भारताचा स्वातंत्र्यलढा

ब्रिटिशांविरुद्ध भारतीय स्वातंत्र्य चळवळ (१८५७ - १९४७)
(भारताचा स्वातंत्र्यसंग्राम या पानावरून पुनर्निर्देशित)

भारतीय स्वातंत्र्य चळवळ ही ऐतिहासिक घटनांची मालिका होती, ज्याचा अंतिम उद्देश भारतातील ब्रिटिश राजवट संपवणे हा होता. हा स्वातंत्र्यलढा १८५७ ते १९४७ या काळात चालला.[]

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन, इ.स. १८८५. काँग्रेस ही ब्रिटिश साम्राज्यातील पहिली आधुनिक राष्ट्रवादी चळवळ होती.
Movimiento de independencia indio (es); Indian independence movement (en-gb); د هند د خپلواکۍ غورځنګ (ps); Индийско движение за независимост (bg); mișcarea pentru independența Indiei (ro); تحریک آزادی ہند (ur); Indiens självständighetsrörelse (sv); Рух за незалежність Індії (uk); 印度獨立運動 (zh-hant); 인도 독립운동 (ko); ভাৰতৰ স্বাধীনতা আন্দোলন (as); movado por hinda sendependeco (eo); Indické hnutí za nezávislost (cs); भारत की आज़ादी क लड़ाई (bho); ভারতের স্বাধীনতা আন্দোলন (bn); Mouvement pour l'indépendance de l'Inde (fr); Indijski pokret za nezavisnost (hr); އިންޑިޔާގެ މިނިވަންކަން (dv); भारतीय स्वातंत्र्यलढा (mr); Phong trào độc lập Ấn Độ (vi); Indijski pokret za nezavisnost (sr); Movimento de independência da Índia (pt-br); Ìn-tō͘ to̍k-li̍p ūn-tōng (nan); Den indiske selvstyrekamp (nb); India vabahusliikminõ (vro); ಭಾರತದ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಚಳುವಳಿ (kn); Indian independence movement (en); حركة الاستقلال الهندية (ar); 印度獨立運動 (yue); indiai függetlenségi mozgalom (hu); ભારતનો સ્વાતંત્ર્ય સંગ્રામ (gu); Indiako mugimendu independentista (eu); Movimientu d'independencia indiu (ast); Moviment d'independència de l'Índia (ca); Һинд милли-азатлыҡ хәрәкәте (ba); भारतीय स्वतन्त्रता आन्दोलन (mai); جنبش استقلال هند (fa); 印度独立运动 (zh); Indiens uafhængighedsbevægelse (da); भारतीय स्वतन्त्रता संग्राम (ne); インド独立運動 (ja); תנועת העצמאות ההודית (he); भारतस्य स्वातन्त्र्यसङ्ग्रामः (sa); भारतीय स्वतन्त्रता आन्दोलन (hi); భారత స్వాతంత్ర్యోద్యమం (te); ਭਾਰਤ ਦਾ ਆਜ਼ਾਦੀ ਸੰਗਰਾਮ (pa); Indian independence movement (en-ca); இந்திய விடுதலை இயக்கம் (ta); Movimento d'indipendenza indiano (it); індыйскі нацыянальна-вызвольны рух (be-tarask); Den indiske frigjeringsrørsla (nn); 印度独立运动 (zh-hans); Movimento de independência da Índia (pt); Intian itsenäisyysliike (fi); भारतीय स्वतन्त्रता संग्राम (anp); ඉන්දියානු නිදහස් ජාතික ව් යාපාරය (si); भारतीय स्वतन्त्रता संग्राम (new); indijsko gibanje za neodvisnost (sl); ଭାରତୀୟ ସ୍ୱତନ୍ତ୍ରତା ଆନ୍ଦୋଳନ (or); ᱥᱤᱧᱚᱛᱤᱭᱟᱹ ᱯᱷᱩᱨᱜᱟᱹᱞ ᱞᱟᱲᱟᱣᱱᱟ (sat); 印度獨立運動 (zh-hk); ขบวนการเอกราชอินเดีย (th); Indische Unabhängigkeitsbewegung (de); ഇന്ത്യയുടെ സ്വാതന്ത്ര്യസമരം (ml); Indiaase onafhankelijkheids beweging (nl); Индийское национально-освободительное движение (ru); gerakan kemerdekaan India (id); Hindistan Bağımsızlık Hareketi (tr); Հնդկաստանի ազգային-ազատագրական շարժում (hy); Movemento de independencia da India (gl); بھارت دی آزادی دی تحریک (pnb); Κίνημα για την ανεξαρτησία της Ινδίας (el); ინდოეთის ეროვნულ-განმათავისუფლებელი მოძრაობა (ka) স্বাধীন ভারতের অভ্যুদয়ের ইতিহাস (bn); mouvement social et politique visant à la fin de la domination britannique en Inde (fr); палітычны рух (be-tarask); широкий спектр политических движений, основной целью которого была независимость Индии (ru); ब्रिटिशांविरुद्ध भारतीय स्वातंत्र्य चळवळ (१८५७ - १९४७) (mr); movimento para acabar com o domínio britânico sobre a Índia de 1857–1947 (pt); družbeno in politično gibanje za odpravo britanske vladavine v Indiji (1857–1947) (sl); gerakan nasional India yang berusaha mengakhiri kekuasaan Britania (1857-1947) (id); ଭାରତ ଦେଶର ଇତିହାସରେ ଘଟିତ ହୋଇଥିବା ଏକ ମହତ୍ତ୍ୱପୂର୍ଣ୍ଣ ଘଟଣା କ୍ରମ (or); תנועה לאומית הודית שפעלה לסיום השלטון הבריטי (1857-1947) (he); ഇന്ത്യയിലെ കോളനിഭരണത്തിനെതിരെ നടന്ന സമരം (ml); ಬ್ರಿಟಿಷರ ವಿರುದ್ಧ ಭಾರತೀಯರು ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯಕ್ಕಾಗಿ ನಡೆಸಿದ ಹೋರಾಟ indian freedom struggle in kannada (kn); ब्रिटिश राज के विरुद्ध भारतीय उपमहाद्वीप में स्वतन्त्रता हेतु ऐतिहासिक विद्रोह (1857-1947) (hi); భారతదేశ స్వాతంత్ర్య సముపార్జనకై జరిగిన అనేక ఉద్యమం (te); poliittinen liike Brittiläisessä Intiassa 1800- ja 1900-luvuilla (fi); ভাৰতত ইংৰাজৰ শাসনৰ অন্ত পেলোৱাৰ আন্দোলন (as); Indian national movement seeking to end British rule (1857–1947) (en); politické hnutí (cs); இந்திய விடுதலைப் போராட்டம் (ta) ভারতীয় স্বাধীনতা আন্দোলন, ব্রিটিশ বিরোধী স্বাধীনতা আন্দোলন (bn); Mouvement pour l'independance de l'Inde, Mouvement d'indépendance indien (fr); рух за незалежнасьць Індыі (be-tarask); Independence of India (dv); Moviment independentista de l'Índia, Moviment independentista indi, Moviment d'independència indi (ca); ଭାରତୀୟ ସ୍ୱତନ୍ତ୍ରତା ସଂଗ୍ରାମ, ଭାରତୀୟ ସ୍ୱାଧିନତା ଆନ୍ଦୋଳନ, ଭାରତୀୟ ସ୍ୱାଧିନତା ସଂଗ୍ରାମ, ସ୍ୱତନ୍ତ୍ରତା ଆନ୍ଦୋଳନ (or); جنبش استقلال هندوستان (fa); 印度獨立 (zh); indijsko gibanje za svobodo, indjski boj za neodvisnost, indijska revolucija, indijsko nacionalno gibanje (sl); Незалежність Індії (uk); Indiens historia: Självständighetsrörelsen (sv); Indian Independence Movement, ഇന്ത്യൻ സ്വാതന്ത്ര്യ സമരം, ഇന്ത്യൻ സ്വാതന്ത്ര്യസമരം, ഇന്ത്യൻ സ്വാതന്ത്ര്യ സമര പ്രസ്ഥാനം (ml); ඉන්දියා ජාතික ව් යාපාරය (si); Движение за освобождение Индии (ru); Movemento independentista da India, Movemento independentista indio, Movemento de independencia indio (gl); भारतीय स्वतंत्रता संग्राम, भारतीय स्वाधीनता आंदोलन, भारतीय स्वाधीनता संग्राम, भारतीय स्वातंत्र्य संग्राम, स्वतंत्रता आंदोलन, स्वतन्त्रता संग्राम, स्वाधीनता आंदोलन, भारतीय स्वतंत्रता आन्दोलन, भारत की स्वतन्त्रता, भारतीय स्वतंत्रता, भारत की स्वाधीनता, भारत की स्वतंत्रता, भारत की आज़ादी, भारतीय स्वतन्त्रता संग्राम (hi); ಭಾರತದ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಹೋರಾಟ, ಭಾರತ ಸ್ವಾತಂತ್ರ ಸಂಗ್ರಾಮ, ಭಾರತೀಯ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಆಂದೋಲನ, ಭಾರತದ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಸಂಗ್ರಾಮ, ಭಾರತದ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ, ಭಾರತದ ಸ್ವಾತಂತ್ರ ಹೋರಾಟ, ಭಾರತ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಚಳುವಳಿ, ಭಾರತೀಯ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಚಳುವಳಿ (kn); భారతజాతీయోద్యమం, భారత స్వాతంత్ర్య సమరం, భారత స్వాతంత్ర్య పోరాటం, భారత స్వాతంత్ర్య ఉద్యమము, భారత స్వాతంత్ర్య సంగ్రామం, భారత స్వాతంత్ర్య ఉద్యమం, భారత స్వాతంత్రోద్యమము, భారత స్వాతంత్ర్యోద్యమము (te); India's Freedom Struggle, Indian Independence Movement, Indian freedom movement, Indian National Movement, India's Independence Movement, Indian Revolution, Indian independence struggle (en); भारतीय स्वाधीनता संग्राम (ne); Indisk selvstyrekamp (nb); இந்திய சுதந்திரப் போராட்டம், இந்திய விடுதலைப் போராட்டம், இந்திய சுதந்திர இயக்கம், இந்திய விடுதலைப் போர் (ta)
भारतीय स्वातंत्र्यलढा 
ब्रिटिशांविरुद्ध भारतीय स्वातंत्र्य चळवळ (१८५७ - १९४७)
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारindependentism
स्थान भारत
भाग
आरंभ वेळइ.स. १७५७
शेवटऑगस्ट १५, इ.स. १९४७ (independence of India)
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

