महादेव जानकर
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
महादेव जानकर हे महाराष्ट्रातील एक प्रमुख राजकीय नेते असून त्यांनी राष्ट्रीय समाज पक्षाची स्थापना केली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, महात्मा फुल्यांच्या विचारांचा वारसा जपणारा आपला पक्ष आहे असा त्यांचा दावा आहे. दलित, आदिवासी, ओबीसी, अल्पसंख्यांक हा राष्ट्रीय समाज पक्षाचा प्रमुख मतदार आहे. जानकर यांचा जन्म १९ एप्रिल १९६८ रोजी पळसावडे, ता. माण, जी. सातारा येथे झाला. त्यांचे शिक्षण वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय, सांगली येथे झाले असून त्यांनी विद्युत अभियांत्रिकी ची पदविका (Diploma) घेतलेली आहे. तरुण वयात जानकर यांच्यावर कांशीराम यांच्या विचारांचा प्रभाव होता. कांशीराम यांच्या बहुजन समाज पक्ष पासून प्रेरणा घेऊन जानकर यांनी महाराष्ट्रात राष्ट्रीय समाज पक्ष स्थापन केला. पश्चिम महाराष्ट्रात तुलनेने जास्त असणाऱ्या धनगर समाजातील जानकर आहेत. तसेच त्यांची ताकद मराठवाड्यातही आहे. त्यामुळे त्यांना डावलणे सहज सोपे नव्हते. त्यामुळे भाजपने त्यांना विधानपरिषदेवर घेऊन त्यांना मंत्रिपद देण्याचे निश्चित केले . जानकर हे माण तालुक्यातील पळसावडे या गावचे आहेत.
राजकीय कार्य
संपादनमहादेव जानकर यांनी २००३ साली राष्ट्रीय समाज पक्ष स्थापन केला. जानकर हे या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असून हा पक्ष प्रामुख्याने महाराष्ट्र, गुजरात, आसाम, बिहार, कर्नाटक, उत्तरप्रदेश, गोवा अशा राज्यात अनेक निवडणुका लढवतो. २००४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत रासपाचे ३८ उमेदवार रिंगणात होते. त्यांना एकूण १४४,७५३ मते मिळाली जी एकूण मतांच्या ०.३५% होती. २००४ साली लोकसभा निवडणुकीत त्यांनी महाराष्ट्र आणि कर्नाटक मधून १२ उमेदवार उभे केले. रासपाला एकूण १४६,५७१ (०.०४%) मते मिळाली. २००९ साली लोकसभा निवडणुकीत पक्षाने महाराष्ट्रात २९, आसाममध्ये २, गुजरात आणि कर्नाटकात प्रत्येकी १ याप्रमाणे उमेदवार उभे केले. त्यांना महाराष्ट्रात एकूण १,९०,७४३ आणि देशभरातून २,०१,०६५ मते मिळाली. पक्षाध्यक्ष [[महादेव जानकर स्वतः माढा लोकसभा मतदारसंघ मध्ये शरद पवार(राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष) आणि सुभाष देशमुख (भारतीय जनता पार्टी) यांच्या विरोधात उभे राहिले होते. त्यांना एकूण मतांच्या १०.७६ % मते प्राप्त झाली. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत जानकर हे बारामती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उभे राहिले होते. जानकर यांना एकूण ४,५१,८४३ मते प्राप्त झाली. सुळे यांना ४८.८८ % मते प्राप्त झाली, तर जानकर यांना ४२.३५ % मते मिळाली. २०२४ला झालेल्या लोकसभा निवडणुकीत महादेव जानकर यांनी परभणी लोकसभा मतदारसंघ (महाराष्ट्र) येथुन संजय जाधव शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या विरोधात निवडणूक लढवली व या निवडणुकीत त्यांचा १,३४,०६१ मतांनी पराभव झाला. संजय जाधव यांना एकूण ६,०१,३४३ मते मिळाली होती.
संदर्भ
संपादनबाह्य दुवे
संपादन- [१]
- ["A ‘fakir’ who is out to slay an ‘emperor’". Mumbai Mirror. 12 September 2014. Retrieved 30 September 2014.]