बो स्ट्रीट रनर्स

(बाे स्ट्रीट रनर्स या पानावरून पुनर्निर्देशित)

बो स्ट्रीट रनर्स ही इंग्लंडच्या लंडन शहराजवळील वेस्टमिन्स्टर शहरातील बो स्ट्रीट मॅजिस्ट्रेट कोर्टाला आधीन असलेली पोलीस यंत्रणा होती. याला लंडनचे पहिले व्यावसायिक पोलिस दल समजले जाते. १७४९ साली स्थापनेच्या वेळी या पोलीस दलात सहा अधिकारी होते. या दलाची स्थापना न्यायाधीश मॅजिस्ट्रेट हेन्री फील्डिंग यांनी केली होती. [] फील्डिंगचा भाऊ आणि सहाय्यक जॉन फील्डिंग यांनी हेन्री नंतर न्यायाधीशपद घेतले आणि या अधिकाऱ्यांना कडक प्रशिक्षण देउन लंडनमधील एक व्यावसायिक आणि प्रभावी शक्ती बनवले. या पोली अधिकाऱ्यांना जनतेने बो स्ट्रीट रनर्स असे टोपणनाव दिलेले होते पण त्यांना स्वतःला हे नाव आवडत नव्हते व ते अपमानास्पद मानत. [] १८३९ साली बो स्ट्रीट रनर्सचे विसर्जन करून त्यातील कर्मचारी व अधिकाऱ्यांना मेट्रोपॉलिटन पोलीसदलात समाविष्ट केले गेले. मेट्रोपॉलिटन पोलीस आपला इतिहास बो स्ट्रीट रनर्सपासूनचा असल्याचे सांगतात.

संदर्भ

संपादन
  1. ^ Newman 1997, पान. 69.
  2. ^ Cox 2010.