इक्ष्वाकु (देवनागरी लेखनभेद: इक्ष्वाकू ; संस्कृत: इक्ष्वाकु ;) हा वैदिक काळातील इक्ष्वाकु कुळाचा संस्थापक व अयोध्येचा पहिला राजा होता. हिंदू पौराणिक संदर्भांनुसार वैवस्वत मनूच्या सहा पुत्रांपैकी हा एक होता. त्याला सुदेवा नावाची पत्नी व शंभर पुत्र होते. त्याच्यापासून सुरू झालेल्या इक्ष्वाकु कुळात भगीरथ, दशरथ, राम यांच्यासारखे प्रभावशाली राजे निपजले.

परिवार

संपादन

पद्म पुराणानुसार इक्ष्वाकुला सुदेवा नामक पत्नी होती[]. भागवत, देवी भागवत, महाभारत इत्यादी ग्रंथांनुसार यास विकुक्षी, दण्डक, दशाश्व इत्यादी शंभर पुत्र होते. इक्ष्वाकूनंतर विकुक्षी अयोध्येचा राजा झाला; दण्डक हा दंडकारण्याचा राजा बनला, तर दशाश्वाने माहिष्मतीवर राज्य केले[].

हे सुद्धा पहा

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ a b सिद्धेश्वरशास्त्री चित्राव. भारतवर्षीय प्राचीन चरित्रकोश. p. ११३-११४.