कनक भवन
कनक भवन अयोध्येतील रामजन्म भूमी, रामकोटच्या ईशान्येला आहे. कनक भवन हे अयोध्येतील सर्वोत्तम आणि प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे. असे मानले जाते की हे भवन देवी सीतेला प्रभू रामाशी लग्नानंतर लगेचच कैकेईने भेट दिले होते. हा देवी सीता आणि भगवान राम यांचा खाजगी राजवाडा आहे. विक्रमादित्याने त्याचे जीर्णोद्धार करून घेतले. नंतर ते वृष भानू कुंवरी यांनी नूतीकरण केले जे आजही अस्तित्वात आहे. गर्भगृहात स्थापित केलेल्या मुख्य मूर्ती भगवान राम आणि देवी सीता यांच्या आहेत.