१० डाउनिंग स्ट्रीट
टेन डाउनिंग स्ट्रीट (10 Downing Street) हे युनायटेड किंग्डमच्या पंतप्रधानाचे अधिकृत निवासस्थान व कार्यालय आहे. लंडनच्या सिटी ऑफ वेस्टमिन्स्टरमधील डाउनिंग स्ट्रीटवर स्थित असलेली ही इमारत इ.स. १६८४ साली बांधली गेली. बकिंगहॅम राजवाडा व वेस्टमिन्स्टर राजवाडा ह्या महत्त्वाच्या प्रासादांपासून जवळच असलेल्या १० डाउनिंग स्ट्रीटमध्ये १०० पेक्षा अधिक खोल्या आहेत.
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत