इ.स. १८६६
इसवी सनाच्या दुसर्या सहस्रकातील एक वर्ष
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १८ वे शतक - १९ वे शतक - २० वे शतक |
दशके: | १८४० चे - १८५० चे - १८६० चे - १८७० चे - १८८० चे |
वर्षे: | १८६३ - १८६४ - १८६५ - १८६६ - १८६७ - १८६८ - १८६९ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
संपादन- मे २ - कॅलावची लढाई - पेरूच्या सैन्याने स्पेनच्या आरमाराचा पराभव केला.
- जून ७ - आयरिश वंशाच्या १,८०० लुटारूंनी कॅनडात धुमाकुळ घातला. यानंतर केनेडियन सैन्याने त्यांना परत अमेरिकेत पळवून लावले.
- जून ८ - कॅनडाच्या संसदेची ओटावामध्ये पहिली बैठक.
- जुलै २४ - टेनेसी परत अमेरिकेत दाखल.
- जुलै २७ - आयर्लंडच्या व्हॅलेन्शिया द्वीपापासून कॅनडातील ट्रिनिटी बेपर्यंत समुद्राखालील तार घालण्याचे काम पूर्ण. यायोगे युरोप व अमेरिकेच्या दरम्यान तारसंदेश पाठवणे शक्य.
जन्म
संपादन- एप्रिल १३ - बुच कॅसिडी, अमेरिकन लुटारू.
- एप्रिल १४ - ऍन सुलिव्हान, हेलन केलरची शिक्षिका.
- मे ९ - गोपाळ कृष्ण गोखले, भारतीय स्वातंत्र्यसेनानी, मराठी समाजसुधारक.
- सप्टेंबर २१ - एच.जी. वेल्स, अमेरिकन लेखक.