शं.ल. किर्लोस्कर

(शंतनुराव किर्लोस्कर या पानावरून पुनर्निर्देशित)

शंतनुराव लक्ष्मणराव किर्लोस्कर (२८ मे, इ. स. १९०३ - २४ एप्रिल, इ. स. १९९४; पुणे, महाराष्ट्र ;) हे मराठी, भारतीय उद्योजक होते. किर्लोस्कर समूहाच्या विकासात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. किर्लोस्कर समूहाचे संस्थापक लक्ष्मणराव किर्लोस्कर हे त्यांचे वडील होते.

शं.ल. किर्लोस्कर
जन्म २८ मे, इ.स. १९०३
मृत्यू २४ एप्रिल, इ.स. १९९४
पुणे, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व क-हाडे ब्राह्मण, भारतीय
नागरिकत्व भारतीय
पेशा संचालक, किर्लोस्कर समूह
जोडीदार यमूताई किर्लोस्कर
अपत्ये चंद्रकांत किर्लोस्कर,
श्रीकांत किर्लोस्कर

पुरस्कार संपादन

व्यापार व उद्योग क्षेत्रांतील त्यांच्या योगदानाची कदर करत भारतीय केंद्रशासनाने इ.स. १९६५ साली त्यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरवले. तसेच त्यांना फाय फाउंडेशन, इचलकरंजी यांच्यातर्फे राष्ट्रभूषण पुरस्कार देण्यात आला.

चरित्र संपादन

  • कॅक्टस अँड रोझेस हे त्यांचे आत्मचरित्र आहे.
  • सविता भावे यांनी शंतनुराव किर्लोस्करांचे ’कालापुढती चार पाऊले’ या शीर्षकनावाचे चरित्र लिहिले आहे.

बाह्य दुवे संपादन

  • "एन्शियंट गॉड्स अँड मॉडर्न मेथड्स - टाइम नियतकालिकात शं.ल. किर्लोस्कर यांच्यावर छापून आलेला लेख" (इंग्लिश भाषेत). Archived from the original on 2013-05-21. 2011-06-09 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)