गोपीचंद कुंडलिक पडळकर (१९८२ - ) हे भारतीय जनता पक्षाचे भारतीय राजकारणी आहेत.[१] ते महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्य आहेत. ते १४ मे २०२० रोजी विधानपरिषदेवर निवडून आले. २०१९ महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला,त्यापूर्वी ते राष्ट्रीय समाज पक्षमधून भाजप आणि भाजपमधून बहुजन वंचित आघाडी आणि नंतर पुन्हा भाजप असा त्यांचा प्रवास होता.[२] त्यांनी धुमस या चित्रपटामध्ये भूमिका केलेली आहे.

राजकीय कारकीर्द संपादन

पडळकर हे महाराष्ट्रातील धनगर समाजाचे आहेत. २०२० मध्ये ते ९ जणांसह भाजपच्या वतीने महाराष्ट्र विधानपरिषदेवर निवडूनआले. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि बारामती येथून अजितदादांच्या विरोधात विधानसभेची निवडणूक लढवली परंतु त्यांचा पराभव झाला

पदे संपादन

महाराष्ट्र विधान परिषद सदस्य (१४ मे २०२०)

भाजपाचे अध्यक्ष, पश्चिम महाराष्ट्र

संदर्भ संपादन

  1. ^ "Finally, Uddhav Thackeray elected Maharashtra MLC". https://www.outlookindia.com/. 2020-11-08 रोजी पाहिले. External link in |website= (सहाय्य)
  2. ^ "Maharashtra MLC election 2020: BJP candidate list out for May 21 polls, 4 contenders named". https://www.financialexpress.comlanguage=en-US. 2020-05-08. 2020-11-08 रोजी पाहिले.