मे २८
दिनांक
(२८ मे या पानावरून पुनर्निर्देशित)
<< | मे २०२१ | >> | ||||
सो | मं | बु | गु | शु | श | र |
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ | ७ |
८ | ९ | १० | ११ | १२ | १३ | १४ |
१५ | १६ | १७ | १८ | १९ | २० | २१ |
२२ | २३ | २४ | २५ | २६ | २७ | २८ |
२९ | ३० | ३१ |
मे २८ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १४८ वा किंवा लीप वर्षात १४९ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडीसंपादन करा
सोळावे शतकसंपादन करा
- १५०३ - पोप अलेक्झांडर सहाव्याच्या फतव्यानुसार स्कॉटलॅंडचा राजा जेम्स चौथा व मार्गारेट ट्युडोरचे लग्न झाले.
- १५८८ - एकशे तीस युद्धनौकांवर ३०,००० सैनिकांसह स्पॅनिश आर्माडा इंग्लंडवर चाल करायला निघाला.
अठरावे शतकसंपादन करा
- १७७४ - अमेरिकन क्रांती - पहिल्या कॉन्टिनेन्टल कॉंग्रेसला सुरुवात.
एकोणविसावे शतकसंपादन करा
- १८३० - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष ॲंड्र्यू जॅक्सनने इंडियन रिमुव्हल ऍक्टवर सही करून स्थानिक अमेरिकन जमातींना स्थलांतर करण्यास भाग पाडले.
- १८९२ - जॉन मुइरने सान फ्रांसिस्कोमध्ये सियेरा क्लबची स्थापना केली.
विसावे शतकसंपादन करा
- १९०५ - रशिया-जपान युद्ध-त्सुशिमाची लढाई - जपानी दर्यासारंग टोगो हेहाचिरोने रशियाचे आरमार बुडवले व लढाई संपवली.
- १९१८ - अझरबैजानने स्वतःला स्वतंत्र घोषित केले.
- १९३६ - ऍलन ट्युरिंगने ऑन कम्युटेबल नंबर्स हा शोधनिबंध प्रकाशित केला.
- १९३७ - फ्रॅंकलिन डिलानो रूझवेल्टने वॉशिंग्टन डी.सी.मध्ये बटन दाबून सान फ्रांसिस्कोमधील गोल्डन गेट ब्रिज वाहतूकीला खुला केला.
- १९३७ - नेव्हिल चेंबरलेन युनायटेड किंग्डमच्या पंतप्रधानपदी.
- १९४० - दुसरे महायुद्ध - बेल्जियमने जर्मनीसमोर शरणागती पत्करली.
- १९४० - दुसरे महायुद्ध - नॉर्वे, फ्रांस, पोलंड व युनायटेड किंग्डमच्या सैन्यांनी नार्विक जिंकले.
- १९४२ - दुसरे महायुद्ध - राइनहार्ड हेड्रिचच्या खूनाचा बदला म्हणून नाझींनी चेकोस्लोव्हेकियात १,८०० व्यक्तींना यमसदनास धाडले.
- १९५२ - ग्रीसमध्ये स्त्रियांना मतदानाचा हक्क देण्यात आला.
- १९६४ - पॅलेस्टाईन मुक्ती संघटनेची स्थापना.
- १९७८ - सांगूले लामिझानाने बर्किना फासोच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकली.
- १९८२ - फॉकलॅंड युद्ध - गूझ ग्रीनची लढाई.
- १९८७ - पश्चिम जर्मनीच्या मथायस रस्टने आपले छोटे विमान सोवियेत संघाची राजधानी मॉस्कोमधील लाल चौकात उतरवले.
- १९९६ - भारताचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा राजीनामा
- १९९८ - भारताने केलेल्या अणुचाचणीला उत्तर म्हणून पाकिस्तानने पाच अणुबॉम्ब उडवले.
एकविसावे शतकसंपादन करा
28 मे 1895
09 डिसेंबर 1950 ला कोल्हापूर नगरीत विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा जगातील पहिला पुतळा उभारणारे माधवराव बागल याना जन्मदिन निमित्त कोटी कोटी प्रणाम
जन्मसंपादन करा
- [[28 मे 1895
09 डिसेंबर 1950 ला कोल्हापूर नगरीत विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा जगातील पहिला पुतळा उभारणारे माधवराव बागल याना जन्मदिन निमित्त कोटी कोटी प्रणाम.]]
- १५२४ - सलीम दुसरा, ऑट्टोमन सम्राट.
- १६६० - जॉर्ज दुसरा, इंग्लंडचा राजा.
- १७३८ - जोसेफ-इग्नास गिलोटिन, फ्रांसचा डॉक्टर.
- १७५९ - छोटा विल्यम पिट, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.
- १८८३ - स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, भारतीय क्रांतिकारक, प्रभावी वक्ते, मराठी साहित्यिक.
- १९०३ - शंतनुराव किर्लोस्कर, मराठी उद्योगपती.
- १९२३ - एन. टी. रामाराव, लोकप्रिय तेलुगू अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक, आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री.
- १९२५ - ब्युलेंट एसेव्हिट, तुर्कस्तानचा पंतप्रधान.
मृत्यूसंपादन करा
- १९६१ - प. कृ. गोडे, प्राच्यविद्या संशोधक .
प्रतिवार्षिक पालनसंपादन करा
बाह्य दुवेसंपादन करा
- बीबीसी न्यूजवर मे २८ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)