नोआह वेब्स्टर
नोआह वेब्स्टर, जुनियर (१६ ऑक्टोबर, १७५८, हार्टफर्ड, कनेटिकट वसाहत, ब्रिटिश अमेरिका[१][२] - २८ मे, १८४३:न्यू हेवन, कनेटिकट, अमेरिका) हे अमेरिकन लेखक, भाषासुधारक, पाठ्यपुस्तक लेखक आणि शब्दकोशकार होते. यांनी १८०६ साली प्रकाशित केलेला अ कंपेन्डियस डिक्शनरी ऑफ द इंग्लिश लॅंग्वेज हा अमेरिकेतील पहिला शब्दकोश होता. यानंतर १८२८ साली त्यांनी ॲन अमेरिकन डिक्शनरी ऑफ द इंग्लिश लॅंग्वेज हा शब्दकोश प्रकाशित केला.[३] याची दुसरी आवृत्ती तयार होत असताना १८४३मध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यावेळी या शब्दकोशाचे हक्क जॉर्ज आणि चार्ल्स मरियम यांनी विकत घेतले. कालांतराने या शब्दकोशाचे रूपांतर मरियम-वेब्स्टर डिक्शनरीमध्ये झाले.
संदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ डॉब्स, क्रिस्टोफर. "नोआह वेबस्टर ॲंड द ड्रीम ऑफ ए कॉमन लॅंग्वेज". नोआह वेबस्टर ॲंड द ड्रीम ऑफ ए कॉमन लॅंग्वेज. कनेटिकट ह्युमॅनिटीज. २०१५-०७-२४ रोजी पाहिले.
- ^ "कनेटिकट बर्थ्स ॲंड क्रिसनिंग्स, १६४९-१९०६". फॅमिलीसर्च. २०१५-०७-२४ रोजी पाहिले.
- ^ Wright, Russell O. (2006). Chronology of education in the United States. McFarland. p. 44. ISBN 978-0-7864-2502-0. April 13, 2012 रोजी पाहिले.