'श्रीराममंदिर,महिकावती '

हे मंदिर माहीम-वडराई रस्त्यावर एसटी बसच्या राममंदिर बसथांब्यापासून डावीकडे १०० मीटरवर स्थित आहे. पालघरवरून वडराईला जाणाऱ्या एसटी बसेस येथे थांबतात.सातपाटी, शिरगाव तसेच पालघर वरून रिक्षानेसुद्धा येथे येता येते.

इतिहास

शके १७६३ वैशाख महिन्यात शुद्ध तृतीयेला श्रीराम,लक्ष्मण,सीता,रामदूत हनुमान आणि विघ्नहर्ता गजाननाच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा श्रीराममंदिरात झाली.[ संदर्भ हवा ][१] शके १७६४ चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून श्रीराम जन्मोत्सव साजरा होऊ लागला.[ संदर्भ हवा ] [२]

उत्सव

प्रत्येक वर्षी चैत्र महिन्यात शुद्ध प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत रामजन्म उत्सव साजरा केला जातो.प्रतिपदेपासून रोज सकाळी सनई-चौघड्याच्या मंदमधुर आवाजात पूजा आरती केली जाते आणि रात्री रामायण महाभारतातील विषयावर कीर्तन आयोजिले जाते.दुपारच्या सत्रात भजन, प्रवचन इत्यादी धार्मिक कार्यक्रम सादर होतात. अखंड नामस्मरणसोहळा सुद्धा ह्याच पंधरवड्यात संपन्न होतो.अखिल भारतीय पातळीवर प्रसिद्ध असलेले कीर्तनकार प्रवचनकार बोलाविले जातात.

रामजन्माचे कीर्तन भुवनेश्वर महाराजांचे सुपुत्र अशोक महाराज करतात. रामनवमीच्या दुसऱ्या दिवशी संध्याकाळी रामाची पालखी काढली जाते ती रात्रभर संपूर्ण गावात फिरविली जाते व सकाळी राममंदिरात आणली जाते आणि चहापानानंतर उरलेल्या वडराई भागात फिरविली जाते.

चिंचणी, डहाणू, वरोर,धाकटी दमण,मोठी दमण, तारापूर, वसई,मुंबई, नाशिक, वडगाव, मुरबे,सातपाटी, शिरगाव,माकुणसार, एडवण, दातिवरे वगैरे लांब लांब ठिकाणाहून भाविक नित्यनेमाने दरवर्षी येतात.

रामजन्मउत्सवाची समाप्ती शेवटच्या दिवशी तीर्थप्रसादाने संपन्न होते. नंतर भाविक लोक आपआपल्या गावी परततात.

रामनवमी उत्सवाप्रमाणेच प्रत्येक वर्षी आषाढी पौर्णिमेला गुरुपौर्णिमा उत्सव साजरा केला जातो. तसेच दरवर्षी २१ जुलैला भुवनेश्वर महाराजांची पुण्यतिथी पाळली जाते.

संदर्भ संपादन

प्रसाद प्रकाशन :केशवाश्रम, राममंदिर,के.माहीम. शके चैत्र शुद्ध दशमी १८९६. दिनांक २ एप्रिल १९७४.

२.https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html

३. http://tourism.gov.in/india-tourism-development-corporation-itdc

  1. ^ प्रसाद प्रकाशन :केशवाश्रम, राममंदिर,के.माहीम. शके चैत्र शुद्ध दशमी १८९६. दिनांक २ एप्रिल १९७४.
  2. ^ प्रसाद प्रकाशन :केशवाश्रम, राममंदिर,के.माहीम. शके चैत्र शुद्ध दशमी १८९६. दिनांक २ एप्रिल १९७४.