राष्ट्रीय समाज पक्ष
राष्ट्रीय समाज पक्ष | |
---|---|
पक्षाध्यक्ष | महादेव जानकर |
स्थापना | २००३ |
मुख्यालय | १/बी ३५, हमाम स्ट्रीट,
अंबालाल दोशी मार्ग, फोर्ट मुंबई ४०० ०२३ |
युती | राष्ट्रीय लोकशाही आघाडी |
संकेतस्थळ | [१] |
राष्ट्रीय समाज पक्ष एक भारतातील राजकीय पक्ष आहे. या पक्षाची स्थापना २००३ मध्ये झाली. महादेव जानकर हेेे पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आहेत. या पक्षाने आज पर्यंत ४ राज्यात २ लोकसभा लढविल्या. या पक्षाने महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, आसाम, उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहार, तमिळनाडू मध्यप्रदेश विधानसभा निवडणूका लढविल्या आहेत. सध्या ८ राज्यात पक्ष कार्यरत आहे. २०१७ झालेल्या महाराष्ट्रातील निवडणूकीत रा.स.प. ने जिल्हापरिषदेवर १२ आणि तालुका पंचायतवर १८ सभासद निवडून आणले. ०.२ मतदान मिळवून राष्ट्रीय समाज पक्ष राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता प्राप्त होण्याच्या दिशेने मार्गक्रमण करीत आहे. याला निर्वाचन आयोगाकडून मान्यता मिळालेली आहे.
२००३ साली पक्ष स्थापन करून २०१३ पर्यन्त ग्रामपंचायत, ते विधानसभा- लोकसभा लढविणे आणि जिंकणे, यात यश आले आहे. 2009ला राष्ट्रीय समाज पक्षाचा एक आमदार निवडून आला आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणूकीमध्ये दौंड मतदार संघातून राहूल कूल हे निवडून आले आहेत. ब्राह्मण –मराठा ते जैन – मुस्लिम अल्पसंख्य समाजाला राष्ट्रीय समाजाचा प्रमुख घटक मानतो. “एकात्म राष्ट्र निर्माण” हे त्यांनी आपले ध्येय बनविले आहे. राजकीय सत्ता हे साध्य तर राष्ट्रीय समाज पक्ष हे साधन आणि वाहन बनाविले आहे. त्याच बरोबर पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी सन 2014ची लोकसभा महाराष्ट्रातील बारामती लोकसभा निवडणूक लढवली, त्यामध्ये वर्षानुवर्षे राजकारणात आघाडीवर राहिलेले नाव म्हणजे शरद पवार व नेहमीच 3-4 लाखांची आघाडी घेणारेच्या बालेकिल्यात जवळ पास 5 लाखापर्यंत मतदान मिळवून राजकिय भूकंप घडविला. त्या पाठोपाठ राज्याच्या विधानसभेच्या निवडणूकीमध्ये दौंड मधून रासपचे उमेदवार राहुल सुभाष कुल हे 14 हजारांच्या वर आघाडी घेऊन निवडून आले. आज रासपची घोडदौड चालू असून येणार्रया 2019ला सत्तेत जरी राहता आले नाही, तरी विरोधी पक्ष म्हणून का होईना मजल मारण्याच्या प्रयत्नात आहे. सर्व जाती धर्माला, व बहुजन वर्गाला राष्ट्रीय समाज पक्षाचा चांगलाच जनाधार मिळत चालला आहे.