अयोध्या

हिंदू धर्माचे पवित्र तीर्थक्षेत्र

अयोध्या अयोध्या हे हिंदूंचे पावन आणि पवित्र तीर्थक्षेत्र आहे. अयोध्या हे शरयू नदीच्या काठावर वसलेले एक प्राचीन धार्मिक शहर आहे. हे भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील शहर आहे. हे शहर विष्णूचा अवतार रामचंद्राचे जन्मस्थान मानले जाते. राम जन्मस्थान म्हणून मानल्या गेलेल्या अयोध्येला ( अवध ) हिंदूंसाठी सात महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांपैकी एक ( सप्तपुरी ) मानले जाते . २०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ४,५०,९९९ होती. सुरुवातीच्या बौद्ध आणि जैन धर्मग्रंथांमध्ये उल्लेख आहे की गौतम बुद्ध आणि भगवान महावीर या धार्मिक नेत्यांनी शहरात भेट दिली आणि वास्तव्य केले.

सुंदर अयोध्या नगरी
सुंदर अयोध्या नगरी

येथे भव्य राम मंदिर होते. ते मोगल बादशाह बाबरच्या आदेशामुळे ते उध्वस्त केले गेले. आणि त्या मंदिराच्या जागी एक वादग्रस्त मशिद उभारली गेली. जन्मभूमीच्या ठिकाणी राम मंदिर बांधण्यासाठी हिंदू जनतेने सुमारे पाचशे वर्षे शांततामार्गाने लढा दिला आणि यशस्वीपणे जिंकला आहे. ऑगस्ट २०२० मध्ये येथे राम मंदिराचे बांधकाम सुरू झाले.

नाव व्युत्पत्ति संपादन करा

मनुने हे शहर वसविले आणि त्याला 'अयोध्या' असे नाव दिले ज्याचा अर्थ 'आयुध' आहे जो युद्धाद्वारे मिळवता येत नाही. शब्द "अयोध्या" म्हणजे जेथे युद्ध करणे शक्य नाही असे. अयोध्या रामायणात प्राचीन कोसला साम्राज्याची राजधानी असल्याचे सांगितले. याला "कोसला" असेही संबोधले जात असे. जैन, संस्कृत, बौद्ध, ग्रीक आणि चीनी स्त्रोतांमध्ये सत्यापित केलेले शहराचे जुने नाव "साकेत" आहे. रामायणावर आधारीत असल्याने थायलंड येथे ही अयुध्येय (अयोध्या) नावाचे शहर आहे. आणि योग्यकर्त्ता (इंडोनेशिया) या शहरांचे नामरण अयोध्या केले गेले आहे.

इतिहास संपादन करा

रामायण ,महाभारत, आदिपुराण प्राचीन जैन, हिंदू संस्कृत- भाषेच्या महाकाव्यात अयोध्या नावाच्या शहराचा उल्लेख आहे , जे रामासह, प्रथम तीर्थंकर वृषभनाथ कोसलाच्या इक्ष्वाकु राजांची राजधानी होती. पाणिनीची अष्टाध्यायी आणि त्यावर पतंजली यांचे भाष्य यासारख्या प्राचीन संस्कृत ग्रंथांमध्ये साकेत नगरीचा यांचा उल्लेख आहे. ब्रह्मांड पुराणातील एका श्लोकात अयोध्याचे नाव "सर्वात पवित्र आणि सर्वात महत्वाचे नगर" असा आला आहे. येथे मोठ्या प्रमाणात गुप्त साम्राज्याची नाणी सापडली आहेत. कोरिया देशाशी अयोध्येचा जवळचा संबंध आहे. येथील राजकन्येचे लग्न तेथील राजाशी झाले होते. येथील गोप्रतारा आता गुप्ता घाट हा प्राचीन काळापासून धार्मिक महत्त्व असलेले एक पावन तीर्थ म्हणून ओळखला जातो. मोगल मुसलमान बादशाह बाबरच्या आदेशामुळे उध्वस्त केले गेलेले अयोध्या नगर बादशाह औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुस्लिम शासन कमकुवत झाल्यामुळे परत बहरू लागले. आणि अयोध्याची राजधानी असलेले अवध राज्य स्वतंत्र हिंदु राज्य निर्माण झाले. येथे नियमित पणे होत असलेली श्रीराम पूजा आता सार्वजनिक रूपात होऊ लागली.

भूगोल आणि हवामान संपादन करा

अयोध्येमध्ये भारतातील वैशिष्ट्यपूर्ण आर्द्र उप-उष्णकटिबंधीय हवामान आहे.

मुख्य आकर्षण संपादन करा

अयोध्येला ऐतिहसिकदृष्ट्या मानवी सभ्यतेची पहिली पुरी असण्याचा पौराणिक गौरव आहे. तरीही श्री रामजन्मभूमी, कनक भवन, हनुमानगढ़ी, दशरथ महाल, श्री लक्ष्मणकिला, कालेराम मंदिर, मणिपर्वत, श्री रामची पायडी, नागेश्वरनाथ, क्षीरेश्वरनाथ श्री अनाडी पंचमुखी महादेव मंदिर, गुप्तर घाट यासह अनेक मंदिरे प्रमुख प्रेक्षणीय स्थळे म्हणून प्रसिद्ध आहेत. बिर्ला मंदिर, श्री मणि रामदासजींची छावनी, श्री रामवल्लभकुंज, श्री लक्ष्मणकिला, श्रीसियारामकिला, उदासी आश्रम रानोपाली आणि हनुमान बाग यासारखे अनेक आश्रम पर्यटकांचे केंद्र आहेत.

श्री राम मंदिर संपादन करा

श्रीरामजन्मभूमीच्या प्रस्तावित राम मंदिरासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 5 ऑगस्ट 2020 रोजी भूमिपूजन करण्यात आले .


हीओ ह्वांग-ओके संपादन करा

कोरियाच्या गेमगवान गयाच्या राजा सुरोशी लग्न करणारी प्रख्यात राजकन्या हीओ ह्वांग-ओके, ही अयोध्याची होती. इ.स.२००१ मध्ये, कोरियन शिष्टमंडळाने हेओ ह्वांग-ओकेच्या स्मारकाचे उद्घाटन केले. या समारंभासाठी शंभरहून अधिक जागतिक इतिहासकार आणि सरकारी प्रतिनिधींचा समावेश होता.

हनुमान गढी किल्ला संपादन करा

रामकोट संपादन करा