भूस्थिर उपग्रह
भूस्थिर उपग्रह हे पृथ्वी भोवताली फिरणारे उपग्रह असतात की जे पृथ्वी भोवती फिरतात परंतु ते पृथ्वी वरून स्थिर भासतात.
शास्त्रीय कारण
संपादनकेपलरच्या तिसऱ्या नियमानुसार पृथ्वीभोवती फिरणाऱ्या वस्तुचे पृथ्वी पासुनचे अंतर वाढल्यास त्याचा भ्रमण काळ वाढतो.सर्वात उंचावरचा भूस्थिर कक्ष सुमारे ३६००० किलोमीटर उंचीवर असतो. त्याचा भ्रमणाचा वेग पृथ्वीच्या स्वतःभोवतीच्या भ्रमणाइतकाच असल्याने या कक्षातील उपग्रह पृथ्वीवरून बघितले असता आकाशात एकाच ठिकाणी स्थिर आहेत असे वाटते.