द रोलिंग स्टोन्स (इंग्रजी: The Rolling Stones) हा रॉक संगीतरचना करणारा एक इंग्लिश बॅंड आहे. इ.स. १९६२ साली लंडनमध्ये ब्रायन जोन्स, इयन स्टुअर्ट मिक जॅगर, कीथ रिचर्ड्स, बिल रायमन व चार्ली वॉट्स ह्या विविध वाद्यनिपुण संगीतकारांनी ह्या बॅंडची स्थापना केली. रॉक, रिदम अँड ब्लूज, ब्लूज, रॉक अँड रोल ह्या प्रकारांमध्ये रचना करणारा व सुरुवातीच्या काळात ब्रिटनमध्ये लोकप्रिय असलेला रोलिंग स्टोन्स बॅंड लवकरच उत्तर अमेरिका खंडातदेखील झपाट्याने प्रसिद्धीत आला.

द रोलिंग स्टोन्स
The Rolling Stones
Stones members montage2.jpg
संगीत प्रकार रॉक, रिदम ॲंड ब्लूज, ब्लूज, रॉक ॲंड रोल
कार्यकाळ इ.स. १९६२ ते चालू
संकेतस्थळ अधिकृत संकेतस्थळ

आजवर रोलिंग स्टोन्सच्या आल्बमची २० कोटीपेक्षा अधिक विक्री झाली आहे. अनेक तज्ज्ञ व अहवालांनुसार रोलिंग स्टोन्स हा जगातील आजवरच्या सर्वोत्तम संगीत बॅंडांमधील एक मानला जातो.

चमूसंपादन करा


बाह्य दुवेसंपादन करा

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
  • "रोलिंग स्टोन्सचे अधिकृत संकेतस्थळ" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  • "द रोलिंग स्टोन्स" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)