भारतीय स्वातंत्र्यासाठी पहिली राष्ट्रवादी क्रांतिकारी चळवळ बंगालमधून उदयास आली होती. प्रमुख राष्ट्रीय नेत्यांनी स्थापन केलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने या चळवळीचा पाया भक्कम केला. हे नेते भारतीय लोकांच्या नागरी सेवा परीक्षांना बसण्याच्या अधिकारासाठी तसेच अधिक आर्थिक अधिकार मिळवण्यासाठी प्रयत्नशील होते. २० व्या शतकाच्या पूर्वार्धात लाल बाल पाल, अरविंद घोष आणि व्हीओ चिदंबरम पिल्लई यांनी स्वराज्यासाठी अधिक मूलगामी दृष्टीकोन पाहिला.[]

ब्रिटिश भारत

१९२०मधील स्वराज्य संघर्षाच्या शेवटच्या टप्प्यात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने महात्मा गांधी यांच्या अहिंसा आणि सविनय कायदेभंगाच्या धोरणाचा अवलंब केला. रवींद्रनाथ टागोर, सुब्रमण्यम भारती आणि बंकिमचंद्र चटोपाध्याय यांसारख्या अनेक विचारवंतांनी देशभक्तीची भावना जनमानसात पसरवली. तर सरोजिनी नायडू, प्रीतिलता वड्डेदार आणि कस्तुरबा गांधी यांसारख्या महिला नेत्यांनी महिलांना स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेण्यासाठी प्रोत्साहन दिले. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय समाजातील वंचित घटकांना मदत केली.[]

तर काही नेत्यांनी सशस्त्र क्रांतीचा अवलंब केला. सशस्त्र क्रांती विशेषतः रौलेट कायद्यानंतर लोकप्रिय झाली. या कायद्याने लोकांना अनिश्चित काळासाठी तुरुंगात डांबण्याची परवानगी ब्रिटिश सरकारला परवानगी दिली होती. या कायद्याविरोधात संपूर्ण भारतभर विशेषतः पंजाब प्रांतात निषेध झाला. पंजाबमधील जालियनवाला बाग हत्याकांडाद्वारे ब्रिटिशांनी हे आंदोलन हिंसकपणे दडपले. भगतसिंग, शिवराम राजगुरू, सुखदेव थापर, चंद्रशेखर आझाद आणि सुभाषचंद्र बोस यांसारख्या क्रांतिकारकांनी काँग्रेसच्या निष्क्रियतेमुळे निराश होऊन हिंसक मार्गांचा अवलंब सुरू केला. बोस यांनी अक्षीय शक्तींशी स्वतःला प्रसिद्धी दिली आणि आझाद हिंद सेनेची स्थापना केली. यादरम्यान भगतसिंग, राजगुरू, सुखदेव आणि चंद्रशेखर आझाद यांनी प्रमुख ब्रिटिश अधिकाऱ्यांची हत्या केली आणि सरकारी इमारतींवर बॉम्बस्फोट केले.

महात्मा गांधी यांचे लंडनमधील चित्र (१९३१)

भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये सतत वैचारिक उत्क्रांती होत होती. मूलतः वसाहतविरोधी असलेली ही चळवळ धर्मनिरपेक्षता, लोकशाही, प्रजासत्ताक आणि नागरी-स्वातंत्र्यवादी अशा विचारांच्या राजकीय संरचनेसह स्वतंत्र, आर्थिक विकासाच्या दृष्टींनी पूरक होती. १९३० नंतर या लढ्याने एक मजबूत समाजवादी प्रवृत्ती स्वीकारली. स्वातंत्र्य आंदोलनामुळे शेवटी भारतीय स्वातंत्र्य कायदा, १९४७ तयार होऊन भारतातील ब्रिटिश राजवट संपुष्टात आली आणि पाकिस्तानची निर्मिती झाली.

२६ जानेवारी १९५० रोजी भारतीय संविधान लागू होऊन भारतीय प्रजासत्ताकची स्थापना होईपर्यंत हा देश ब्रिटिश साम्राज्याचाच एक भाग होता. १९५६ मध्ये पाकिस्तानने स्वतःचे संविधान स्वीकारले; तोपर्यंत तो ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली होता. तर १९७१ मध्ये पूर्व पाकिस्तानने बांगलादेश म्हणून स्वतःचे स्वातंत्र्य घोषित केले. []

ऐतिहासिक पार्श्वभूमी

संपादन

पोर्तुगीज खलाशी वास्को- द- गामा हा इ.स.१४९८ साली समुद्रमार्गे कालिकत बंदरात आला.[] व्यापाराच्या विस्तारासाठी त्याच्या मागोमाग डच, फ्रेंच यांनीही भारतीय उपखंडात प्रवेश केला. भारताच्या समृद्धीचे आणि संपन्नतेचे आकर्षण जगभरातील सर्वच साम्राज्यांना होते. सुरत येथे इ.स. १६१३ साली डचांचे पहिले व्यापारी केंद्र उभारले गेले. त्यांच्यानंतर भारतात प्रविष्ट झालेल्या ब्रिटिश व्यापारी वर्गाने फ्रेंच आणि पोर्तुगीज यांच्याशी संघर्ष केला. परकीय आक्रमक सत्तांनी भारताच्या निरनिराळ्या प्रदेशात आपले पाय रोवायला सुरुवात केली होती. मोगलांचे आक्रमण ही सुद्धा एक विशेष घटना भारताच्या इतिहासात नोंद घेण्याजोगी आहे. मोगलांची सत्ता १८ व्या शतकाच्या मध्यात संपुष्टात आली आणि ब्रिटिश राज्यकर्त्यांनी या संधीचा फायदा घेतला.[] इ.स. १८५७ च्या उठावात भारतीयांचा पराभव करून ब्रिटिशांनी ईस्ट इंडिया कंपनीचे वर्चस्व भारतात प्रस्थापित केले होते.[] त्या जोरावर १८ व्या शतकातही ब्रिटिशांनी भारतावर आपले वर्चस्व अबाधित राखण्यासाठी प्रयत्न केले आणि त्यात ते यशस्वी झाले.

 
ईस्ट इंडिया कंपनीचा ध्वज

१८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध

संपादन
 
१८५७चा उठाव

ब्रिटिशांच्या व्यापारामुळे आणि वसाहतवादी धोरणामुळे त्यांची भारतावर स्थापन झालेली सत्ता मोडून काढण्यासाठी इ.स. १८५७ साली भारतीयांनी उठाव केला.[] इंग्रजानी भारतीय नागरिकांवर लादलेल्या प्रक्षोभक कायद्यामुळे भारतातील प्रजेचा असंतोष वाढत होता. रावसाहेब पेशवे, तात्या टोपे, मंगल पांडे, झाशीची राणी लक्ष्मीबाई अशी काही विशेष नावे या उठावाशी संबंधित आहेत.[][१०] हा उठाव अयशस्वी ठरला असला तरी यांच्या झुंजार पराक्रमाने भारतीय इतिहासात मोलाची भर घातलेली आहे. या लढ्याच्या अपयशाची परिणती म्हणून ब्रिटिश राणीचा अंमल भारतावर सुरू झाला.[११]

बंगालची फाळणी आणि वंगभंग चळवळ

संपादन

इ.स. १९०५ साली लॉर्ड कर्झन याने बंगालची फाळणी केली.[१२] पूर्व बंगाल आणि आसाम हे प्रांत एकत्र केले आणि दुसरीकडे पश्चिम बंगालची स्वतंत्र रचना केली. त्याच्या या कृत्यामुळे भारतीय नागरिक संतप्त झाले.[१३] रवींद्रनाथ टागोर यांनी या घटनेचा तीव्र निषेध नोंदविला होता. या फाळणीच्या विरोधात भारतीयांनी १९०८ साली वंगभंग चळवळ सुरू केली.[१४]

 
अनुशीलन समितीचे चिहन

देशभक्तांची चळवळ

संपादन
 
लाल-बाल-पाल
  • चळवळीच्या प्रेरणा देणारे नेतृत्व-

देशातील युवकांना विशेषतः देशभक्तीचे महत्त्व पटवून देण्यासाठी अनेक व्यक्तीनी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविला आणि आपल्या कार्यातून देशातील नागरिकांना आवाहन केले. स्वामी विवेकानंद, योगी अरविंद, रवींद्रनाथ टागोर, भगिनी निवेदिता, लाला लजपतराय, सय्यद अहमद खान, बंकिमचंद्र चॅटर्जी, दादाभाई नौरोजी यासारख्या अनेक व्यक्तींचे योगदान महत्त्वाचे ठरले आहे. लाल-बाल-पाल ही त्रयी म्हणजे लाला लजपतराय, बाळ गंगाधर टिळक आणि बिपीनचंद्र पाल यांनी या सर्व क्रांतीकार्याची धुरा पेलली.[१५] लोकमान्य टिळक यांना मंडाले येथे झालेली राजद्रोहाच्या आरोपासाठी जन्मठेप,[१६] स्वातंत्र्यवीर सावरकर यांना झालेली अंदमानच्या काळ्या समुद्रावरील जन्मठेप या ऐतिहासिक घटना स्वातंत्र्यसंग्रामात महत्त्वाच्या ठरल्या आहेत.भगिनी निवेदिता यांच्या कल्पनेनुसार अवनींद्रनाथ ठाकूर यांनी क्रांतीकार्याला प्रेरक असे भारतमातेचे चित्र तयार केले. हे चित्र सर्वत्र प्रसारित करण्यात आले.

 
अवनींद्रनाथ ठाकूर यांनी काढलेले भारतमातेचे चित्र
  • मिठाचा सत्याग्रह-

ब्रिटिश सत्तेचा भारतावरील अंमल मोडून काढण्यासाठी भारतात पद्धतशीरपणे आणि नियोजनपूर्वक चळवळ आखली गेली. यांच्या धुरीणांनी समाजाला आवाहन केले आणि भारताचे नागरिक स्वतःच्या प्रेरणेने या स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झाले हे याचे वैशिष्ट्य म्हणून सांगता येईल.महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाने केला गेलेला दांडी येथील मिठाचा सत्याग्रह हा याचेच एक उदाहरण होय.[१७] गांधीजी हे लंडन येथून ब्यारीस्टर शिक्षण संपादन करून परत भारतात आले. त्यांच्या अहिंसेच्या तत्त्वाला अनुसरून त्यांनी स्वातंत्र्य प्राप्तीसाठी लोकांना संघटित केले.[१८] मिठाचा सत्याग्रह किंवा ब्रिटिश राजवटीशी असहकार चळवळ या चळवळी त्यांच्या नेतृत्वाने झाल्या. स्वातंत्र्य प्राप्त करण्यात अशा चळवळींना थेट यश आले नसले तरी त्यामुळे देशातील नागरिकांत स्वातंत्र्याची जाणीव वाढविण्यात अशा चळवळींचे योगदान महत्त्वाचे ठरले.

  • स्वदेशी चळवळ-

परदेशी मालावर भारतीयांनी बंदी घातली आणि स्वदेशी मालाचा पुरस्कार करण्याचे भारतीय नागरिकांना आवाहन केले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी पुण्यात परदेशी कपड्यांची होळी केल्याची घटना इतिहासात महत्त्वाची मानली जाते. लोकमान्य टिळक यांनी स्वदेशीचे व्रत घेण्याचे लोकांना आवाहन केले. भारतीय उद्योगांना चालना देण्यासाठी विशेष प्रयत्न केले.[१९] याद्वारे ब्रिटिशांच्या जुलूमाला विरोध करण्याचे शिकस्तीचे प्रयत्न करून भारतीयांनी आपला असंतोष व्यक्त केला. या चळवळीने संपूर्ण भारतातील क्रांतीकार्याला जोर चढला.[२०] स्वराज्य, स्वभाषा, स्वदेशी या सूत्रांनी भारतीय नागरिकांत प्रेरणा जागी ठेवण्याचे कार्य या चळवळींनी केले.[२१]

  • असहकार चळवळ-

ब्रिटिशांनी स्थापन केलेल्या सरकारी संस्था, न्यायालये यावर बहिष्कार घालणे,कर न भरणे,शैक्षणिक संस्थांवर बहिष्कार घालणे अशा विविध मार्गांचा अवलंब करून भारतीयांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध आपला विरोध दर्शविला.[२२]

अन्य नोंद घेण्याजोगी क्रांतीकार्ये

संपादन
 
भगतसिंग,सुखदेव,राजगुरू
  • डिसेंबर १९०९ मध्ये अनंत कान्हेरे यांनी जॅक्सनचा केलेला वध[२३]
  • १९२९ मध्ये भगतसिंग,सुखदेव आणि राजगुरू यांनी इन्कलाब जिंदाबादच्या घोषणा देत केलेला बॉम्बहल्ला आणि या तिघांना मिळालेली फाशीची शिक्षा[२४]
  • आझाद हिंद सेना- नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी काँग्रेस मधून बाहेर पडून फॉरवर्ड ब्लॉक नावाचा स्वतःचा पक्ष स्थापन केला आणि ब्रिटिशांशी लढण्यासाठी आझाद हिंद सेनेची स्थापना केली.[२५]

महायुद्धे

संपादन

पहिल्या महायुद्धात ब्रिटिशांच्या प्रभावामुळे भारताने युद्धात सर्वतोपरी सहाय्य दिले होते दुसऱ्या महायुद्धाच्या वेळीही ब्रिटिश भारताला त्यात ओढू पाहत होते. तथापि सुभाषचंद्र बोस आणि अन्य काही भारतीय नेते यांना ते मान्य नव्हते.

भारताला स्वातंत्र्यप्राप्ती

संपादन
 
स्वतंत्र भारताचा राष्ट्रध्वज

इ.स.१९४२ साली तत्कालीन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी ब्रिटिशांकडे भारताच्या स्वातंत्र्याची जोरदार मागणी करायला सुरुवात केली. छोडो भारत असे या आंदोलनाचे नाव होते.[२६] यामध्ये संपूर्ण भारतातून मोठ्या प्रमाणावर उत्सफूरतपणे लोकांनी सहभाग नोंदविला.[२७] भारतीयांचा संघर्ष ब्रिटिश सत्ता दडपून शकली नाही आणि क्रांतीकारकांच्या बलिदानातून भारताला स्वातंत्र्य मिळण्याची चिन्हे दिसू लागली. गव्हर्नर[२८] माउंटबॅटन यांनी जून १९४७ मध्ये भारत आणि पाकिस्तान अशी भारताची फाळणी जाहीर केली. भारतीय स्वातंत्र्य कायद्यानुसार १४ ऑगस्ट १९४७ला पाकिस्तान या नव्या स्वतंत्र राष्ट्राची निर्मिती झाली आणि लगेचच १५ ऑगस्ट १९४७ला भारताला स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व मिळाले.

चित्रदालन

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ Chandra, Bipan; Mukherjee, Mridula; Mukherjee, Aditya; Panikkar, K. N.; Mahajan, Sucheta (2016-08-09). India's Struggle for Independence (इंग्रजी भाषेत). Penguin UK. ISBN 978-81-8475-183-3.
  2. ^ Zakaria, Anam. "Remembering the war of 1971 in East Pakistan". www.aljazeera.com (इंग्रजी भाषेत). 2022-08-12 रोजी पाहिले.
  3. ^ Jammanna, Akepogu; Sudhakar, Pasala (14 December 2016). Dalits' Struggle for Social Justice in Andhra Pradesh (1956-2008): From Relays to Vacuum Tubes (इंग्रजी भाषेत). Cambridge Scholars Publishing. ISBN 978-1-4438-4496-3.
  4. ^ Zakaria, Anam. "Remembering the war of 1971 in East Pakistan". Al Jazeera. 2020-05-18 रोजी पाहिले.
  5. ^ Landau, Jennifer (2016-07-15). Vasco da Gama: First European to Reach India by Sea (इंग्रजी भाषेत). The Rosen Publishing Group, Inc. ISBN 9781499438062.
  6. ^ Bayly, C. A.; Bayly, Christopher Alan (1987). Indian Society and the Making of the British Empire (इंग्रजी भाषेत). Cambridge University Press. ISBN 9780521386500.
  7. ^ Peers, Douglas M.; Gooptu, Nandini (2017-02-09). India and the British Empire (इंग्रजी भाषेत). Oxford University Press. ISBN 9780192513526.
  8. ^ Devsare, Dr Hari Krishna (2017-11-09). 1857 स्‍वतंत्रता का संग्राम - 1857 swatantrata ka mahasangram (हिंदी भाषेत). Diamond Pocket Books Pvt Ltd. ISBN 9789352786701.
  9. ^ Group, SSGC (2017-10-18). Monthly Current Affairs September-October 2017: Monthly Current Affairs September-October 2017 (हिंदी भाषेत).
  10. ^ D.C.Dinkar (2008). Svatantratā saṅgrāma meṃ achūtoṃ kā yogadāna (हिंदी भाषेत). Gautam Book Center. ISBN 9788187733720.
  11. ^ Shaktawat, Dr Surendra (2021-10-10). 1857 Ki Kranti Aur Neemuch: Bestseller Book by Dr. Surendra Shaktawat: 1857 Ki Kranti Aur Neemuch (हिंदी भाषेत). Prabhat Prakashan. ISBN 978-93-87980-98-3.
  12. ^ Fraser, Bashabi (2021-10-05). Bengal Partition Stories: An Unclosed Chapter (इंग्रजी भाषेत). Anthem Press. ISBN 978-1-84331-357-1.
  13. ^ Ghosha, Nityapriẏa (2005). Partition of Bengal: Significant Signposts, 1905-1911 (इंग्रजी भाषेत). Sahitya Samsad. ISBN 9788179550656.
  14. ^ Series-12 Indian National Movement & Constitutional Development (हिंदी भाषेत). Pratiyogita Darpan.
  15. ^ Sharma, Mahesh (2021-01-01). BIPIN CHANDRA PAL: Famous Book by Mahesh Sharma: BIPIN CHANDRA PAL (हिंदी भाषेत). Prabhat Prakashan. ISBN 978-93-86870-38-4.
  16. ^ Pagdi, Gayatri (2019-05-25). Lokmanya Tilak: The First National Leader (इंग्रजी भाषेत). Harper Collins. ISBN 978-93-5302-696-7.
  17. ^ Pradhan, Ram Chandra. Raj se Swaraj (हिंदी भाषेत). Prabhat Prakashan. ISBN 9789352664337.
  18. ^ Gonsalves, Peter (2018-07-30). Vastradware Swatantrayaprapti: Gandhipraneet Swadeshi Krantimadheel Aavahanachi Meemansa. SAGE Publishing India. ISBN 9789352807840.
  19. ^ Keḷakara, Bhā Kr̥ (1981). Tiḷaka vicāra. Śrīvidyā Prakāśana.
  20. ^ Bose, Madhuri (2017-04-17). Bose Bandhu aani Bhartiya Swatantrya: Marmbandhatalya Aathvadi (इंग्रजी भाषेत). SAGE Publishing India. ISBN 9789386042620.
  21. ^ Yamini, Rachna Bhola. Lokmanya Bal Gangadhar Tilak (हिंदी भाषेत). Prabhat Prakashan. ISBN 9789350484166.
  22. ^ Bose, Madhuri (2017-04-17). Bose Bandhu aani Bhartiya Swatantrya: Marmbandhatalya Aathvadi (इंग्रजी भाषेत). SAGE Publishing India. ISBN 9789386042620.
  23. ^ Patoriya (2008). Pachaas Krantikari (हिंदी भाषेत). Rajpal & Sons. ISBN 978-81-7028-746-9.
  24. ^ Joshi, Mrinalini (2021-01-19). Inquilab: Bestseller Book by Mrinalini Joshi: Inquilab (हिंदी भाषेत). Prabhat Prakashan. ISBN 978-93-86231-85-7.
  25. ^ Kumar, Dinkar (2014-01-01). Azad Hind Fauz (हिंदी भाषेत). Prabhat Prakashan. ISBN 9789384343064.
  26. ^ Parvate, Trimbak Vishnu (1985). Gāndhī-parva. Mahārāshṭra Rājya Sāhitya Sãskr̥tī Maṇḍaḷa.
  27. ^ MODY, NAWAZ B. (2008-05-01). BHARTIYA SWATANTRYA LADHYATIL STRIYA. Mehta Publishing House. ISBN 9788177663600.
  28. ^ Shah, Amritlal B. (1963). Śāstrīya vicārapaddhati. Samāja Prabodhana Saṃsthā.