जॉफ्री चॉसर

(जेफ्री चॉसर या पानावरून पुनर्निर्देशित)

जॉफ्री चॉसर (इ.स. १३४३ - ऑक्टोबर २५, इ.स. १४००) हा इंग्लिश साहित्यिक होता. चॉसरची गणना आद्य इंग्लिश साहित्यिकांमध्ये होते.

जेफ्री चॉसर हा इंग्लंडच्या राजदरबारातील एक महत्त्वाचा मानकरी होता. त्याला लॅटीन, इटालियन आणि फ्रेंच या भाषाही अवगत होत्या. राजदरबाराच्या सेवेत असल्यामुळे राजा त्याला वेगवेगळ्या देशात कामगिरीवर पाठवित असे. इ.स. १३५९ च्या फ्रान्सवरील स्वारीत तो कैद झाला होता पण राजाने खंडणी देऊन त्याला सोडवले.

राजदरबारातच सेवेत असलेल्या फिलीपा हिच्याशी जेफ्रीचा विवाह झाला होता. इ.स. १३८७ साली त्याच्या या पत्नीचे निधन झाले.

इ.स. १३८५ साली जेफ्री चॉसर केंट परगण्याचा उमराव म्हणून इंग्लिश संसदेवर नेमला गेला. मात्र इ.स. १३८६ साली दुसरा रिचर्ड याचा पराभव झाल्यामुळे त्याला उमरावपद गमवावे लागले.

प्रसिद्ध साहित्यकृती

संपादन

ट्राइलस अँड क्रेसिडा

संपादन

`ट्राइलस अँड क्रेसिडा' हे ट्रोजन युद्धाच्या पार्श्वभूमीवरील प्रेमकथा असलेले खंडकाव्य जेफ्री चॉसरने इ.स. १३८२ साली लिहिले. ट्राइलस हा ट्रॉयचा राजा प्रियाम याचा मुलगा, तर क्रेसिडा ही कल्कास या फितूर ग्रीकाची मुलगी.