दातिवरे
दातिवरे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील पालघर तालुक्यातील एक गाव आहे.
?दातिवरे महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
क्षेत्रफळ | २.१२३ चौ. किमी |
जवळचे शहर | पालघर |
जिल्हा | पालघर जिल्हा |
लोकसंख्या • घनता |
४९० (२०११) • २३१/किमी२ |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | वाडवळी, मांगेली |
कोड • पिन कोड • दूरध्वनी • आरटीओ कोड |
• ४०११०२ • +०२५२५ • एमएच४८ |
भौगोलिक स्थान
संपादनसफाळे रेल्वे स्थानकापासून पश्चिमेला टेंभीखोडावे मार्गाने गेल्यावर विराथन बुद्रुक मार्गाने डोंगरे गावानंतर हे गाव लागते. सफाळेपासून हे गाव १५ किमी अंतरावर आहे.सफाळेपासून रामबाग मार्गाने गेल्यास हे गाव १९ किमी अंतरावर पडते.
हवामान
संपादनपावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.मासेमारी हा येथे मुख्य व्यवसाय असून भाजीपाला, फळभाज्यांचे उत्पादनही येथे घेतले जाते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते.
लोकजीवन
संपादनहे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात १३८ कुटुंबे राहतात. एकूण ४९० लोकसंख्येपैकी २२८ पुरुष तर २६२ महिला आहेत. गावाची साक्षरता ९०.४६ टक्के आहे.पुरुष साक्षरता ९३.४६ आहे तर स्त्री साक्षरता ८७.८५ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या २९ आहे. ती एकूण लोकसंख्येच्या ५.९२ टक्के आहे. मुख्यतः वाडवळ व मांगेली समाजातील लोक येथे राहतात.
नागरी सुविधा
संपादनगावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस सफाळे रेल्वे स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. ऑटोरिक्षा सुद्धा सफाळेवरून दिवसभर उपलब्ध असतात.
जवळपासची गावे
संपादनखार्डी, कोरे, डोंगरे, एडवन, भादवे, वेढी, नवघर, उंबरवाडा तर्फे मनोर, खारवडश्री, खारमेंडी, अशेरी, खडकावणे, वाडे, चारीखुर्द, वेळगाव, चिल्हार ही जवळपासची गावे आहेत.दातिवरे ग्रामपंचायतीमध्ये बंदर आणि दातिवरे गावे येतात.
संदर्भ
संपादनhttps://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html
२. http://tourism.gov.in/india-tourism-development-corporation-itdc