उंबरवाडा तर्फे मनोर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील पालघर तालुक्यातील एक गाव आहे.

  ?उंबरवाडा तर्फे मनोर

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ .१७६८४ चौ. किमी
जवळचे शहर पालघर
जिल्हा पालघर जिल्हा
लोकसंख्या
घनता
५०३ (२०११)
• २,८४४/किमी
भाषा मराठी
सरपंच
बोलीभाषा आदिवासी कातकरी
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• ४०११०२
• +०२५२५
• एमएच४८

भौगोलिक स्थान

संपादन

सफाळे रेल्वे स्थानकापासून पूर्वेस तांदुळवाडी मार्गाने गेल्यावर वरई फाट्यावर अहमदाबाद मुंबई राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ ने उजवीकडे जाऊन भालीवळी गावानंतर उजवीकडे वळून खानिवडे रस्त्याने पुढे गेल्यावर तांदुळपाड्यानंतर हे गाव लागते. सफाळे रेल्वे स्थानकापासून हे गाव ३९ किमी अंतरावर आहे.

हवामान

संपादन

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.

लोकजीवन

संपादन

हे एक छोटे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ९५ कुटुंबे राहतात. एकूण ५०३ लोकसंख्येपैकी २४८ पुरुष तर २५५ महिला आहेत. गावाची साक्षरता ७१.८४ टक्के आहे.पुरुष साक्षरता ८४.३६ आहे तर स्त्री साक्षरता ५९.१३ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या ८४ आहे. ती एकूण लोकसंख्येच्या १६.७० टक्के आहे. मुख्यतः आदिवासी समाजातील लोक येथे राहतात. छोट्या प्रमाणावर शेती व शेतमजूर, वीटभट्टीमजूर म्हणून ते काम करतात.अगदी लहान प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा ते करतात.

नागरी सुविधा

संपादन

गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस सफाळे रेल्वे स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. ऑटोरिक्शा सफाळे रेल्वे स्थानक व विरार रेल्वे स्थानकावरून उपलब्ध असतात.

जवळपासची गावे

संपादन

जलसार, टेंभीखोडावे, वाढीव सरावळी, वेढी, नवघर, खारवडश्री, खारमेंडी, दातिवरे, अशेरी, खडकावणे, वाडे ही जवळपासची गावे आहेत.दारशेत ग्रामपंचायतीमध्ये दारशेत गावासह उंबरवाडा तर्फे मनोर गाव येते.

संदर्भ

संपादन

१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html

२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html

३. https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/

४. http://tourism.gov.in/