमध्ये खेळवली जाते. स्ताद दा फ्रान्स हे फ्रान्सचे राष्ट्रीय फुटबॉल स्टेडियम सीन-सेंत-देनिस ह्या विभागातील सेंत-देनिस ह्या पॅरिसच्या उपनगरामध्ये स्थित आहे.

गॅलरी

संपादन
 
नागरी इल-दा-फ्रान्स: पॅरिस.
नागरी इल-दा-फ्रान्स: पॅरिस.  
 
युनेस्को जागतिक वारसा स्थान व्हर्सायचा राजवाडा.
 
सांस्कृतिक इल-दा-फ्रान्स: लूव्र
सांस्कृतिक इल-दा-फ्रान्स: लूव्र  
 
कृषीप्रधान इल-दा-फ्रान्स.
कृषीप्रधान इल-दा-फ्रान्स.  
 
नैसर्गिक इल-दा-फ्रान्स: फाउंटनब्लू जंगल.
नैसर्गिक इल-दा-फ्रान्स: फाउंटनब्लू जंगल.  

बाह्य दुवे

संपादन