तानसेन ऊर्फ रामतनु ऊर्फ तन्नामित्र (जन्म - इ.स. १४९३, बेहट, ग्वाल्हेर - मृत्यु - २६ एप्रिल १५८९) हे अकबराच्या दरबारातील प्रसिद्ध नवरत्नांपैकी एक रत्न होते. तानसेन हे संगीतशास्त्रात निपुण होते. त्यांना 'मियां तानसेन' असे सुद्धा म्हणत.

तानसेन

तानसेनच्या वडिलांचे नाव मकरंद पांडे होते. गुरू हरिदास हे तानसेन यांचे गुरू होते. त्यांच्याकडे तानसेनने सुमारे १० वर्षे संगीताचे शिक्षण घेतले.

तानसेन एक उत्तम गायक होता. त्यामुळे रेवा संस्थान नरेश राजा रामचंद्र यांनी तानसेन यांना राजगायक म्हणुन ठेवून घेतले. व नंतर अकबर बादशहाला प्रसन्न करण्यासाठी भेट म्हणून तानसेनला देउन टाकले.

तानसेन हे अकबर बादशहा याच्या दरबारातील नवरत्नापैकी एक होते. त्यांच्या पत्नीचे नाव हुसेनी होतो. त्यांना चार मुले व एक मुलगी होती. सुरतसेन, शरदसेन, तरंगसेन व विलास खान आणि मुलगी सरस्वती असे होते.

तानसेन यांनी निर्माण केलेले शास्त्रीय संगीतातले राग संपादन करा

काव्यरचना संपादन करा