सतीश कौशिक
सतीश चंद्र कौशिक (१३ एप्रिल, १९५६ - ९ मार्च, २०२३) हे एक भारतीय अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता, विनोदकार आणि पटकथा लेखक होते.
सतीश कौशिक | |
---|---|
सतीश कौशिक (२०१७) | |
जन्म |
सतीश चंद्र कौशिक १३ एप्रिल, १९५६ महेंद्रगड, पंजाब |
मृत्यू |
९ मार्च, २०२३ (वय ६६) गुरगांव, हरयाणा |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनेता, निर्माता, पटकथा लेखक |
कारकीर्दीचा काळ | १९८१ - २०२३ |
भाषा | पंजाबी |
शिक्षण | किरोडीमल महाविद्यालय, दिल्ली |
प्रशिक्षणसंस्था |
राष्ट्रीय नाट्य विद्यालय, दिल्ली, भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्था |
पत्नी |
शशी कौशिक (ल. १९८५) |
अपत्ये | २ |
प्रारंभिक जीवन
संपादनकौशिक यांचा जन्म महेंद्रगढ, हरियाणा येथे १३ एप्रिल १९५६ रोजी झाला.[१] त्यांनी किरोडी मल कॉलेज, दिल्ली विद्यापीठातून १९७२ मध्ये पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.[२] तसेच ते नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा आणि भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्था माजी विद्यार्थी देखील होते.[३]
कारकीर्द
संपादनकौशिक हे मिस्टर इंडिया मधील 'कॅलेंडर', [४] दीवाना मस्ताना मधील 'पप्पू पेजर' आणि सारा गॅवरॉनच्या ब्रिक लेन (२००७) मधील 'चानू अहमद' या भूमिकेसाठी प्रसिद्ध होते. त्यांना १९९० मध्ये राम लखन आणि १९९७ मध्ये साजन चले ससुरालसाठी फिल्मफेर सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता पुरस्कार मिळाला होता.[५]
हिंदी भाषेतील नाटक "विली लोमन" मधील त्यांची 'सेल्समन रामलाल'ची भूमिका विशेष गाजली होती.[६] कौशिक यांनी कुंदन शाह यांच्या कॉमेडी क्लासिक जाने भी दो यारों (१९८३) चित्रपटासाठी संवाद लिहिले होते.[७] रुस्लान मुमताज आणि शीना शहााबादी अभिनीत २००९ मधील त्यांचा तेरी संग चित्रपट, किशोरवयीन गर्भधारणेच्या समस्येवर आधारित होता, ज्याला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला.[८] चित्रपट दिग्दर्शक म्हणून त्यांचा पहिला चित्रपट श्रीदेवीचा रूप की रानी चोरों का राजा (१९९३) होता. त्याचा दुसरा चित्रपट प्रेम (१९९५) हा होता, ज्याद्वारे तब्बू ने चित्रपट सृष्टीत पदार्पण केले होते. हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटले होते.[९] यानंतर त्यांचा १९९९ मधील हम आपके दिल में रहते हैं हा चित्रपट चांगला चालला.
त्यांचे पुढचे काम तानसेनच्या जीवनावर आधारित होते, ज्यामध्ये तानसेनची भूमिका अभिषेक बच्चन साकारणार होते, तर साउंडट्रॅक रवींद्र जैन यांनी संगीतबद्ध केले आहे. या चित्रपटाची स्क्रिप्ट अजून देखील अपूर्ण आहे.[१०] कौशिक हरियाणाच्या चित्रपट सृष्टीत देखील काम करत होते.[११] कौशिक यांनी आपला हिट चित्रपट तेरे नाम (२००३) चा सिक्वेल 'तेरे नाम-2' बनवण्याचा निर्णय घेतला होता.[१२]
वैयक्तिक आयुष्य
संपादनकौशिक यांनी १९८५ मध्ये शशी नावाच्या युवतीसोबत लग्न केले होते.[१३] त्यांचा मुलगा १९९६ मध्ये वयाच्या दुसऱ्या वर्षी मरण पावला.[१४] तर २०१२ मध्ये, त्यांच्या मुलीचा जन्म सरोगेट आईच्या माध्यमातून झाला.[१५]
कौशिक यांचे वयाच्या ६६ व्या वर्षी ९ मार्च २०२३ रोजी गुरुग्राम येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.[१६][१७] त्याच्या शेवटच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये, ते जावेद अख्तर आणि शबाना आझमी यांच्या घरी होळी २०२३ साजरी करताना दिसले होते.[१८]
संदर्भ
संपादन- ^ "Satish Kaushik Biography: Birth, Age, Early Life, Movies, Hollywood Film, Net Worth, Death & More". jagranjosh.com.
- ^ Mini Dixit (19 August 2015). "I owe my success to the theatre society of Kirori Mal College -: Satish Kaushik". News18. 2022-05-20 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2023-03-27 रोजी पाहिले.
- ^ IANS (21 August 2015). "Professional school's polish your skills says Satish Kaushik". Indian Express. 2022-05-20 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2023-03-27 रोजी पाहिले.
- ^ "Movie Talkies". 2015-11-17 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 5 December 2016 रोजी पाहिले.
- ^ "Satish Kaushik death: Beloved Bollywood actor dies at age of 67". Yahoo News (इंग्रजी भाषेत). 2023-03-11 रोजी पाहिले.
- ^ "An Interview with Satish Kaushik", of Brick Lane Archived 2017-11-18 at the Wayback Machine., Indie London
- ^ "Satish Kaushik: A Man Of Many Talents - In Memoriam". The Economic Times. 2023-03-13 रोजी पाहिले.
- ^ "'Tere Sang' will make you think: Anupam Kher - Indian Express". archive.indianexpress.com. 2023-02-19 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 24 May 2020 रोजी पाहिले.
- ^ "Interview with Satish Kaushik' Archived 2008-04-22 at the Wayback Machine., The Tribune, 7 December 2003
- ^ Runna Ashish Bhutda (Oct 20, 2008). "Abhishek to play Tansen". Mumbai Mirror (इंग्रजी भाषेत). 2023-03-11 रोजी पाहिले.
- ^ Saini, Ravinder (March 9, 2023). "Haryanvi film artistes shocked at Satish Kaushik's death". Tribune India.
- ^ "Satish Kaushik on Tere Naam 2: It is the love story of a gangster". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2019-04-23. 2023-03-11 रोजी पाहिले.
- ^ Team India Forums (18 June 2021). "Satish Kaushik reveals his wife's reaction on his marriage proposal to pregnant Neena Gupta". India Forums. 2022-05-20 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 12 March 2022 रोजी पाहिले.
- ^ "When Satish Kaushik couldn't get time to mourn his sons death". Bollywood Bubble. 2023-03-09 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 19 April 2021 रोजी पाहिले.
- ^ Subhash K. Jha (4 August 2012). "Satish Kaushik rediscovers fatherhood after 16 years". Times of India. 2022-05-20 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2023-03-27 रोजी पाहिले.
- ^ "Satish Kaushik dies of a heart attack at 66, body to be brought to Mumbai after postmortem". द इंडियन एक्सप्रेस.
- ^ "Satish Kaushik: Bollywood actor-filmmaker dies at 66". BBC news. 2023-03-09 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2023-03-27 रोजी पाहिले.
- ^ "Satish Kaushik Dies at 66: Actor-Director's Last Insta Post Was Pics of Him Celebrating Holi 2023 at Javed Akhtar, Shabana Azmi's House With Ali Fazal, Richa Chadha and Mahima Chaudhry in juhu,Mumbai". Latestly. 9 March 2023. 2023-03-09 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 9 March 2023 रोजी पाहिले.
बाह्य दुवे
संपादन- इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील सतीश कौशिक चे पान (इंग्लिश मजकूर)