सीन-सेंत-देनिस

फ्रान्सचा विभाग

सीन-सेंत-देनिस (फ्रेंच: Seine-Saint-Denis) हा फ्रान्स देशाच्या इल-दा-फ्रान्स प्रदेशातील एक विभाग आहे. येथून वाहणाऱ्या सीन नदीवरून त्याचे नाव पडले आहे. हा विभाग पॅरिसच्या वायव्येस स्थित असून तो पॅरिस महानगराचा भाग आहे. स्ताद दा फ्रान्स हे फ्रान्समधील सर्वात मोठे स्टेडियम ह्याच विभागातील सेंट-डेनिस शहरात स्थित आहे. तसेच चार्ल्स दि गॉल आंतरराष्ट्रीय विमानतळाचा काही भाग देखील ह्याच विभागात आहे.

सीन-सेंत-देनिस
Seine-Saint-Denis
फ्रान्सचा विभाग
चिन्ह

सीन-सेंत-देनिसचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
सीन-सेंत-देनिसचे फ्रान्स देशामधील स्थान
देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
प्रदेश इल-दा-फ्रान्स
मुख्यालय बॉबिन्यी
क्षेत्रफळ २३६ चौ. किमी (९१ चौ. मैल)
लोकसंख्या १५,१५,९८३
घनता ६,४२६ /चौ. किमी (१६,६४० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ FR-93
सीन-सेंत-देनिसचा नकाशा

सीन-सेंत-देनिसमधील बहुसंख्य जनता उत्तर आफ्रिका खंडातून स्थानांतरित झालेली असून इस्लाम हा येथील प्रमुख धर्म आहे.


बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: