महाराष्ट्र विधान परिषद

महाराष्ट्र राज्याच्या द्विगृही कायदेमंडळापैकी वरिष्ठ गृह
(महाराष्ट्र विधानपरिषद या पानावरून पुनर्निर्देशित)
Consell Legislatiu de Maharashtra (ca); महाराष्ट्र विधान परिषद (hi); మహారాష్ట్ర శాసనమండలి (te); মহারাষ্ট্র বিধান পরিষদ (bn); Maharashtra Legislative Council (en); マハーラーシュトラ州議会上院 (ja); המועצה המחוקקת של מהאראשטרה (he); महाराष्ट्र विधान परिषद (mr) upper house legislature of Indian state of Maharashtra (en); महाराष्ट्र राज्याच्या द्विगृही कायदेमंडळापैकी वरिष्ठ गृह (mr); בית עליון בבית מחוקקים מדינתי (he); మహారాష్ట్ర శాసనవ్యవస్థలో ఎగువసభ (te) マハーラーシュトラ州上院 (ja)

महाराष्ट्र विधान परिषद हे महाराष्ट्र राज्याच्या द्विगृही कायदेमंडळापैकी वरिष्ठ गृह आहे. महाराष्ट्राच्या विधानपरीषदेत ७८ सदस्य आहेत. महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश, बिहार, आंध्रप्रदेश आणि तेलंगणा या ६ घटक राज्यात द्विगृही कायदेमंडळ पद्धती अस्तित्वात असून तेथे विधान परिषद अस्तित्वात आहेत. बाकी सर्व घटकराज्यात एकगृह कायदेमंडळ पद्धती आहे. तेथे विधानसभा हे एकच सभागृह आहे.[] राज्यघटनेच्या कलम १६९ (१) नुसार विधानसभेने सभासदांच्या किंवा दोन तृतीयांश सभासदांनी उपस्थितीने बहुमताने ठराव केल्यास भारतीय संसद राज्यात विधान परिषद अस्तित्वात आणते. विधान परिषदेची सदस्य संख्या किती असावी, हे राज्यघटनेने निश्चित केलेले नाही. कलम १७१ नुसार विधान परिषदेत किमान ४० सभासद किंवा विधानसभेच्या एकूण सभासद संख्येच्या एक तृतीयांश पेक्षा जास्त सदस्य नसतात. विधान परिषद तत्त्वत: वरिष्ठ सभागृह असले तरी व्यवहारात ते कनिष्ठ सभागृह आहे. या सभागृहाला सर्वच बाबीत कमी अधिकार आहेत (विधानसभेच्या तुलनेत).[]

महाराष्ट्र विधान परिषद 
महाराष्ट्र राज्याच्या द्विगृही कायदेमंडळापैकी वरिष्ठ गृह
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारविधान परिषद
ह्याचा भागमहाराष्ट्र विधानमंडळ
स्थान महाराष्ट्र, भारत
कार्यक्षेत्र भागमहाराष्ट्र
भाग
  • Member of Maharashtra Legislative Council
अधिकृत संकेतस्थळ
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

विधानपरिषदेबद्दल माहिती

संपादन

घटकराज्यांमध्ये व्दिगृही विधिमंडळ असावे की नसावे याबाबद निर्णय घेण्याचा अधिकार तेथील विधानसभेला आहे. सध्या देशामध्ये सहा घटकराज्यांमध्ये विधानपरिषद आहे त्यामध्ये महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश, आंध्रप्रदेश, तेलंगाणा आणि कर्नाटक यांचा समावेश आहे.

विधानपरिषदेची रचना

संपादन

१९५६ च्या ७ व्या घटनादुरूस्तीनुसार असे निर्धारित करण्यात आले आहे की, विधानपरिषदेची सदस्य संख्या तेथील विधानसभेच्या सदस्य संख्येच्या १/३ पेक्षा जास्त नसावी आणि ४० पेक्षा कमी नसावी. सध्या महाराष्ट्रात ७८ इतकी सदस्य संख्या आहे.[] घटना कलम क्र. १७१/२ नुसार विधानपरिषदेच्या रचनेबाबद कायदा करण्याचा अधिकार संसदेला आहे. विधानपरिषदेत साधारणपणे ५/६ सदस्य निर्वाचित असतात तर १/६ सदस्य राज्यपालाने नियुक्त केलेले असतात. विधानपरिषदेतील सर्व सदस्य प्रत्यक्ष निवडणुकीद्वारे निवडलेले सदस्य नसतात.

विधानपरिषदेच्या सदस्यांची विभागणी

संपादन

रचना :
१/३ सदस्य विधानसभेच्या सदस्यांकडून निवडले जातात.
१/३ स्थानिक स्वराज्य संस्थांकडून सदस्य निवडले जातात.
१/१२ शिक्षक मतदार संघातून सदस्य निवडले जातात.
१/१२ पदवीधर मतदार संघातून सदस्य निवडले जातात.[]
१/६ राज्यपालाकडून सदस्य नामनिदेशित केले जातात, यामध्ये सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व आर्थिक अशा विविध क्षेत्रातील तज्ञ सदस्य असतात.

सदस्यांची पात्रता

संपादन
  1. तो भारताचा नागरिक असावा.
  2. त्याच्या वयाची ३० वर्ष पूर्ण झालेली असावी.[]
  3. संसदेने वेळोवेळी विहित केलेल्या अटी त्याला मान्य असाव्यात.

सदस्यांचा कार्यकाल

संपादन

सदस्यांचा कार्यकाल 6 वर्ष इतका असतो.

विधानपरिषदेचा कार्यकाल

संपादन

विधानपरिषद हे स्थायी सभागृह आहे ते कधीही विसर्जित होत नाही. दर दोन वर्षानी 1/3 सदस्य निवृत्त होतात आणि तेवढेच नव्याने त्यांच्या जागी निवडले जातात.[]

गणसंख्या

संपादन

१/१० इतकी गणसंख्या असतो.

अधिवेशन

संपादन

दोन अधिवेशनांमध्ये सहा महिन्यापेक्षा जास्त अंतर नसावे.

सभापती व उपसभापती

संपादन

विधानपरिषदेत निवडून आलेल्या सदस्यांकडून एका सदस्याची सभापती तर दुसऱ्या एका सदस्याची उपसभापती म्हणून निवड केली जाते.[]

मतदारसंघ आणि सदस्य (७८)

संपादन

महाराष्ट्र विधान परिषदेचे अलीकडील सदस्य खालीलप्रमाणे आहेत[]

विधानसभेच्या सदस्यांनी निवडलेले (३०)

संपादन

      भाजप (११)       शिवसेना (३)       राष्ट्रवादी (३)       उबाठा (३)       काँग्रेस (३)       राष्ट्रवादी (शप) (२)       रिक्त (५)

# सदस्य पक्ष कार्यकाळ
पंकजा मुंडे भाजप २८-जुलै-२०२४ २७-जुलै-२०३०
योगेश टिळेकर भाजप २८-जुलै-२०२४ २७-जुलै-२०३०
परिणय फुके भाजप २८-जुलै-२०२४ २७-जुलै-२०३०
अमित गोरखे भाजप २८-जुलै-२०२४ २७-जुलै-२०३०
सदाभाऊ खोत भाजप २८-जुलै-२०२४ २७-जुलै-२०३०
प्रवीण दरेकर भाजप ८-जुलै-२०२२ ७-जुलै-२०२८
राम शिंदे भाजप ८-जुलै-२०२२ ७-जुलै-२०२८
उमा खापरे भाजप ८-जुलै-२०२२ ७-जुलै-२०२८
श्रीकांत भारतीय भाजप ८-जुलै-२०२२ ७-जुलै-२०२८
१० प्रसाद लाड भाजप ८-जुलै-२०२२ ७-जुलै-२०२८
११ रणजितसिंह मोहिते-पाटील भाजप १४-मे-२०२० १३-मे-२०२६
१२ कृपाल तुमाने शिवसेना २८-जुलै-२०२४ २७-जुलै-२०३०
१३ भावना गवळी शिवसेना २८-जुलै-२०२४ २७-जुलै-२०३०
१४ नीलम गोऱ्हे शिवसेना १४-मे-२०२० १३-मे-२०२६
१५ शिवाजीराव गर्जे राष्ट्रवादी २८-जुलै-२०२४ २७-जुलै-२०३०
१६ रामराजे नाईक निंबाळकर राष्ट्रवादी ८-जुलै-२०२२ ७-जुलै-२०२८
१७ अमोल मिटकरी राष्ट्रवादी १४-मे-२०२० १३-मे-२०२६
१८ मिलिंद नार्वेकर उबाठा २८-जुलै-२०२४ २७-जुलै-२०३०
१९ सचिन अहिर उबाठा ८-जुलै-२०२२ ७-जुलै-२०२८
२० उद्धव ठाकरे उबाठा १४-मे-२०२० १३-मे-२०२६
२१ प्रज्ञा सातव काँग्रेस २८-जुलै-२०२४ २७-जुलै-२०३०
२२ भाई जगताप काँग्रेस ८-जुलै-२०२२ ७-जुलै-२०२८
२३ राजेश राठोड काँग्रेस १४-मे-२०२० १३-मे-२०२६
२४ एकनाथ खडसे राष्ट्रवादी (शप) ८-जुलै-२०२२ ७-जुलै-२०२८
२५ शशिकांत शिंदे राष्ट्रवादी (शप) १४-मे-२०२० १३-मे-२०२६
२६ 23-नोव्हेंबर-2024 पासून रिक्त[a] २७-जुलै-२०३०
२७ 23-नोव्हेंबर-2024 पासून रिक्त[b] ७-जुलै-२०२८
२८ 23-नोव्हेंबर-2024 पासून रिक्त[c] १३-मे-२०२६
२९ 23-नोव्हेंबर-2024 पासून रिक्त[d] १३-मे-२०२६
३० 23-नोव्हेंबर-2024 पासून रिक्त[e] १३-मे-२०२६

स्थानिक प्राधिकरणांच्या मतदारसंघातून निवडून आलेले (२२)

संपादन

कळा:       भाजप (3)       उबाठा (२)       काँग्रेस (१)       रिक्त (१६)

# मतदारसंघ सदस्य पार्टी कार्यकाळ
मुंबई सुनील शिंदे उबाठा २-जानेवारी-२०२२ १-जानेवारी-२०२८
मुंबई राज हंस सिंग भाजप २-जानेवारी-२०२२ १-जानेवारी-२०२८
धुळे-नंदुरबार अमरीश पटेल भाजप २-जानेवारी-२०२२ १-जानेवारी-२०२८
नागपूर 23-नोव्हेंबर-2024 पासून रिक्त[f] १-जानेवारी-२०२८
अकोला-वाशिम-बुलढाणा वसंत खंडेलवाल भाजप २-जानेवारी-२०२२ १-जानेवारी-२०२८
कोल्हापूर सतेज पाटील काँग्रेस २-जानेवारी-२०२२ १-जानेवारी-२०२८
औरंगाबाद-जालना अंबादास दानवे उबाठा ३०-ऑगस्ट-२०१९ २९-ऑगस्ट-२०२५
उस्मानाबाद-लातूर-बीड रिक्त
अमरावती रिक्त
१० वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली रिक्त
११ नाशिक रिक्त
१२ परभणी-हिंगोली रिक्त
१३ रायगड-रत्‍नागिरी-सिंधुदुर्ग रिक्त
१४ जळगाव रिक्त
१५ भंडारा-गोंदिया रिक्त
१६ पुणे रिक्त
१७ सांगली-सातारा रिक्त
१८ नांदेड रिक्त
१९ यवतमाळ रिक्त
२० ठाणे-पालघर रिक्त
२१ अहमदनगर रिक्त
२२ सोलापूर रिक्त

शिक्षक मतदारसंघातून निवडून आलेले (७)

संपादन

      भाजप (१)       शिवसेना (१)       राष्ट्रवादी (१)       काँग्रेस (१)       उबाठा (१)       अपक्ष (२)

# मतदारसंघ सदस्य पार्टी कार्यकाळ
मुंबई जगन्नाथ अभ्यंकर उबाठा ८-जुलै-२०२४ ७-जुलै-२०३०
नाशिक किशोर दराडे शिवसेना ८-जुलै-२०२४ ७-जुलै-२०३०
कोकण ज्ञानेश्वर म्हात्रे भाजप ८-फेब्रुवारी-२०२३ ७-फेब्रुवारी-२०२९
संभाजीनगर विक्रम काळे राष्ट्रवादी ८-फेब्रुवारी-२०२३ ७-फेब्रुवारी-२०२९
नागपूर सुधाकर अडबाळे अपक्ष ८-फेब्रुवारी-२०२३ ७-फेब्रुवारी-२०२९
पुणे जयंत आसगावकर काँग्रेस ७-डिसेंबर २०२० ६-डिसेंबर २०२६
अमरावती किरण सरनाईक अपक्ष ७-डिसेंबर २०२० ६-डिसेंबर २०२६

पदवीधर मतदारसंघातून निवडून आलेले (७)

संपादन

      काँग्रेस (२)       भाजप (१)       उबाठा (१)       राष्ट्रवादी (१)       राष्ट्रवादी (शप) (१)       अपक्ष (१)

# मतदारसंघ सदस्य पार्टी कार्यकाळ
कोकण निरंजन डावखरे भाजप ८-जुलै-२०२४ ७-जुलै-२०३०
मुंबई अनिल परब उबाठा ८-जुलै-२०२४ ७-जुलै-२०३०
अमरावती धनंजय लिंगाडे काँग्रेस ८-फेब्रुवारी-२०२३ ७-फेब्रुवारी-२०२९
नाशिक सत्यजित तांबे अपक्ष ८-फेब्रुवारी-२०२३ ७-फेब्रुवारी-२०२९
नागपूर अभिजित वंजारी काँग्रेस ७-डिसेंबर-२०२० ६-डिसेंबर-२०२६
औरंगाबाद सतीश चव्हाण राष्ट्रवादी ७-डिसेंबर-२०२० ६-डिसेंबर-२०२६
पुणे अरुण लाड राष्ट्रवादी (शप) ७-डिसेंबर-२०२० ६-डिसेंबर-२०२६

राज्यपाल नामनिर्देशित (१२)

संपादन

      भाजप (३)       शिवसेना (२)       राष्ट्रवादी (२)       रिक्त (५)

# सदस्य पार्टी कार्यकाळ
चित्रा वाघ भाजप १६-ऑक्टोबर-२०२४ १५-ऑक्टोबर-२०३०
विक्रांत पाटील भाजप १६-ऑक्टोबर-२०२४ १५-ऑक्टोबर-२०३०
बाबुसिंग राठोड भाजप १६-ऑक्टोबर-२०२४ १५-ऑक्टोबर-२०३०
हेमंत पाटील शिवसेना १६-ऑक्टोबर-२०२४ १५-ऑक्टोबर-२०३०
मनीषा कायंदे शिवसेना १६-ऑक्टोबर-२०२४ १५-ऑक्टोबर-२०३०
पंकज भुजबळ राष्ट्रवादी १६-ऑक्टोबर-२०२४ १५-ऑक्टोबर-२०३०
इद्रिस नायकवडी राष्ट्रवादी १६-ऑक्टोबर-२०२४ १५-ऑक्टोबर-२०३०
१०
११
१२

बाह्य दुवे

संपादन
  1. http://103.23.150.139/Home/Index
  2. https://www.mpscworld.com/bharatiy-nyayvyavashtebaddal-sampurn-mahiti/
  3. https://www.mpscworld.com/vidhanparishadebaddal-sampurn-mahiti/
  4. http://mls.org.in/pdf/Margdarshika.pdf

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ विधानमंडळ, महाराष्ट्र. "Maharashtra Legislature". mls.org.in. 12 नोव्हेंबर 2019 रोजी पाहिले.
  2. ^ विधानमंडळ, महाराष्ट्र. "Maharashtra Legislature". mls.org.in. 12 नोव्हेंबर 2019 रोजी पाहिले.
  3. ^ Patil, Dhanshri. "विधानपरिषदेबद्दल संपूर्ण माहिती". MPSC World. 12 नोव्हेंबर 2019 रोजी पाहिले.
  4. ^ Patil, Dhanshri. "विधानपरिषदेबद्दल संपूर्ण माहिती". MPSC World. 12 नोव्हेंबर 2019 रोजी पाहिले.
  5. ^ Patil, Dhanshri. "विधानपरिषदेबद्दल संपूर्ण माहिती". MPSC World. 12 नोव्हेंबर 2019 रोजी पाहिले.
  6. ^ Patil, Dhanshri. "विधानपरिषदेबद्दल संपूर्ण माहिती". MPSC World. 12 नोव्हेंबर 2019 रोजी पाहिले.
  7. ^ Patil, Dhanshri. "विधानपरिषदेबद्दल संपूर्ण माहिती". MPSC World. 12 नोव्हेंबर 2019 रोजी पाहिले.
  8. ^ http://mls.org.in/pdf2021/winter/list-of-council-member.pdf साचा:Bare URL PDF


चुका उधृत करा: "lower-alpha" नावाच्या गटाकरिता <ref>खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत <references group="lower-alpha"/> खूण मिळाली नाही.