हरिद्वार
हरिद्वार हे भारताच्या उत्तराखंड राज्यातील एक शहर आहे.हरिद्वार जिल्ह्याचे मुख्य ठिकाण(मुख्यालय) आहे. हरिद्वार शहर उत्तराखंडच्या दक्षिण भागात गंगा नदीच्या काठावर वसले आहे व ते राजधानी देहरादूनच्या ५० किमी नैऋत्येस स्थित आहे. २०११ साली हरिद्वारची लोकसंख्या सुमारे २.२८ लाख होती.
हरिद्वार | |
भारतामधील शहर | |
हर की पौडी घाट |
|
देश | भारत |
राज्य | उत्तराखंड |
जिल्हा | हरिद्वार जिल्हा |
क्षेत्रफळ | १२.३ चौ. किमी (४.७ चौ. मैल) |
समुद्रसपाटीपासुन उंची | १,०३० फूट (३१० मी) |
लोकसंख्या (२०११) | |
- शहर | २,२८,८३२ |
- महानगर | ३,१०,७९६ |
प्रमाणवेळ | भारतीय प्रमाणवेळ |
हरिद्वार हे हिंदू धर्मामधील सर्वात पवित्र स्थानांपैकी एक मानले जाते. गंगा नदीचा हरिद्वार येथे भारतीय उपखंडामध्ये प्रवेश होतो. कुंभमेळा भरणाऱ्या ४ स्थानांपैकी हरिद्वार एक असून येथे दर १२ वर्षांनी हा मेळा भरतो. (नाशिक, अलाहाबाद व उज्जैन ही कुंभमेळ्याची इतर तीन स्थाने). तसेच अयोध्या, मथुरा, वाराणसी, कांचीपुरम, उज्जैन व द्वारका समवेत हरिद्वार सप्त पुरी ह्या सात पवित्र तीर्थक्षेत्रांपैकी एक मानले जाते. हिंदू पुराणानुसार हरिद्वारमध्ये गंगेत स्नान केल्याने सर्व पापे धुतली जातात व मोक्षप्राप्ती होते.
वाहतूक
संपादनहरिद्वार रेल्वे स्थानक भारतीय रेल्वेच्या उत्तर रेल्वे क्षेत्रामधील एक स्थानक दिल्ली-देहरादून ह्या प्रमुख मार्गावर स्थित असून येथे दररोज अनेक गाड्या थांबतात. राष्ट्रीय महामार्ग ५८ हरिद्वारमधून जातो.